कोण आहेत
पेंढारी
इतिहासात वावरताना पेंढारी हा शब्द बऱ्याचदा येतो.
मुख्यतः
प्रजेला अतोनात त्रास देण्यासंदर्भात ह्यांचे उल्लेख जास्त आहेत. रयतेची
लूटमार किंवा रस्त्यातील वाटमारी करणाऱ्या संघटित टोळ्या म्हणूनही ह्यांचा
उल्लेख करण्यात येतो.
मराठ्यांच्या इतिहासातही हे पेंढारी असून 'मराठ्यांनी पेंढारी मोडून काढले' असे उल्लेख आढळतात.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
हे पेंढारी लोक मुघलशाहीच्या पडत्या काळात म्हणजे औरंगजेबाच्या शेवटच्या २० वर्षात प्रथम पुढे आले. पुढे जाऊन टिपू व फ्रेंच यांचा पराभव झाल्यावर त्यांच्या विसर्जित सैन्यातून काही पेंढारी पथके बनली.
हे पेंढारी लोक मुघलशाहीच्या पडत्या काळात म्हणजे औरंगजेबाच्या शेवटच्या २० वर्षात प्रथम पुढे आले. पुढे जाऊन टिपू व फ्रेंच यांचा पराभव झाल्यावर त्यांच्या विसर्जित सैन्यातून काही पेंढारी पथके बनली.
एकोणिसाव्या
शतकात हिंदुस्थानातील देशी राज्ये खालसा होऊन इंग्रजांचा अंमल जसजसा जास्त
वाढत गेला, तसतसे पेंढाऱ्यांचे आश्रयस्थान असलेली देशी राज्यांची सैन्ये
नाहीसे होत चालल्याने पेंढाऱ्यांनी आपली स्वतंत्र पथके बनविली.
पेंढारी या शब्दाच्या उत्पत्ती बद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत.
काहींच्या मते ‘पेंढारी’ हा शब्द मराठी असून पेंढ व हारी या दोन शब्दांपासून झाला आहे व त्याचा अर्थ गवताची पेंढी किंवा मूठ पळविणारा असा होतो. उत्तर भारतात पिंडारी अशीही संज्ञा रूढ आहे. पिंड म्हणजे अन्नाचा घास. तो पळविणारा म्हणजे पिंडारी.
काहींच्या मते ‘पेंढारी’ हा शब्द मराठी असून पेंढ व हारी या दोन शब्दांपासून झाला आहे व त्याचा अर्थ गवताची पेंढी किंवा मूठ पळविणारा असा होतो. उत्तर भारतात पिंडारी अशीही संज्ञा रूढ आहे. पिंड म्हणजे अन्नाचा घास. तो पळविणारा म्हणजे पिंडारी.
हे
पेंढारी वाटेल त्या राजाच्या सैन्याबरोबर असत. ह्यांच्यात निष्ठा भाव नसून
जिकडे पैसे तिकडे हे लोक जात असत. ह्यांना आपला मालक बदलायला वेळ लागत
नसे. यांना सरकारकडून पगार नसे. मात्र शत्रूच्या प्रदेशात खंडणी वसूल
करताना तिच्यापैकी काही ठराविक भाग ह्या पेंढाऱ्यांना मिळत असे. शत्रूची
धान्यसामुग्री लुटणे व त्यांच्या देशाची खराबी करणे हे काम पेंढाऱ्यांकडे
सोपविलेले असे.
खंडणी
वसुलीसाठी ‘पेंढारी’ हे मारहाण, दहशत, लुटालूट जाळपोळ असे असतील नसतील ते
सगळे मार्ग वापरायचे. टोळधाडीत आणि ह्यांच्यात फारसा फरक नव्हता. त्यामुळे
रयतेत त्यांच्याविषयी दहशत असे.
पेंढाऱ्यांचे
मुख्य हत्यार भाला आणि तलवार असे. हे घोडेस्वार असून यांचे घोडे फार चपळ
असत. कधी कधी हे रोजी ३० कोसांची (साधारण ९० किलोमीटर ) मजल मारीत. यांना
तंबू, डेरे वगैरे लागत नसत.
