#ऐतिहासिक_किताब (पदव्या)
इतिहासात ज्यावेळी एखादा योध्दा मोहिमेवर जाऊन पराक्रम गाजवून मागार आल्यावर त्याच्या सन्मान करण्यासाठी त्याला काही सैन्याचा मनसबदार किंवा अधिकारी बनवला जायचा.. त्याच वेळी त्याला ऐकादा 'किताब' देऊन म्हणजे पदवी देऊन गौरव केला जायचा... चला बघूया कोणता किताब कुणाला दिला केव्हा दिला..?
किताब पहिला :- #राजा_घोरपडे_बहाद्दर :-
_भोसले घराणे हे राजपुताण्याहून दक्षिणप्रांती आलेले होते. सिसोदिया राजा अजयसिंग याने स्वतःच्या पश्चात सिसोद्याचा राणा म्हणून स्वतःच्या पुतण्याची निवड केली म्हणून त्याचे दोन्ही पुत्र सजनसिंग आणि क्षेमसिंग नाराज होऊन दक्षिणेत आले..सजनसिंग याने बहमनी राजाची सरदारकी केली पुढे तो मरण पावला. त्याच सजनसिंगचा वंशज कर्णसिंग याने #खेळणा (म्हणजे आताचा विशाळगड) किल्ल्याला *घोरपड* लावून (घोरपडीच्या सहह्याने चढून) अजिंक्य असा किल्ला जिंकून दिला.. ह्या मोहिमे कर्णसिंग धारातीर्थी पडला त्यामुळे त्याचा पुत्र *भीमसिंग* ह्याला महंमद बहामनीने #राजा_घोरपडे_बहाद्दर असा 'किताब दिला..आणि कर्नाटक मध्ये मुधोळ व ८३ गावांची नवीन जहागीर दिली..पुढे त्याच किताबामुळे भोसले घराण्यातील ऐका शाखेस घोरपडे हे आडनाव पडले व ती मुधोळ प्रांती वास्तव्यात राहिले.._
(संदर्भ :- इतिहासाच्या पाऊलखुणा..)
किताब दुसरा :- #चंद्रराव :-
जावळीचे मोरे घराणे हे आदिलशाही सरदार व वतनदार घराणे होते. त्यांचे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापन होऊन नये ह्यासाठी महाराजांना विरोध कायम राहिला. त्यांच्या घरण्यासबंधी हकीकत अशीही आहे की, पूर्वी कर्नाटकात आदिलशहाच्या पदरी मोरे आडनावाच्या नाईक होता याला युसूफ आदिलशहाने १२००० सैन्य देऊन नीरा आणि वारणा या दोन नद्यांमधील मुलुख जो की घेण्यास फार कठीण होता तो घेण्यास पाठविले त्यावेळी त्यांनी तो प्रदेश शिर्क्यांकडून जिंकून घेतला.. म्हणून आदिलशाहने त्यांच्या नावाला #चंद्रराव हा किताब जोडून त्याला जावळीचा राजा केला हे नाव या घरण्याला पिढ्यानपिढ्या चालत आले.. (संदर्भ :- ग्रांट डफ :- हिस्ट्री ऑफ मराठज :- मराठ्यांची बखर)
किताब तिसरा :- #बाजी:-
अहमदनगरच्या निजामशाहीत #रताजी_मोहिते हे शिवाजी महाराजांच्या अष्टपत्नी यांमधील #सोयराबाई_राणी_साहेब यांचे आजोबा होते.. त्यांना महत्वपूर्ण पराक्रमामुळे #बाजी हा किताब बहाल केला ...(बाजी म्हणजेच :- योद्धा..) (संदर्भ :- ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ. सदाशिव शिवदे)
किताब चौथा :- #सरलष्कर :-
