॥ *विश्ववंदनीय* ॥
🌹" *श्री छत्रपती शिवाजी महाराज* ".🌹
छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या लहानपणी लालमहालात रहात होते. एकदा एक लग्नाची वरात लालमहलाच्या खालून चालली होती. शिवाजी महाराज महालाच्या खिडकीतून ती वरात न्याहाळत होते. त्या वरातीत एक मुलगा उत्तमरित्या दांडपट्टा चालविण्याचे प्रात्याशीके दाखवित होता. शिवाजी महाराजही कुतूहलाने त्या मुलाचे दांडपट्ट्यावरची पकड व कसब पारखीत होते. त्या मुलाचे विलक्षण कर्तब पाहून शिवाजी महाराज बेहद्द खुष झाले व नंतर विचापुस करण्यास भेटीस बोलाविले. दोन वेळचं कसंबसं जेवण मिळावं एवढंच काय ती कमाई असं तो सांगतो. पण महाराज त्याला आपल्या पदरी नोकरी देऊ करतात. चांगली पगारपाणी मिळत आहे म्हणून तोही खुष. इतर कामांबरोबर त्या मुलाची अजुन उत्तम दांडपट्टा तालमीची , सरावाची तजविज करतात सोय करतात.
(काहींच्या मते हा लहान मुलगा उमरठ या गावी जत्रेत बाल शिवाजी राजांना भेटला होता. पण तो कुठेतरी दांडपटट्याचं खेळ दाखवताना दिसला हे महत्त्वाचे)
अशाप्रकारे शिवाजी महाराज वयाच्या बाराव्या वर्षा पासुन एक-एक हिरा पारखीत, त्यांच्या पोटापाण्याची आधी सोय करीत, पगारी नोकरीत ठेवून घेत आणि मग त्या हिरयांना पैलू पाडत. अशाचप्रकारे शिवाजी महाराज अनेक लोकांना आपल्या वक्तृत्व कौशल्याने जवळ करीत, प्रथम त्यांच्या पोटापाण्याची सोय करीत, उपजीविकेची साधणे उपलब्ध करीत, पिण्याच्या पाण्याची विहीरी, पाणवटे बांधून सोय करीत, शेतीच्या कामाला लागणारी अवजारे, बैल, बिजं पुरवीत असत व पावसा-पाण्याअभावी शेतीची कामे रखडू नयेत म्हणून पाणी अढवून पाटबंधारे बांधले. अशाचप्रकारे लोकांची -रयतेची काळजी वाहत गेले, जगण्याची-उपजीविकेची कामे मार्गी लावत गेले, चांगल्या पगाराच्या नोकरया उपलब्ध करत राहीले आणि मग शिवाजी महाराज लोकांसमोर, परकिय आक्रमकांच्या प्रस्थापित राजसत्तांच्या अत्याचारी राजवटीचा विषय छेडीत, रयतेजवळ स्वातंत्र्याचे, स्वराज्याचे, स्वराज्यनिर्मीतेचे विषय छेडंत, विचार ठेवत, संक्लपना मांडत आणि स्वाभिमान जागवीत ध्येयं प्राप्तीची ओढ निर्माण करीत, रयतेचे राज्य निर्माण होण्यास लोकांना प्रवृत्त करीत.
जसं-जसं लोकांचा-रयतेचा दृढविश्वास वाढू लागला, बसू लागला की आपल्या पश्चात, जर आपण जगलो-वाचलो नाही तर आपला राजा आपल्या कुटुंबीयांचा सांभाळ करील पालनपोशन करील असा ठाम विश्वास मनात रूजू लागला तसे-तसे लोकं-रयत शिवाजी महाराजांच्या मागोमाग त्यांचा पाऊलांवर पाऊल ठेवत अबालवृद्ध, गोर-गरीब, आया-बहीणींच्या, जन-सामान्यांच्या राक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यनिर्मीतेच्या ध्येयासाठी मार्गक्रमण करू लागले, आक्रमकांची आक्रमणं कापून काढण्यासाठी फौज उभी राहू लागली.
स्वराज्याच्या नुसत्याच गप्पा मारल्या असत्या आणि लढ म्हणतोय म्हणून लढा असे म्हटले असते तर लोकं पाठीशी उभी राहीली असती का, उत्तर नाहीच असतं. लोक-कल्याणार्थ प्रशासकिय सेवेच्य माध्यमातून, व्यवस्थापन सुत्रांची मुल्य राखून शिवाजी महाराजांचं व्यक्तिमहत्व चमकू लागलं, जोडीला परिणाम-दक्षता (कमीटमेंट) हा गुण प्रकर्षाने लोकांना जाणवू लागला म्हणून गोर-गरीब जन-सामान्य लोकं, आक्रमकांच्या लुटमारीच्या पायांखाली तुडवली जाऊ नये , अब्रुंची लक्तरे अजुन उडवली जाऊ नये याच्या बंदोबस्तासाठी ईमानी छातीची ढाल करून किल्ल्यांच्या तटबंदी समान महाराजांच्या अवती-भवती जमू लागली.
