विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 13 January 2021

#राजमाता #जिजाऊ #सिंदखेडराजा

 

Amol Anandrao Toraskar
जिजाऊ होणं सोप्प नसत...
त्या साठी रक्ताच्या नात्यांचा बळी द्यावा लागतो...
साथीदाराशी कायमचा विरह निवडावा लागतो...
मातीशी आणि स्वकीयांशी दुरावा घ्यावा लागतो...
उदरात जीव असताना सख्या नात्यांच्या हत्येला धैर्याने सामोरं जावं लागतं...
परक्या भुई वर लोकांच्या मनात घर निर्माण करावं लागतं...
लेकरा ला जन्मापासून एका ध्येया साठी तयार कराव लागत...
त्याच्या उराशी ममतेची ऊब देण्या परी अपेक्षांचं ओझं बांधव लागत...
स्वतःच्या लेकराला कैकदा मृत्यूच्या दाढेत ढकलावं लागतं...
आणि त्यावर टाकलेली जबाबदारी तो पूर्ण करे पर्यंत झिजत राहावं लागतं...
हा त्याग , ध्येय , दृढ निश्चय , आत्मबल , जिद्द आणि समर्पणाचे दुसरे नाव म्हणजे जिजाऊ...
म्हणून जिजाऊ होणं सोप्प नसत...
म्हणून जिजाऊ होणं सोप्प नसत...
अश्या या आई ला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन.
.
..
.
..

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...