विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 22 February 2021

मराठ्यांनी धारावी मोहीम

 
*#२२_फेब्रुवारी_१७३९*
*सन १९३९ च्या सुरुवातीला


मराठ्यांनी धारावी मोहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर दिनांक २२ फेब्रुवारी सन १७३९ मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर दिनांक २६ फेब्रुवारी सन १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले. पोर्तुगीजांनी पुन्हा गायमुखावर हल्ला केला तोही मराठ्यांनी परतवून लावला. दिनांक २७ फेब्रुवारी सन १७३९ रोजी चिमाजीअप्पांनी शत्रूच्या आरमारावर गायमुख येधून हल्ला करण्यास हुकूम दिला. त्यानुसार रामजी महादेव, तुबाजीपंत व आंग्रे यांनी मारा सुरू केला.*

*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩⛳🙏मराठा🙏⛳🚩

*आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची*

No comments:

Post a Comment

फलटण संस्थान

  फलटण संस्थान फलटण  हे सातारा  जिल्ह्यातील    एक  तालुका व  शहर  आहे.  फलटण  शब्दाची उत्पत्ती  फल   उत्तन  ( अर्थात  फळबागांचा  प्रदेश ) अश...