इतबारराव ही फारसी भाषेतील पदवी याचा मराठी अनुवाद " विश्वासू " असा होतो.
१.शाहिस्तेखानाच संकट स्वराज्यावर येऊन धडकले होते.याच शाहिस्तेखानाला मातित गाडण्यासाठी बारा मावळची ४०० रनमर्दानची फौज तयार केली.याच फौजेत होते दोन पाणिदार मोती "रोहीडा खोर्यातिल चांदजीराजे जेधे"आणि "हिरडस मावळचे कोयाजीराजे नाईक-बांदल"या लढाई मध्ये शाहिस्तेखानाची पळता भुई करुन सोडल होत. लढाईत कोयाजीराजे नाईक-बांदल धारातिर्थ पडले.यांच्या पराक्रमामुळे कोयाजीराजेना महाराजांनी मौजे "आंळदे" येथे जमिनी इनाम दिल्या.
२.बांदलांच्या रक्ताने पावन झालेली पावनखिंडीची लढाई . स्वराज्याचा जिव विशालगडाकडे सुखरुप पोहचवण्याठी नाईक-बांदल घराण्याचे योगदान खुप मोठे आहे,याच भिम पराक्रमा नंतर स्वराज्याचा सर्वात मोठ्ठा मान "मानाच्या पहिल्या समशेरीचा नाईक-बांदल घराण्याला देण्यात आला.सिंहाच्या जबड्यात घालुनी हात जो मोजिल त्याचे दात ही मर्द माराठ्याची औलाद ही मर्द मराठ्याची औलाद.
३.जावळीची लढाई असो,बेलसरची लढाई असो,किंवा अफजलखानाचा वध' अशा आनेक प्रकारच्या लढाईत महाराजांना नाईक-बांदल घराण्यानी "विश्वासाची" साथ दिली म्हणूनच महाराजांनी "नाईक-बांदल"घराण्याला " इतबारराव" ही फारसी भाषेतिल पदवी बहाल केली.
४.पगण्याच्या प्रमुखाला नाईक असे संबोधत असे.
५.ठोकरली येथे गड्या बादशाही आंधळी !!
मुलुख त्यात मावळी मुलुख त्यात मावळी !!
यासारख्या मावळ्यांनी राजगडावर आणि रायगडावर आजिंक्य सिंहासन निर्णमान केले.
इतिहासाचा अभ्यास कशासाठी तर स्वतःच्या मना मध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी आणि पुढील पिढीला आपण कोणत्या घराण्याच प्रतिनिधीत्व करतोय हे सांगण्यासाठी.
आम्हाला माहीत आहे संकटावर कशा प्रकारे तुटुन पडायच.४००० विरुद्ध ३०० एक ही गनिम वर चढु दिला नाही पावनखिंडीचा रनसंग्राम,म्हणून नच म्हटले जाते,"संकटावर अशाप्रकारे तुटुन पडायच कि जिंकल तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास".
अभिमान आहे या घराण्याचा वंश आसलेल्याचा.
"जय भवानी जय शिवराय"
सौजन्य-गिरीषराजे नाईक-बांदल
(हिरडस मावळ खोरे)
No comments:
Post a Comment