जो मुलगा दांडपट्टा चालवण्यात तरबेज होता तोच मुलगा पुढे जाऊन १० नोवेंबर १६५९ साली अफजल वधाच्या वेळी शिवाजी महाराजां समवेत जे दहा अंगरक्षक होते त्या पैकी तो मुख्य अंगरक्षक होता तो हा "जिवा महाले". अफझलखानाचा मुख्य अंगरक्षक होता 'बडा सय्यद' ज्याला सय्यद बडांही म्हणत, हा वीस फूट लांब उडी मारू शकत होता. जिवा महाले पंचविस फूट लांब उडी मारीत असे. अवाढव्य असा 6.5 फूट उंचीचा आणि 175 किलो वजनाचा अफजलखानाचा खेळ शिवाजी महाराजांनी फक्त १० सेकंदात संपवला.
प्रत्यक अंगरक्षकाची कामे वाटून दिली होती, जिवा महालेचं काम होतं शिवाजी महाराजांवरचा हल्ला कापून काढणे आणि बडा सय्यदने तलवार उगारली तेव्हा जिवा महालेने त्याचा हात दांडपट्ट्याने वरच्यावर उगारलेला हात हवेतच कापला.
वृत्तपत्रांच्या दुनियत छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले भारतीय आहेत ज्यांचं नाव त्या काळात एका वृत्तपत्रात छापून आलं ते म्हणजे इंग्लंडचं "लंडन गॅजेट" आणि छत्रपती शिवाजी महाराज हे नाव साता-समुद्रा पार अजरामर झालं हे विशेष.
शिवाजी महाराज जेव्हा आग्रयाला औरंगजेबच्या भेटीला गेले तेव्हा त्यंना बघायला अक्खं दिल्ली-आग्रा शहर लोटलं. एक कुतूहल होतं की ज्या 'अफजलखानाने' 'औरंगजेबला' जवळजवळ कैदच केलं होतं पण नशीबाने सुटला, त्या अफजलखानाला मारणारा कसा दिसतो हे लोकांना पहायचं होतं. लोकं एकमेकांना विचारायची अरे हे कोण आहेत, मग काहीजणं उत्तर द्यायची अरे हेच ते शिवाजी महाराज ज्यानी अफझलखानाचा वध केला.
टिप्पणी : अफझलखान हे प्रकरण स्वराज्यावर अचानकपणे नव्याने उदभवलेले संकट कधीच नव्हते. अफजलखानाचा वध हा विचारपुर्वक आखलेला, एका नराधमाला जेरबंद करण्यासाठीचा सापळा होता, कुट्नीती, दुरदृष्टी, धुर्तपणा, मुत्सद्दीगीरी आणि राजकारण साधण्यासाठीचा भाग होता. मररा्हठ्यांच्या राजसत्तेचा - स्वराज्याचा पाया भक्कम रोवण्याचा, प्रस्तापीत करण्याचा तो भाग होता हे विशेष, कारण :
१) स्वराज्य जे निर्माण करायचं होतं त्यासाठी जी भुमी संपादीत करायची होती ती अदिलशाहीच्या आधिपत्याखालील प्रदेश कुरतडून आणि यासाठीचा मुख्य लढा होता तो अदिलशाही दरबाराचा बलाढ्य सरदार "अफजलखान" याच्याशी. ज्या दिवशी महाराजांनी जावळी काबीज केली किंवा जिंकून घेतली, त्याचवेळी अफजलखानाची कबर खोदण्याची जागा निश्चित झाली.
२) संकल्प : स्वराज्य - अखंड भारत. या ध्येयपुर्ततेसाठी जो अखिल भारतीय अंतिम लढा होता तो मोघल साम्राज्याशी होता ज्याचा नेता होता, स्वतःला आलमगीर म्हणवणारा बादशहा औरंगजेब.मुख्य म्हणजे शिवाजी महाराज नाईलाजास्तव पण स्वमर्जीने औरंगजेबाच्या भेटीस आग्र्याला गेले होते, पण ते परत स्वराज्यात पळून आले नव्हते, पेटारयात लपून बसून तर मुळीच नाही, राजकारण साधता आलंं नाही म्हणून निघून आले होते,इथे बादशाह औरंगजेबचा नाईलाज झाला होता. इथे दोघांमधे तुंबळ युद्ध झाले पण ते वैचारिक पातळीवर.शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी त्याने तीन लाखांची फौज तैनात केली होती पण ते कार्य विफल ठरले कारण जन-सामान्यांचा कौल मिळवण्यात राजे यशस्वी झाले.
No comments:
Post a Comment