(आता घोडा एका दिवसात किती चालू पळू शकतो? तर
घोडा हा कुठल्या जातीचा आहे त्यावर हे ठरते. साधारणतः घोडा एका दिवसात
साधारण ३० ते ३५ किलोमीटर चालू-पळू शकतो. पण काही अपवाद वगळता जसे कि
वातावरण आणि घोड्याची शारीरिक स्थिती पाहता घोडे ९० ते १०० किलोमीटर
गेल्याचेही उदाहरणे आहेत. अमेरिकेत टेव्हीस कप म्हणून
एक घोड्यांच्या शर्यतीची स्पर्धा भरते. १०० मैल म्हणजे १६० किलोमीटर
अंतराची हि स्पर्धा असते. ह्या स्पर्धेत एक घोडा ११.५ तासात १०० मैल अंतर
पार करून गेला होता. अधिकच्या माहितीसाठी अभ्यासू मंडळींनी गुगलवर Tevis
Cup असे सर्च करावे. )
पेंढाऱ्यांच्या
संख्येबद्दल व एकूण कारवायांबद्दल अनेक अतिरंजित कथा रूढ आहेत. कॅ. सीडनॅम
याच्या मते माळव्यात पेंढाऱ्यांच्या घोडेस्वारांची संख्या ३०,००० होती तर
कर्नल जेम्स टॉडच्या मतानुसार ती संख्या ४१,००० होती.
१८१४
मध्ये पेंढाऱ्यांची संख्या साधारणत: २५,००० ते ३०,००० च्या दरम्यान असावी
आणि त्यांपैकी निम्म्याहून कमी लोक शस्त्रधारी असावेत, असे बहुतेक इंग्रज
इतिहासकारांचे मत आहे.
पेंढाऱ्यांच्या
छळाचे जे वर्णन इंग्रज इतिहासकारांनी केले आहे ते अतिशयोक्तीचे आहे एवढेच
नव्हे तर पेंढाऱ्यांची संख्याही इंग्रज इतिहासकार जास्त फुगवून सांगतात
असे सर चार्लस मनरो म्हणत असे.
पेंढाऱ्यांची
कुटुंबे विंध्य पर्वताच्या जंगलात, पर्वतश्रेणींत व नर्मदा नदीच्या
खोऱ्यात राहत असत. सुरुवातीला पेंढाऱ्यांमध्ये पठाण लोकांचा अधिक भरणा
होता; पण पुढे पुढे सर्व जातिजमातीमधील लोक त्यांत सामील झाले.
शत्रूवर
पद्धतशीर हल्ला करण्याइतके ते शूर नव्हते पण सैन्य जाऊ शकणार नाही अशा
दुर्गम मार्गाने हे पेंढारी जाऊन अचानक हल्ले करून लूटमार करीत व धान्य
लुटून नेत आणि जे नेता येत नसे त्यांचा नाश करीत असत.
पेंढाऱ्यांच्या
टोळ्यांना दुर्रे असेही म्हणत. पेंढाऱ्यांच्या लहान टोळ्या असल्याने
लुटीला सोयीच्या असत. लूट, जाळपोळ, अनन्वित अत्याचार यांबद्दल पेंढाऱ्यांची
कुप्रसिद्धी होती. कित्येकदा एखाद्या गावास पूर्वसूचना देऊन ते खंड वसूल
करीत व खंड न दिल्यास ते गाव जाळून टाकत.
चिंगोळी व हुलस्वार हे पेंढारी-पुढारी आपल्या अनुयायांसह पानिपतच्या युद्धात मराठ्यांच्या सैन्यात सहभागी झाले होते.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
इंग्रजी अमंलात पदच्युत झालेले संस्थानिक राजे ह्या पेंढाऱ्यांचे साहाय्य घेत असत. शिंदे-होळकरांकडील पेंढारी शिंदेशाही व होळकरशाही म्हणून ओळखले जात.
इंग्रजी अमंलात पदच्युत झालेले संस्थानिक राजे ह्या पेंढाऱ्यांचे साहाय्य घेत असत. शिंदे-होळकरांकडील पेंढारी शिंदेशाही व होळकरशाही म्हणून ओळखले जात.
हेरा व बुरन हे पेंढाऱ्यांचे पुढारी होते. दोस्त मुहम्मद व चीतू नावाचे पुढारी पुढे प्रसिद्धीस आले.
करीमखान हा पुढारी खानदानी मुसलमान कुटुंबातील होता. तो तरुणपणी प्रथम होळकरांकडे व नंतर शिंद्यांकडे गेला.
शिंदे, भोसले व भोपाळचे नबाब यांच्याकडून तो पैसे घेई व लूट मिळवी. त्याच्या ताब्यात अनेक किल्ले होते.
पुढे
तो शिंद्यांनाही वरचढ झाल्यामुळे शिंद्यानी चीतू पेंढाऱ्या मार्फत ह्या
करीमखानाचा पराभव घडवून आणला. पुढे हा करीमखान अमीरखानाकडे गेला. अमीरखान
पेंढारी हा यशवंतराव होळकरांच्या अत्यंत मर्जीतील होता.
