विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 October 2020

वस्ताद लहूजी साळवे आणि पेशवे यांचा संबंध भाग २



 वस्ताद लहूजी साळवे आणि पेशवे यांचा संबंध

भाग २

खडकी येथे १२ दिवस चाललेल्या पेशवे- इंग्रज तुंबळ युद्धात

१७ नोव्हेंबर १८१७ रोजी झालेल्या लढाईत मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनच्या नेतृत्वाखालील इंग्रज सैन्याविरुद्घ लढताना राघोजी धारातीर्थी पडले. २३ वर्षांच्या लहुजी वस्तादांसह इंग्रजांशी शौर्याची शर्थ करणाऱ्या राघोजींना कपटी इंग्रजांनी एकत्र येऊन संपविले. वाघाची शिकार करणाऱ्या पित्याला पिसाळलेल्या कुत्र्यांनी लचके तोडून संपवले होते.लहुजींच्या समोरच स्वराज्याचा मर्द मावळा वडिल राघोजी साळवे शहीद झाले.खडकीच्या युद्घात पेशवाईचा अस्त झाला.

आपल्या वडिलांना आपल्या डोळ्या समोरच शहीद झालेले पाहून लहूजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली व भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली.लहुजींनी आजन्म ब्रह्मचारी राहून मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा द्दढनिश्चय केला.
‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी उभारली. ही समाधी अजूनही पुणे-शिवाजीनगरजवळच्या ‘वाकडेवाडी’ येथे आहे.
वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरले तरी मनात खदखदत असलेल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...