मलिक अंबरने केलेल्या विश्वासघातामुळे शहाजीराजे निजामशाही सोडून आदिलशाहीत आले तेव्हा त्याला इतका झाला की त्याने आजपर्यंत कुठल्याही हिंदू सरदाराला न दिलेला #सरलष्कर हा किताब शहाजीराजे यांना बहुमान केला.. (सरलष्कर :- सेनाप्रमुख) (संदर्भ:- इतिहासाच्या पाऊलखुणा)
किताब पाचवा :- #मिर्झाराजे :-
आपल्याला सर्वांना पुरंदरचा तह माहीत आहे या तहात शिवाजी महाराजांनी २३ किल्ले मोगलांकडे सुपूर्द केले होते हा तह होण्यास कारणीभूत होते औरंगजेबाचे राजपूत सरदार मिर्झाराजे जयसिंग.. यांचे घराणे म्हणजे प्रभू रामचंद्रचे पुत्र कुश यांची शाखा म्हणून यांना कुशवाह/कछवाह अशही म्हटलं जातं.. त्या घराण्याला मोगलांनी #मिर्झाराजे हा किताब दिला...( संदर्भ:- ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा- डॉ सदाशिव शिवदे)
किताब सहावा :- #अफजलखान :-
हे नाव नसून ऐक किताब आहे.. विजापूरच्या दरबारातील भटारखाण्यात असणाऱ्या भटारणीचा पुत्र #अब्दुल्ला_भटारी त्याला सरदार झाल्यावर *
#अफजलखान हा किताब दिला.. (अफजल :- उत्तम,श्रेष्ठ)..(संदर्भ :- इतिहासाच्या पाऊलखुणा)
किताब:-सातवा #सर्जेराव :- _
#कान्होजी_जेधे हे शिवाजी महाराजांचे विश्वासू सुभेदार होते. त्यांना बाजी, संभाजी,शिवजी, चांदजी,नाईकजी, सयाजी असे सहा पुत्र होते.. यातील मोठा मुलगा बाजी यांनी #फतेहखानाच्या लढाईत झेंडा परत आणण्याची कामगिरी केली होती याबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना #सर्जेराव हा किताब देऊन सम्मानीत केले..._( सर्जेराव :- प्रांताचे अगर राज्याचे भूषण) ( संदर्भ:-ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ.सदाशिव शिवदे)
किताब:- नववा :- #प्रतापराव
इ.स. १६६६ मध्ये नेताजी पालकर यांच्या जागी शिवाजी महाराजांनी #कडतोजी #गुजर यांना सरनोबत बनवून त्यांना #प्रतापराव हा किताब दिला...( प्रतापराव:- शूरवीर)(संदर्भ :-इतिहासाच्या पाऊलखुणा)
किताब:- नववा :- #प्रतापराव
इ.स. १६६६ मध्ये नेताजी पालकर यांच्या जागी शिवाजी महाराजांनी *कडतोजी गुजर* यांना सरनोबत बनवून त्यांना *प्रतापराव* हा किताब दिला...( प्रतापराव:- शूरवीर) (संदर्भ :-इतिहासाच्या पाऊलखुणा)
किताब:- आठवा :- #सरदेसाई
इ.स. १६५७-५८ मध्ये खेमसावंतांचा मुलगा #लखम_सावंत यांनी कुडाळच्या देसायांचा मुलुख बळकावला आणि शिवाजी महाराजांचे मांडलिकत्व स्वीकारले.. त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांना *सरदेसाई* हा किताब दिला.._ (सरदेशाई :- जकात/सारा वसूल करण्याचा अधिकार असलेला मुख्य अधिकारी..
