*८ तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणला*
*सत्य की असत्य*
*____________________________________*
संताजी घोरपडे निश्चित अति पराक्रमी होते पण ते कधी दिल्लीला गेलेच नव्हते त्यांनी कधी नर्मदा ओलांडली चे इतिहासात नमूद केले नाही. त्यांनी अख्खा दक्षिण भारत आपल्या घोडच्या टप्यानी फिरवला अनेक मुघल सरदार ना संपवले. त्यांच्या भीतीने कासीम खान ने डोद्देरीच्या वेढ्यात अडकलेल्या असता आत्महत्या केली. संताजी घोरपडे शत्रूंसाठी कर्दन काळ होते.
छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या वेढ्यामध्ये अडकलेले असताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी अमात्य रामचंद्र अमात्य, सचिव शंकराजी नारायण संताजी धनाजींकडे होती. स्वराजाच्या दक्षिणेची आणि घाटवरची जबाबदार रामचंद्र अमात्य आणि संताजी घोरपडेकडे होती आणि स्वराज्याच्या उत्तरेकडील बाजू आणि कोकण जबाबदारी शंकराजी नारायण आणि धनाजी कडे होती. कर्नाटकात संताजी धनाजी मिळून एकत्र जात होते. संताजी घोरपडे काहीसे कोपिष्ट असल्यामुळे रामचंद्र अमात्य बरोबर काम करायचे, स्वतः विशाळगडला राहून. शंकराजी नारायण भोर सिंहगडला वास्तव्य असे. तरी पण सातारा आणि कैक मोहीम या चार जनांनी एकत्र काढलेल्या आहेत.
त्यामुळे संताजी घोरपडे दिल्लीला जायचा प्रश्नच उद्भवला नाही. संताजींचा मृत्यू १६९७ ला झाला मराठ्यानी १७०५ नंतर ताराबाईच्या नेतृत्वाखाली नेमाजी शिंदे, खंडेराव दाभाडे आणि धनाजी जाधव यांनी पहिल्यांदा नर्मदा नदी ओलांडली आणि उत्तरेकडे मराठ्यांचा धाक वाढवला आणि मराठ्यांनी OFFENCIVE DEFENCE सुरुवात केला. आणि मुघल या मराठ्याच्यास नीतीला थोडा काळ बावरले. त्यात १७०७ मध्ये औरंगझेबचा मृत्यू झाला. आणि २७ वर्ष युद्धाला कंटाळलेले सैन्य परतले.
इतिहासात संताजी घोरपडे दिल्लीला गेल्याची कुठे ही वाच्यता होत नाही. मग ८ तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणला तर कपोलकल्पित आहे....
*माहीती साभार*
*प्रसाद दादा पाठक*
© @itihasachya_vatevar
No comments:
Post a Comment