वासिल मुहम्मद, नामदारखान, मीरखान असे अनेक पेंढारी पुढारीही प्रसिद्ध होते.
चीतू
पेंढारी जवळ काही हजार घोडेस्वार, थोडे पायदळ व वीस मोडक्या तोफा होत्या.
कादरबक्ष साहिबखान, शेखदुल्ला पेंढारी हे दुय्यम नेते होते.
मराठ्यांच्या
साहचर्यातील पेंढाऱ्यांच्या अतोनात लुटारूपणामुळे मराठेही ह्या
पेंढाऱ्यांच्यामुळे लुटारू म्हणून उत्तर भारतात बदनाम झाले होते.
काळ अस्ताव्यस्त असला आणि काही धरबंध नसला कि इतिहासात असे प्रकार पहायला मिळतात.
काळ अस्ताव्यस्त असला आणि काही धरबंध नसला कि इतिहासात असे प्रकार पहायला मिळतात.
पेंढाऱ्यांना
थोडाफार आश्रय शिंदे व होळकर यांचा असे. इंग्रजांची घडी महाराष्ट्रात
नुकतीच बसत असल्याने इंग्रजांनी सुरवातीस पेंढाऱ्यांच्या वाटेस जाण्याचे
टाळले.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
पेंढाऱ्यांनी मध्यप्रांत, माळवा, गुजराथ, महाराष्ट्र, मद्रास, बिहार वगैरे प्रांतात अतोनात धुमाकूळ घातला होता.
पेंढाऱ्यांनी मध्यप्रांत, माळवा, गुजराथ, महाराष्ट्र, मद्रास, बिहार वगैरे प्रांतात अतोनात धुमाकूळ घातला होता.
इंग्रजांच्यामुळे
स्वत:चे स्वातंत्र्य नष्ट झाल्यामुळे रुष्ट झालेले बरेचसे संस्थानिक
राजे-रजवाडे ह्या पेंढाऱ्यांना आतून मदत करीत असत.
पेंढाऱ्यांचा
कायमचा बंदोबस्त इसवीसन १८१८ साली लॉर्ड फ्रान्सिस रॉडन हेस्टिंग्जने
केला. इंग्रजांच्या किरकोळ बंदोबस्ताने काही काम भागेना तेव्हां लॉर्ड
हेस्टींग्जने शिंदे, होळकर, भोसले अश्या राजे-रजवाडयांचे साहाय्य घेऊन व
सव्वा लाख स्वत:ची फौज घेऊन बंगाल, महाराष्ट्र, गुजराथ अशा तीन बाजूंनी
चालून येऊन माळव्यांत असलेल्या पेंढार्यांच्या आसर्याच्या जागांना वेढा दिला.
हेस्टींग्जने
पेंढाऱ्यांचे पुढारी असलेले अमीरखान व करीम यांना जहागिरी देऊन फोडले. हा
अमीरखान खूपच धीट होता. एखाद्या राजासारखे ह्याचे वर्तन असून हा मोठी फौज
बाळगून हा बऱ्याच राजेरजवाड्यांस धाकात ठेवत असे.
छट्टू
पेंढाऱ्याचा इंग्रजांनी पाठलाग केला. पण तो जीव वाचवून जंगलात पळून गेला.
जंगलात वाघाने त्याला खाल्ले अशी त्यावेळी वदंता होती. इंग्रजांनी
राहिलेल्या बाकीच्या प्रमुख पुढाऱ्यांस कैद अथवा ठार केले.
क्रूरपणे
हत्या आणि लुटालूट करून प्रजेस त्रास दिल्यामुळे प्रजेच्या मनात ह्या
पेंढाऱ्यांच्या विषयी कधी आत्मियभाव तयार झाला नाही आणी केवळ लुटारू पोटभरू
म्हणूनच पेंढाऱ्यांचा उल्लेख केला गेला.
(केवळ पेंढारी ह्या विषयावर खूप सखोल आणि सुंदर असे बरेच लेख लिहिता येतील इतकी माहिती माझ्याकडे आहे.)
तर असे हे पेंढारी.
(केवळ पेंढारी ह्या विषयावर खूप सखोल आणि सुंदर असे बरेच लेख लिहिता येतील इतकी माहिती माझ्याकडे आहे.)
तर असे हे पेंढारी.
लेख समाप्त.
लेखाविषयी तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये कळवा आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना 'Invite' (आमंत्रित) करा.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर
No comments:
Post a Comment