(संदर्भ:- ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ सदाशिव शिवदे)
किताब :- दहावा :- #विश्वासराव
आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटून येताना शिवाजी महाराजांनी लहान वयाच्या शंभूराजे हे प्रवासाच्या दगदग सोसणार नाहीत तसेच पाळतीवर असलेल्या मोगल सैन्यापासून शंभूराजांची तात्पुरता सुटका व्हावी म्हणून शंभराजे यांना मथुरेत *मोरोपंताच्या* नातेवाईकांकडे ठेवले.. पुढे जेव्हा राजे स्वराज्यात पोहोचले त्यानंतर त्या नातेवाईकांनी म्हणजेच #कृष्णाजीपंत_काशीपंत आणि #विसाजीपंत या बंधूंनी शंभूराजे याना राजगडावर सुखरूप पोहोचवले त्यावेळी महाराजांनी त्यांना #विश्वासराव हा किताब दिला व पालखी,घोडे,सरंजाम व बहुमानवस्त्रे दिली..._ (विश्वासराव :- विश्वासास पात्र) (संदर्भ:- सभासद बखर)
किताब :- अकरावा :- #हंबीरराव
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या #हंसाजी_मोहिते नामक धारकऱ्याला सरनोबत करून त्याला #हंबीरराव हा किताब दिला.. पण हंबीरराव हा किताब या घराण्याला पूर्वीपासून होता असे काही फारसी कागदपत्रात उल्लेख आहेत.. हंबीरराव हा किताब पूर्ण घरण्याला दिलेला असल्याचं दिसून येतं..कारण पुढे बऱ्याच कागदपत्रात अनेक व्यक्तींनी हा किताब धारण केल्याचे दिसून येते.. हंबीरराव हा #अमीरराव या शब्दाचा अपभ्रंश आहे.._
( अमीर या शब्दाचा अर्थ :- अधिकारी, शासक, हुकूम देणारा असा होतो)
(संदर्भ :- सभासद बखर)
किताब:- बारावा :- #राजदूत
छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्यावर केलेल्या स्वारीत पोर्तुगीज यांचा पूर्ण पराभव केला. मोहिमेचा गोव्याच्या *व्हाइसरॉवर* एवढा परिणाम झाला की त्याने गोवा येथील आपली राजधानी मार्मागोव्याला हलविण्याचा बेत केला त्याने संभाजी राजांच्या वकीलास *राजदूत* हा किताब दिला..(हा किताब ऐका पोर्तुगीजाने शंभूराजे यांचा वकीलास दिलाय.) तसेच संभाजी महाराजांना फक्त राजा असे संबोधणारे पोर्तुगीज आता छत्रपती अस अभिधान लाव लागले.._
(राजांचा दूत :- राजदूत)(संदर्भ:-ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ.सदाशिव शिवदे)
किताब :- तेरावा #कुलदख्तीयार
छत्रपती संभाजीराजे गोव्याच्या मोहिमेवर जाऊन आले आणि त्यांनी रायगडावर आल्यावर त्यांचे मित्र तसेच सल्लागार असणारे *कवि कलश* यांना सर्वाधिकार देऊन त्यांना #कुलदख्तीयार हा किताब दिला.._
(कुलदख्तीयार :- सर्व अधिकार असणारा व्यक्ती)
(संदर्भ :- ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा :- डॉ सदाशिव शिवदे)
किताब :- चौदावा :- #मुक्कर्रबखान
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगाजेबाने दक्षिणेतील पातशाह्या आणि मराठी साम्राज्य नष्ट करायचा चंग बांधला आणि दक्षिणेची मोहीम सुरू केली..त्याने आधी कुतुबशाही आणि आदिलशाही संपवायचे ठरवले..त्याने गोवळकोंड्याच्या किल्लेवर हल्ला चढविला.. किल्ला सर होत नाही असे दिसताच त्याने कुतुबशाहचा सरदार शेख निजाम याला फितूर केला त्यास *मुक्कर्रबखान* हा किताब आणि ६ हजार मनसब इतर इनाम दिले..याच मुक्कर्रबखानाने पुढे शंभूराजे यांना पकडून कैद केले होते.._ (मुक्कर्रब :- जवळचा/निकटस्थ)
(संदर्भ :- ज्वलजवलनतेजस संभाजीराजा :-डॉ सदाशिवराव शिवदे)
किताब :- पंधरावा :- #झुल्फिकारखान
छत्रपती शंभूराजांच्या अटकेनंतर मोगल सरदार इतिकादखान याने रायगडावर वेढा घालून रायगड ताब्यात घेतला या कामगिरी बद्दल औरंगजेबाने त्याला झुल्फिकारखान किताब दिला..._
(झुल्फिकारखान :- ऐका प्रेषित महमंद याचा तलवारीचे नाव होते)
(संदर्भ :- मोगल दरबारची बातमीपत्र)
किताब:- सोळावा :- १)#ममलकतमदार ,२) #हिंदुराव , ३)#अमीर-उल-उमराव, ४)#हिम्मतबहाद्दर
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ऑगस्ट १६८९ मध्ये संताजी घोरपडे आणि सहकाऱ्यांनी औरंगजेबाच्या छावणीवर छापा घातला आणि शाही डेऱ्याच्या तंबूचे तणावे कापले आणि सोन्याचे कळस कापून आणले या गोष्टींवर खुश होऊन राजाराम महाराजांनी संताजीस #ममलकतमदार , संताजी यांचे बंधू बहिर्जी यांना #हिंदुराव, तसेच मालोजी यांना #अमीर उल-उमराव आणि विठोजी चव्हाण यांना #हिम्मतबहाद्दर असे किताब दिले.._
ममलकतमदार :- प्रांताचा आगर देशाचा आधारस्तंभ,
हिंदुराव :-हिंदुधर्म प्रेमी (याचा दुसरा अर्थ नाही) ,
अमीर-उल-उमराव :- श्रीमंतामधील श्रीमंत ,
हिम्मतबहाद्दर :- धाडसी वीर किंवा शूरवीर..(संदर्भ :- चिटणीस बखर)
किताब :- सातरावा :- १)#हुकूमतपनाह, २)#राजाज्ञा,३)#जयसिंगराव...
