वस्ताद लहूजी साळवे आणि पेशवे यांचा संबंध
भाग ३
जीवघेण्या शस्त्रां बरोबर एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळणाऱ्या, व पिळदार शरीर व त्यांची भरलेली छाती पाहून शत्रूला सुद्धा घाम फोडणाऱ्या लहुजींनी दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व आपल्या अंगी असलेल्या युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. शिवाय शस्त्रास्त्रांच्या गुप्त प्रशिक्षणासाठी गुलटेकडी परिसरातील निर्जन, दाट झाडीमध्ये जागा निवडली.
त्यांच्या आखाड्यातच पुढे लोकमान्य टिळक, महात्मा जोतिबा फुले, वासूदेव फडके, चापेकर बंधू, उमाजी नाईक, गोपाळ गणेश आगरकर सारखे मातब्बर पट्टे निर्माण झाले.
लहुजींनी महात्मा फुले यांच्या दलितोद्घारात सर्वतोपरी सहकार्य केले. म. फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली (१८४८).लहुजींच्या तालमीत पहिली मुलींची शाळा भरत होती. माता सावित्रीबाई फुले चालवत होत्या.
पण या अस्पृश समाजातील मुलींच्या शाळेला काही लोकांचा विरोध होता. शिक्षकांनवर आणि फुले दांपत्यावर जीवघेणे हल्ले होत होते. म्हणुन लहुजींनी त्यांचा तालमीतील दोन शिक्षाना (पैलवान) फुले दांपत्याची व इतर शिक्षकांची संरक्षणाची जबाबदारी सोपवली होती.
लहुजींनी स्वत:च्या मुक्ता या पुतणीस या शाळेत पाठविले आणि राणबा (हरिजन) च्या मदतीने अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले. मुक्ताने लहुजी आणि फुले दांपत्याच्या प्रभावातून तत्कालीन दलितांच्या दु:स्थितीचे वर्णन करणारा निबंध लिहिला. तो ज्ञानोदय नियतकालिकात प्रसिद्घ झाला (१८५५). तो पुढे ना. वि. जोशीकृत पुणे वर्णन (पुरवणी अंक २) यात छापण्यात आला. फुले यांच्या शैक्षणिक कार्यास लहुजींनी भक्कमपणे मदत केली. फुले यांच्या मिरवणुकीत, सभेत वा कार्यक्रमात लहुजी आपल्या तालीमबाज शिष्यांसह हजेरी लावीत.
१८५७ उठावात लहुजींच्या तालमीत तयार झालेले अनेक क्रांतिवीर सामील झाले होते. त्यांना फाशी वा जन्मठेप अशा कठोर शिक्षा ब्रिटिशांनी ठोठावल्या. लहुजींपासून प्रेरणा घेऊन लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू , स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ही परंपरा पुढे नेली.
२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात शिक्षाना युद्ध कौशल्य शिकवत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला.
लहुजी साळवे यांनी आपल्या 87 वर्ष जीवन इतिहासात अनेक युद्ध,उठाव, क्रांतीकारक तयार केले,जातिभेद व अन्याय विरुद्ध लढले. पण “उगवलेल्या सुर्याला हि मावळाव लागत”तसच
अद्याक्रांतिकार, वस्ताद, अद्यागुरु,वीरपुरूष,पैलवान, धर्मवीर,ह्या उपमा त्यांनी आपल्या संघर्षमय जीवनात मिळवल्या आहेत.
क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे) येथे आहे.
अशा महान क्रांती सेनानी, देशभक्त, मर्द मावळा, लहुजी वस्ताद यांना विनम्र अभिवादन.
जय लहूजी | जय भारत.
No comments:
Post a Comment