विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 12 October 2020

श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री रामेश्वराचा इतिहास”

 





श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री रामेश्वराचा इतिहास”...🚩

जलदुर्गाची निर्मिती करण्याच्या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज मालवणमध्ये आले होते मालवणमधील कुरटे बेटाची पाहणी करीत जलदुर्गासाठी यापेक्षा चांगली जागा नाही, असे म्हणत याच ठिकाणी जलदुर्ग उभारण्याचे पक्के केले. यानुसार २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मोरयाचा धोंडा येथे गणेश पूजन करीत किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली. परंतु बांधकामावर दगड टिकत नव्हता. त्यामुळे चिंतेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना कांदळगांवच्या श्री देव रामेश्वराने स्वप्नात दृष्टांत दिला की येथून आठ किमी अंतरावरील मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे जाऊन तेथील स्वयंभू श्री रामेश्वराचा जीर्णोद्धार कर.शिवाजी महाराजांनी या दृष्टांताला अनुसरून कांदळगावी जाऊन तेथील श्री देव रामेश्वराच्या शिवलिंगाची यथासांग पूजा करून त्याचा जीर्णोद्धार केला व समोरच वटवृक्षाचे रोपण केले. (जो आजही या ऐतिहासिक घटनेची साक्ष देत उभा आहे) त्यानंतरच सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले.या ऐतिहासिक घटनेनंतर दृढ झालेले शिवाजी महाराज, भवानी माता, देव रामेश्वराचे ऋणानुबंध जोपासण्यासाठी देव रामेश्वर आपल्या पंचतत्व व रयतेसह त्रवार्षिक भेट किल्ले सिंधुदुर्गला देतात.या भेटीला ऐतिहासिक भेटीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. श्री देव रामेश्वराच्या या भेटीची प्रतीक्षा संपूर्ण मालवण शहराला लागून राहिलेली असते. मार्गात रांगोळी काढत‌ ग्रामदैवतेचे स्वागत केले जाते.कांदळगाव गावची एकी वाखाणण्याजोगी आहे. शिवकालीन बरोबरच पांडवकालीनही वारसा या गावाला लाभला असल्याचे स्पष्ट होते.या मंदिराची रचना, येथील निसर्गरम्य वातावरण, गावातील ऐतिहासिक पाऊलखुणा, येथील प्रथा-परंपरा हे सारेच अनुभवण्याजोगे आहे.रामेश्वर मंदिरातील विविध उत्सव आणि या उत्सवांचा थाटमाट आपल्याला श्रद्धेची प्रचीती देत असतो.शिवकालीन इतिहास लाभलेला कांदळगांव समग्र इतिहासाचा साक्षीदार आहे. श्रीरामेश्वर सर्वाथाने सर्वावर कृपादृष्टी ठेवून आहे.....🙏🚩


माहिती / फोटोग्राफी : Prathamesh Umbare ...♥️

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...