झुल्फिकारखाने रायगड घेतला आणि राजाराम महाराजांना महाराष्ट्र सोडून जाणे भाग पडले पण दक्षिणेत जिंजीकडे गेल्यावर राजाराम महाराजांनी चार विश्वासू माणसांच्या हातात स्वराज्याचा कारभार सोपविला ते चार लोक म्हणजे रामचंद्रपंत भादणेकर, शंकराजीपंत गाडेकर, संताजी घोरपडे, धनाजी जाधव.. त्यावेळी महाराजांनी रामचंद्रपंतांना #हुकूमतपनाह हा किताब देऊन गौरविले आणि ते जे हुकूम करतील ते प्रसंगी छत्रपतींनीही मोडू नयेत असे केले.. तसेच राजाराम महाराजांनी शंकराजीपंत गाडेकर याना #राजाज्ञा हा किताब बहाल केला..काही कागदपत्रात शंकराजीपंत यांचा उल्लेख मदार-उल-महाम असा होतो.. तसेच अजून ऐक धनाजी जाधव यांनाही #जयसिंगराव हा किताब दिला.._
हुकूमतपनाह:- हुकूम करणारा अधिकार असलेले.
राजाज्ञा:- ज्यांची आज्ञा राजाच्या आज्ञासारखीच समजावी,
जयसिंगराव:- विजय वीर(शेर)
संदर्भ:- १) भारत इतिहास संशोधन मंडळ त्रैमासिक वर्ष ९४,लेख -राजाराम छत्रपती,
२)महाराष्ट्रतील प्रसिद्ध सरदार घराणी,
३)इतिहासाच्या पाऊलखुणा
किताब :-अठरावा :- #रायातराव
हरजीराजे महाडिक यांच्या पूर्वजांना विजापूरच्या बादशहांनी *रायातराव* किताब दिला होता.._(रायातराव:- रायांचे राव)
(संदर्भ:-ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा)
किताब :- एकोणीसावा :- #सरखेल आणि #वजारतमाब
छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मराठा आरमाराची जबाबदारी #कान्होजी आंग्रे यांच्याकडे आली त्यांनी आरमार बळकट केलं. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर कान्होजींच्या कामाची दखल #ताराराणीसाहेबांनी घेतली आणि कान्होजींची मराठा आरमाराचे मुख्य अधिकारी म्हणून निवड केली. #बाळाजी विश्वनाथ यांच्या मध्यस्थीने त्यांना 'सरखेल' आणि 'वजारतमाब' हे किताब वंशपरंपरागत कायम केले._(सरखेल :- आरमार प्रमुख-एडमिरलं, वजारतमाब :- वजीराच्या योग्यतेचा..)
