आजही भारतातील सर्वात वैभवशाली असणारे जयपूरचे कछवाह घराणे सुरुवातीपासून सत्ताधाऱ्यांना अनुकूल राहिले. यांचा मुळ पुरुष भारमलने आपली मुलगी जोधाबाई अकबराला देऊन सत्ता मिळविली. त्याचा मुलगा भगवंतने मानबाई जहांगीरला दिली. तर राजा मानसिंग हा अकबराचा सेनापती असून नवरत्नापैकी एक होता. त्यानंतर या घराण्याने इंग्रज आणि स्वातंत्र्यानंतर राजकारण्यांशी सलोखा ठेवत सत्ता टिकविली. त्यामुळे आजही त्यांचे किल्ले जगातील सर्वात सुंदर किल्ले आहेत.
याच घराण्याचा राजा सवाई जयसिंगने २९ नोहेंबर १७२४ साली जयपूर शहराची निर्मिती केली. आतापर्यंत सर्वत्र जमवून घेणाऱ्या कछवाहला मराठ्यांनी दाद दिली नाही.छत्रपती शाहूंचे पेशवे बाजीराव आणि सरदार शिंदे,होळकर,पवार यांनी अंबर (नंतरचे जयपूर) च्या आसपास छापे मारून जयसिंह दुसरा याला भयग्रस्त केले.
जयपुरवर सतत आक्रमणाच्या छायेमुळे ,मराठ्यांच्या भीतीने भक्कम तटबंदी असलेल्या जयपूर शहराची निर्मिती झाली. विशेष म्हणजे याचा वास्तु विशारद विधाधर भट्टाचार्य हा मराठी माणूस आहे. त्यावेळी मुख्य रस्ते १११ फुटाचे सोडलेले आहेत. शहराला ८ मुख्य दरवाजे असून आजही संगानेरी गेट , अजमेरी गेट पाहताच माणूस थक्क करतो. शहरातील हवा महाल, जंतर मंतर, अल्बर्ट हॉल, सिटी प्यालेस, अमेर- जयगड - नाहारगड किल्ला, मुख्य बाजारपेठ पाहण्यासारखी आहे. जयपूर हे मुळचे गुलाबी नव्हते, १८५३ ला प्रिन्स ऑफ वेल्स अल्बर्ट भारत भेटीवर आले, तेंव्हा त्यांच्या स्वागतासाठी जयपूर गुलाबी झाले. आज पद्मनाभ हा १६ वर्षाचा राजा असून त्याच्या राजवाड्यात जे त्रिपोलिया गेट आहे त्यातून राष्ट्रपतीलाही प्रवेश करता येत नाही.अशारितीने सोयीसाठी रंग बदलल्याने जयपूर जगाच्या पाठीवरील नावाजलेले पर्यटन स्थळ आहे.
आपल्या किल्ल्याची दुरावस्था पाहिल्यानंतर दुखः जरूर झाले. परंतु मनात एक वाक्य जरूर आले, मराठ्यांचे किल्ले पडले पण इज्जत बाकी आहे मेरे भाई, जय शिवराय !!!!!!
डॉ. सतीश कदम
चित्र - जयपूर शहराचे जुने चित्र
|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी....||
No comments:
Post a Comment