विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 30 October 2020

#जकातीचा_रांजण #Toll_tax


#जकातीचा_रांजण
काटी ( तुळजापूर तालुका ) पासून व धामणगाव ( वैराग जवळ ) या दोन्ही गावाच्या मध्ये प्राचीन व्यापारी मार्गावरील हा जकातीचा रांजण आहे.
पुर्वी राजसत्तेच्या सीमा शिथिल असायच्या.
इ. स. पुर्व 230 पासून ते इ. स. 200 पर्यंत महाराष्ट्र व दक्षिण भारतातील काही भागात सातवाहन राजवंश सत्तेत होता त्यांच्या या चारशे वर्षाच्या काळात इथे व्यापाराला उत्तेजन मिळाले त्यामुळे येथील उत्पादीत मालाला भारतासह युरोपात बाजारपेठ मिळाली.
याच सातवहान काळात उस्मानाबाद तालुक्यातील तेर ( प्राचीन तगर ) या गावाला वैभवशाली असा इतिहास लाभला आहे ही सातवाहान राज्याची आर्थिक राजधानी होती असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. त्याच प्रमाणे उस्मानाबाद परिसरात उगम पावणारी भोगावती नदी किनारी प्राचीन काळी सातवहन कालीन वसाहती अस्तित्वात होत्या त्याचे पुरावे आज ही पाहिला मिळतात. कारण या वंशातील राजे स्वतःला तगरपुराधिश्वर निवासी हे बिरुद लावत.
तसेच पैठण ही महाराष्ट्रातील मुख्य राजधानी असल्याने दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश, कर्नाटक तसेच किनारी भागातील प्राचीन व्यापारी मार्ग हे आंध्र ते हैद्राबाद - कल्याण - उमरगा- नळदुर्ग- तुळजापूर उस्मानाबाद ते तेर तेथुन 20 दिवसाच्या मुक्कामाने पैठण ला जात तर नाणेघाट येथून येणारे मार्ग हे पुणे मार्गे बालाघाटात पोंहचत.
आज ही काटी पासून तुळजापूर ते सिद्धश्वर वडगाव ते उस्मानाबाद जवळ , सातवाहन नागरी वसाहती मिळाल्या आहेत.
त्याचप्रमाणे मध्ययुगातील औरंगाबाद वरून दक्षिण भारतात उतरणाऱ्या मार्गात हा एक मार्ग आहे तो म्हणजे औरंगाबाद ते बीड ते परंडा ते बार्शी ते पानगाव ते धामणगाव ते काटी व सोलापूर.
( सांगायचे तात्पर्य हेच की प्राचीन काळापासून जे मार्ग असत त्याच मार्गावर नंतर चे मार्ग असत )
तसेच पुण्यावरून येणाऱ्या मार्गावर काटी लागते याअर्थाने काटी हे व्यापारी मार्गावरील महत्वाचे ठिकाण असल्याने आपल्याला काटी या गावी प्राचीन शिवमंदिर, सावरगावी जैन मंदिर, तसेच काटी इथे मध्ययुगीन मस्जिद याची साक्ष देतात.
महाराष्ट्रात त्याकाळी, भोकरदन, जुन्नर, कल्याण, सोपरे, कराड इ. ठिकाणी व्यापारी केंद्रे अस्तित्वात होती.
यातील तेर हे ठिकाण जास्त महत्वाचे होते हे येथील पुरातत्त्वीय उत्खननातील मिळालेल्या वस्तू व परदेशी प्रवासी यांनी केलेल्या नोंदी वरून कळते ( पेरिपल्स ऑफ दि ऐथेरियन सी पुस्तकात या ठिकाणाचा उल्लेख आहे )
येथे हस्तिदंती वस्तू त्यात बंगड्या, कज्जल शलाका, मनी मोती, खेळणी, रोम येथील नाणे, सातवाहान यांची नाणी, गोणपाट, तलम कापड, तसेच या ठिकाणी रोमन लोकांची वस्ती चे अवशेष मिळाले आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इथे रोम मध्ये बनवलेली दारू आयात केली जात होती त्यांची मद्यकुंभ मोठ्या प्रमाणावर मिळाले आहेत.
हाच व्यापार इतका मोठा होता की, रोम येथील पैसा भारतात येत होता कारण, भारतातील मसाले व सौन्दर्य प्रसादने व वस्त्र हे भारतातून निर्यात केले जात व या वस्तू वापरणे हे प्रतिष्ठा वाढवणारे होते म्हणून याचा वापर इतका मोठा होता की, रोम येथील संसदेत ठराव करून या मालावर तेथे बंदी घालण्यात आली होती.
याचा अर्थ आपल्या व्यवसायकांनी इतकी मोठी बाजारपेठ काबीज केली होती.
महाराष्ट्रातील नाणेघाट, गुजरी घाट, सैंधव घाट, दक्षिणेतुन येणारे मार्ग तसेच पैठण हुन उत्तर भारतात जाणारे मार्ग यावर जकाती साठी या चौक्या होत्या, इथे जकात म्हणून जो पैसा घेतला जाई तो या रंजणात ठेवला जाई.
नाणेघाट येथील रांजण हा काटी येथील रांजणापेक्षा मोठा आहे.
पण येथील या रांजणावरून हा प्राचीन व्यापारी मार्ग होता हे मात्र नक्की.
दुर्दैव असे की सोलापूर ते तुळजापूर हायवे पासून हा जवळ च असून देखील याठिकाणी याचा उल्लेख असणारा एकदा फकल देखील नाही.
जयराज खोचरे
पुरातत्व व इतिहास

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...