(संदर्भ:- दर्याराज कान्होजी आंग्रे :-डॉ सदाशिव शिवदे, मराठा आरमार -एक अनोखे पर्व :- डॉ सचिन पेंडसे)
किताब :- विसावा :- #सेनाखासखेल
#खंडेराव दाभाडे यांची एकनिष्ठ सेवा,उत्तम प्रकारची मसलत व लढाईचे धाडस पाहून राजाराम महाराजांनी त्यांना #सेनाखासखेल हा किताब दिला..आणि वस्त्रे,शिरपेज,हत्ती,घोडा, निशाण,व जरीपटका दिली.._
(सेनाखासखेल :- राजाच्या थेट नियत्रणाखाली असणाऱ्या घोडदळचा प्रमुख)
(संदर्भ:- दाभाडे घराण्याचा इतिहास)
किताब :-ऐकविसावा :- #सेनाकर्ते
#छत्रपती_शाहू_महाराज मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यावर स्वराज्याची घडी विस्कलेली होती त्यावेळी बाळाजी विश्वनाथ यांनी काही काळातच मोठी सेना उभी केली अनेक बंडे मोडून काढली शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना #सेनाकर्ते किताब देऊन गौरविले.._(ज्यांनी सैन्य उभे केले ते सेनाकर्ते)
(संदर्भ :- इतिहासाच्या पाऊलखुणा)
किताब :- तेवीसावा:- #समशेरबहाद्दर
#मराठेशाहीतील ऐक सुप्रसिद्ध घराणे म्हणजे गायकवाड घराणे या घराण्याचे मुळपुरुष #दमाजी_गायकवाड हे खंडेराव दाभाडे यांच्या सैन्यात सरदार होते.. या दमाजी गायकवाडांनी निकामांवरी झालेल्या बाळापूर येथील लढाईत बराच नावलौकिक मिळवला म्हणून खंडेरावांनी त्यांची शिफारस छत्रपती शाहू महाराजांकडे केली तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना #समशेरबहाद्दर हा किताब दिला.._(समशेरबहाद्दर:- तलवारबाजी मध्ये पटाईत असणारा)
(संदर्भ :-खोबरेकर वि.गो गुजरातेतील मराठी राजवट पुणे १९६२)
किताब :- चोवीसावा:- #असफजाह
पालखेडला बाजीरावांनी निजामाला धूळ चारली होती.. त्यांनतर १० वर्षांनी मोगलांकडे बाजीरावांशी लढायला, टक्कर द्यायला कुणी पर्याय नव्हता म्हणून पंगत बादशहांनी त्याला परत बोलावून त्याची शाही बडदास्त ठेऊन त्याला #असफजाह किताब दिला आणि सैन्य देऊन मराठ्यांच्यावर रवाना केले..._
(असफजाह:- प्रमुख सल्लागार) (संदर्भ :-मराठी रियासत खंड ४)
किताब:- पंचवीसावा:- #उमदेतुल्मुल्क
इ.स.१७७५ नन्तर जेव्हा नजीबखान रोहिला पाने दिल्ली ताब्यात घेतली होती तेंव्हा पेशव्यांचे सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी १५ दिवस लढून दिल्ली सर केली म्हणून विठ्ठल शिवदेव यांना बादशहाने चांदवड ची जहागीर व *उमदेतुल्मुल्क* हा किताब दिला..._(उमदेतुल्मुल्क:- राज्याचे आधारस्तंभ)
(संदर्भ:- इतिहासाच्या पाऊलखुणा, विचुरकर घरण्याचा इतिहास:-हरी रघुनाथ गाडविड)
किताब सहसविसावा:- #हिंदुराई
विश्वासनिधी राजमान्य राजश्री देवजी सोमवंशी यास पत्र जे, टुह्मी स्वामीचे एकनिष्ठ सेवक, सेवा बहुत निष्ठेने केली ,याकरिता तुह्मांवरी स्वामी कृपाळू होऊन #हिंदुराईचा किताब दिल्हा ह्मणून पत्र १.
(संदर्भ .छत्रपती थोरले शाहू महाराज रोजनिशी)
किताब संपले आहेत.. पुढे आजून कोणास संदर्भासहित काही माहिती असेल तर कमेंट मध्ये द्यावी नवीन काही माहिती देण्याचा प्रयत्न असेल..
संकलन :--@anil mali,
Sandip Shivale
No comments:
Post a Comment