विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 24 December 2020

क्रूरकर्मा जॅक्सनचा वध

 




क्रूरकर्मा जॅक्सनचा वध
नाशिकचा तेव्हाचा ब्रिटिश कलेक्टर ए टी जॅक्सन याच्या जुलमी कारकीर्दीचा प्रतिशोध म्हणून अनंत कान्हेरे या १९ वर्षांच्या युवकाने त्याचा भर नाट्यगृहात गोळ्या झाडून वध केला, तो आजचा दिवस. १९०९ साली ही घटना घडली.
नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये 'संगीत शारदा'चा विशेष प्रयोग जॅक्सनसाठी ठेवण्यात आला होता. स्वत: बाल गंधर्व काम करणार होते. जॅक्सन आपल्या आसनावर बसत असतानाच मागेच सज्ज होऊन बसलेल्या अनंत कान्हेरे व त्याच्या साथीदारांनी हल्ला केला व जॅक्सनला जागीच ठार केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांनी कवी गोविंद यांची राष्ट्रभक्तीपर कविता छापली म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला गुदरला. त्यांना अटक झाली तेव्हा जॅक्सनने त्यांना अमानुष वागणूक देऊन त्यांची भररस्त्यात धिंड काढली. याचा प्रतिशोध घेण्यासाठी कान्हेरे व त्यांचे साथीदार पेटून उठले व जॅक्सनला त्याच्या कृत्याची शिक्षा देण्याचे त्यांनी ठरवले.
नाटक सुरू झाले असतानाच कान्हेरे, विनायक देशपांडे व कृष्णाजी कर्वे या तिघांनी गोळीबार केला. जॅक्सन कोसळला पण त्यानंतर जो कोलाहल माजला त्याचा फायदा घेऊन देशपांडे व कर्वे निसटले. कान्हेरेने स्वत:च्या कपाळावर पिस्तुल ठेवले पण खटका ओढण्यापूर्वीच त्यांना अटक झाली. पुढे स्वकियांच्याच फितुरीमुळे कर्वे व देशपांडेही पकडले गेले.
अनंत कान्हेरे,विनायक देशपांडे आणि कृष्णाजी गोपाळ कर्वे या तिघांना १९ एप्रिल १९१० रोजी ठाणे कारागृहात फाशीही दिली गेली.
राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेले हे तीन नौजवान हसत हसत शहिद झाले.
- भारतकुमार राऊत

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...