विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 12 October 2020

छत्रपती🚩

 


छत्रपती🚩

छत्रपती या शब्दाचा उगम वेगळा आहे,
हें राजवाडे यांच्या लेखावरून दिसतें.
राजवाडे यांचें इतिहासाच्या क्षेत्रातील महान कार्य सर्वज्ञात आहेच, परंतु, ते भाषाकोविदही होते.
त्यांनी भाषा, संस्कृती, व्याकरण, लोकसमूहांचें स्थलांतर, इत्यादी विषयांवरही विपुल लेखन केलेलें आहे.

(१) ’छत्रपति’ मधील ‘ति’ हा, संस्कृतमध्ये व तत्सम शब्दांमध्ये र्हस्व असतो.
परंतु, आतां मराठीत हा शब्द stand-alone अशाप्रकारें लिहितांना, ‘ती’, ( म्हणजे, ‘छत्रपती’ असा), दीर्घ लिहिला जातो.
परंतु, राजवाडे यांनी , तत्कालीन पद्धतीप्रमाणें, ‘ति’ र्हस्व लिहिलेला आहे.
या सर्वांचा विचार करूनच, खाली हेतुत:
,ति/ती हा, र्हस्व किंवा दीर्घ लिहिलेला आहे, याची नोंद घ्यावी .

(२) शिवरायांचा एकेरी उल्लेख हा केवळ लेखनसोयीसाठीच आहे. राजवाडे यांनीही तो तसाच एकेरी वापरलेला आहे.
कवि भूषण याच्या काव्यात छत्रपति हा शब्द येतो.
जसें, ‘छटी छत्रपति को जीत्यों’ ,
‘सबै छत्रपति छाँडी’ .
ग्रँट डफ लिहितो की, १६६४ पासून,
म्हणजे शहाजीराजेंच्या मृत्यूनंतर, शिवाजीराजांनी नाणें पाडण्यांस सुरुवात केली, व शिवाजीराजांच्या नाण्यांवर ‘छत्रपति’ ही अक्षरें तेव्हांपासून आहेत.
‘छत्रपति’ हा शब्द पुरातन काळीं जंबुद्वीपात
प्रचलित होता;
गजपति, छत्रपति, अश्वपति, नरपति, हे राजे जंबुद्वीपाच्या दक्षिण, पश्चिम, उत्तर आणि पूर्व प्रदेशात राज्य करतात अशी पुराणांत कथा आहे ;
असा उल्लेख ‘बील’ यानें केलेल्या,
‘सी यू की’ या चिनी पुस्तकाच्या भाषांतरात आलेला आहे.
या पुस्तकातील ‘छत्रपति’ हा शब्द ‘क्षत्रपति’ या शब्दाचें रूपांतर होय.
‘छत्रपति’ हा शब्द ‘छत्र’ व ‘पति’ या दोन शब्दाच्या समासानें झालेला आहे.
छत्राचा जो पति म्हणजे धनी (मालक) तो, छत्रीवाला, म्हणजे छत्रपति .
पण असा या शब्दाचा वाच्यार्थ रूढ नाहीं.
छत्रीवाला याला ‘छत्रधारी’ असा संस्कृत शब्द आहे.
‘हैम’ (सुवर्णमय, सोन्याचें) छत्राचा जो पति, तो ‘छत्रपति’,
हा दुसरा रूढ-अर्थ झाला. छत्रपति, म्हणजे ‘चक्रवर्ती राजा’ ,
‘सम्राट’.
सम्राट म्हटला की त्याला सोन्याची छत्री ही असायचीच.
आपट्यांच्या कोशात, ‘छत्रपति’ याचा अर्थ ‘चक्रवर्ती, सम्राट’ असा ते देतात.
जंबुद्वीपातील एका पुरातन राजाचें ‘छत्रपति’ हें नांव होतें,
असेंही आपटे सांगतात.
छत्रपती म्हणजे सम्राट एवढ्यानेंच या शब्दाची व्याप्ती होत नाहीं.
पृथ्वीवर कोणी छत्रपती झाला म्हणजे त्या वेळीं अन्य छत्रपती संभवत नाहीं.
.
.
.
#फिरस्ता #firasta_marathi

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...