विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 24 December 2020

कंपनी सरकारचा अखेरचा शिलेदार

 





कंपनी सरकारचा अखेरचा शिलेदार
भारतात वेगवेगळ्या यांत्रिक सुधारणा आणत असतानाच ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य अधिक बळकट करण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरणारा गव्हर्नर जनरल जेम्स अँड्र्यू उर्फ अर्ल ॲाफ डलहौसी याचा आज मृत्यूदिन.
१८४८ ते १८५६ अशी आठ वर्षे डलहौसी भारतात होते. ते परतले आणि एका वर्षातच १८५७चे भारतीय स्वातंत्र्य युद्ध पेटले. त्यामुळेच १८५८मध्ये ब्रिटनची राणी व्हिक्टोरियाने जाहीरनामा प्रसिद्ध करून कंपनी सरकारची सत्ता खालसा केली व ब्रिटिश सरकारचे राज्य प्रस्थापित केले.
डलहौसीने भारतात तार-टपाल सेवा सुरू केली. त्यानेच रेल्वे आणली. शिक्षण अद्ययावत करण्यावरही त्याचा भर होता. पण हे सर्व भारतीयांचे कल्याण व उत्कर्ष यांच्यासाठी चालले नव्हते. कंपनी सरकारची सत्ता अधिक बळकट करण्यासाठीच डलहौसीचे प्रयत्न होते.
त्यासाठी त्याने अनेक हिकमती केल्या. भारतातील संस्थाने ताब्यात घेण्यासाठी नि:संतान राजांची दत्तक विधाने नामंजूर करून ते प्रदेश ताब्यात घेण्याचा सपाटा त्याने लावला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे दत्तक विधानही त्याने नामंजूर केले. अशा असंतोषातूनच १८५७च्या समराचा पुढे भडका उडाला.
असंतोष भडकू लागला तेव्हा डलहौसीला माघारी बोलावण्यात आले. त्याची इंग्लंडमध्ये मानहानी झाली. त्याच्या जागी काही काळ लॅार्ड कॅनिंग आला. पुढे चारच वर्षांत १९ डिसेंबर १८८० ला डलहौसी मरण पावला.
एक कर्तबगार प्रशासक अतिमहत्वाकांक्षेमुळे पराभूत ठरला!
-भारतकुमार राऊत

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...