विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 October 2020

इतिहासातील सर्वात प्रसिद्ध अथवा अप्रतिम वाक्य


 इतिहासातील सर्वात प्रसिद्ध अथवा अप्रतिम वाक्य

मी माझ्या 'स्वराज्य ते साम्राज्य' या मंचावरील 'कव्हर फोटोमध्ये' अशी बरीच वाक्य टाकण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासातील असं एकच वाक्य नाही पण खालील काही वाक्य वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ऐतिहासिक लोकांनी उच्चारली आहेत:
१. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं
हे वाक्य कोणी का म्हटलं हे सांगायची उभ्या महाराष्ट्राला गरजच नाही. या वाक्याचे काही ऐतिहासिक संदर्भ नसले तरी हे प्रसिद्ध वाक्य तानाजी यांनी सिंहगड घेण्याच्या पूर्वी आपली कर्तव्यतत्परता दर्शवताना उद्गारलेलं होतं. हे एकच वाक्य समस्त मावळ्यांचीच नव्हे तर अख्या महाराष्ट्राची महाराजांबद्दलची आणि स्वराज्यासंबंधीची असलेली भावना व्यक्त करते.
२. 'बचेंगे तो और भी लडेंगे'
हे वाक्य दत्ताजी शिंदे यांच्या तोंडचे आहेत. बरारी घाटात नजीब खान आणि त्याचा गुरु कुत्बशहा याच्याशी झालेल्या युद्धात जखमी दत्ताजी हाती सापडल्यावर नजीबाने त्याला खिजवण्यासाठी विचारलं कि 'क्यू दत्ताजी और लडेंगे?' यावर आपल्या बाणेदार मराठी वाघाने 'बचेंगे तो और भी लडेंगे' असे उत्तर दिले.
३. आम्ही गनीमलोक शिवाजी महाराजांचे शिष्य अहो
आजकाल जातीद्वेष पसरवण्यासाठी पेशवे हे 'मराठा' जातीच्या विरुद्ध होते, पेशवाईत 'छत्रपती शिवाजी महाराजांचं' नाव घेण्यास बंदी होती अश्या अफवा उडत असतात. हे प्रत्यक्ष नानासाहेब पेशवे यांनी पिलाजीराव जाधवांना लिहिलेल्या पात्रातील वाक्य आहे ज्यात ते स्वतःला 'शिवाजी महाराजांचे शिष्य म्हणवून घेत आहेत. सुज्ञास आणखी सांगणे न लगे.
४. वाघ गेला! कोल्ही मात्र राहिली:
माधवराव पेशवे यांनी पानिपतच्या युद्धानंतर 'मराठा साम्राज्याला' लागलेली उतरती कळा आवरली. मृत्यूपूर्वी मराठ्यांचा दरारा पुनरुस्थापित केला. परंतु अवघ्या २८व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. यानंतर मराठा साम्राज्याची होणारी दैना वर्णन करताना आणि रघुनाथरावांसारख्या लबाड माणसांचे वर्णन करताना एका पात्रात गंगाधर बापूजी फडणीस लिहितात. 'श्रीमंत (नारायणराव) तर बाळकृष्णच आहेत. छोट्या छोट्या गोष्टीत कारभाऱ्यांना पुसावे लागते. सर्वच फासल्यासारखे झाले आहे. वाघ गेला! कोल्ही मात्र राहिली'.
याशिवायही इतिहासातील चिक्कार वाक्य महत्वाची आणि मार्मिक आहेत.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...