वस्ताद लहूजी साळवे आणि पेशवे यांचा संबंध
भाग १
वाघाबरोबर लढाई करण्याच्या पराक्रमामुळे किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी पेठ गावातला शुर मर्द मांगाचा पठ्ठा राघोजी साळवे प्रसिद्ध होते. राघोजी साळवे अतिशय पराकर्मी पुरुष होते, युद्ध कलेमध्ये त्यांचा कोणीही हात धरत नसे.
एकदा तर त्यांनी वाघाबरोबर युद्ध करून जिवंत वाघाला खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या राजदरबारी सादर केले होते व आपल्या प्रचंड शक्तीचे प्रदर्शन केले होते.
लहु राघोजी साळवे हे त्यांच पुर्ण नाव पण वस्ताद लहुजी साळवे या नावाने ते महाराष्ट्राला परिचित आहेत.लहुजींचा जन्म 14नोव्हेंबर 1794 रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावातील राघोजी व विठाबाई या मातंग समाजातील कुंटुबात झाला.
लहुजींचे वडील राघोजी हे पेशवाईत शिकारखान्याचे प्रमुख होते, शिवाय शस्त्रागारखात्याचीही जबाबदारी त्यांच्याकडे होती
साळवे घराने सशस्त्र विद्येमध्ये निपुण व तरबेज होते.सैन्यात पराक्रम गाजवीत होते. त्यामुळे, शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात साळवे घराण्याची योग्यता ओळखून पुरंदरकिल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजी साळवे यांचे आजोबा यांच्याकडे सोपवली होती. पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणासाठी साळवे घराण्यातील अनेक वीर पुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना 'राऊत ' या पदवीने गौरविले होते.
No comments:
Post a Comment