देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त ! (५ फेब्रुवारी १२९४)
बाराव्या
शतकाच्या शेवटच्या २५ वर्षात देवगिरीच्या यादवांचा उदय खानदेश परिसरात
झाला. पहिल्या सेऊनचंद्राच्या तेव्हाच्या सेऊनदेशात (आताच्या खानदेशात)
नाशिक ते देवगिरीचाही समावेश होता. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व
प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील भिल्लमा या राजपुत्राने देवगिरी
गावाची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले.
पुढे
सिघंण्णा व त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले. या कृष्णाचा
भाऊ महादेव ह्याने उत्तर कोकणचा प्रदेश आपल्या राज्यास जोडण्यात यश प्राप्त
केले आणि गादी आपला मुलगा आमण्णाकडे सोपविली. पण कृष्णाचा मुलगा
रामचंद्राने बंड करून गादी स्वत:कडे खेचली आणि विदर्भ आणि इतरत्रही विजय
प्राप्त केले.
एव्हाना
देवगिरीच्या साम्राज्यात आंतरिक बंडाळीने उग्र रूप धारण केले होते. त्यातच
अल्लाउद्दीन खिलजी नामक क्रूर मुस्लिम सुलतानाचे ते अभद्र पाउल
हिंदुस्तानात पडले. हिंदुस्थानातील 'कच्चे दुवे' शोधतानाच त्याला
देवगिरीच्या यादवांच्या रूपाने पहिला कच्चा दुवा मिळाला. त्याचा फायदा घेऊन
त्याने हिंदुस्थानात आपले साम्राज्य प्रस्थापित करण्याचा विचार केला.
दुर्दैवाने नेमके त्याच वेळी देवगिरीला शूर, पराक्रमी असा राज्यकर्ता
नव्हता. आणि एके दिवशी नेमक्या ह्याच बेसावधपणाचा, असहायतेचा, दुर्बलतेचा
फायदा उठवून खिलजीने देवगिरीवर जोरदार हल्ला चढवला. तो 'दुर्दैवी' दिवस
होता ५ फेब्रुवारी १२९४ ! मात्र, अल्लाउद्दीन खिलजीच्या आकस्मिक हल्ल्यास
रामचंद्र तोंड देऊ शकला नाही.
पुढे खिलजीने देवगिरीचे नामकरण 'दौलताबाद' असे केले आणि यादव साम्राज्याची 'ती' एकमेव खूणही कायमची पुसून टाकली !
…… आणि महाराष्ट्राच्या 'सुवर्णकाळा'ची दुर्दैवी अखेर झाली !
त्यावेळी
खिलजीने देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद केले होते, जे आजही तसेच आहे.
त्यामुळे वरील घटनेआधीपर्यंत ओळखला जाणारा देवगिरीचा किल्ला आताच्या पिढीला
'दौलताबादचा किल्ला' ह्या नावानेच परिचित आहे.
ह्यानंतर
तब्बल ३५० वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्य आणि क्रूर अत्याचारांनी पार भरडून
निघाला. मसणवट झाली होतो महाराष्ट्राची. छ. शिवरायांच्या कर्तृत्वानेच
महाराष्ट्राला गेलेला स्वाभिमान, स्वातंत्र्य पुन्हा प्राप्त झाले.
- प्रसन्न खरे
स्रोत : http://bharatdiscovery.org
अंशतः संदर्भ :राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
No comments:
Post a Comment