राजकीय मुस्तद्दी असलेल्या शहाजीराजे महाराज यांनी स्वतंत्र राज्यासाठी केलेले अनेक प्रयत्न, बेंगलूर येथून चालवलेले स्वतंत्र राज्य यातून शहाजी महाराजांची भूमिका स्पष्ट दिसून येते तसेच त्यांची काही खुर्दखते, इनामपत्रे आणि त्यांनी केलेले न्यायनिवाड़े हे स्वराज्य स्थापनेत त्यांची भूमिका ही खुप महत्वाची होती हे ही आपल्यासमोर येते शिवबांना बेंगलूरवरून निरोप देत असताना शहाजी महाराजांनी दिलेली स्वतंत्र राजमुद्रा, ध्वज आणि सोबत दिलेली विश्वासू माणसे पाहता ह्या प्रसंगावरुन शहाजी महाराज किती दूरदर्शी होते आणि त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील विश्वास व भविष्यात स्थापन होणाऱ्या स्वराज्यावरील आस्था दिसून येते...
इ.स १६३७ ते १६४० या कार्यकाळात शहाजी महाराज यांच्या ३ पराक्रमी लढाया :
पहिली लढाई (१६३७) : मालनाड प्रांतातील झक्केरी येथे भद्रप्पा नाईक यांचा मुलगा वीरभद्र याचा बंदोबस्त करण्यासाठी महमदशाही याने शहाजी महाराजांना चालून जाण्यास सांगितले महाराजांनी त्याचा २ महिन्यात पराभव केलाच,परंतू त्याकडून अर्धे राज्य आणि १८ लाख होनांची वसुलीसुद्धा केली...
दुसरी लढाई (१६३९) : जेव्हा अफझलखान शिरे येथे कस्तूरीरंग नाईकावर चालून गेला होता,तेव्हा महाराजांनी बंगलोर वर आक्रमण केले तेथील कैम्पगोडा या आमलदारास परास्त करुन महाराजांनी बंगलोर जिंकले कैम्पगौडा पळून सावनदुर्गावर आश्रयाला गेला.त्यानंतर महाराज श्रीरंगपट्टनम येथे गेले तेथील क्रांतीराय नरसराज वोडियार या अधिकार्यासोबत लढाई न करता मोठी रक्कम घेऊन महाराज बंगलोरला परतीला निघाले त्याचवेळी महमदशाहीने शहराचे नाव बदलून ‘इस्लामपूर’ ठेवले....
तीसरी लढाई (१६३९-१६४०) : बसवापट्टन येथे झालेल्या लढाईमधे महाराजांनी मोठा पराक्रम गाजवला चिक्कनायक हल्ली,बेलूर,टुमकुर,कांदल,बाळापुर ही स्थळे महाराजांनी हस्तगत करुन अपार संपत्ती जमा केली.याच संपत्तीमधुनच दादमहाल सारख्या अनेक भव्यदिव्य वास्तु उभ्या राहील्या...
तसेच मार्च १६४१ मधे श्रीरंगराय सोबत महाराजांनी युद्ध करुन त्याचे राज्य खालसा केले वेल्लोर जिंकले महाराजांच्या या पराक्रमाने आदिलशाह एवढा खुश झाला की तो स्वतः ४० मैल महाराजांचे स्वागत करण्यास पुढे आला होता आणि त्याने महाराजांचा उल्लेख ‘महाराज फर्जंद शहाजीराजे भोसले’ असा गौरवास्पद उल्लेख केला...
एक आदर्श पती आणि पिता असलेले, भातवडीच्या युद्धात सर्व शाह्यांना आपल्या पराक्रम आणि शौर्याने आसमान दाखवणारे तसेच आपल्या कल्पक दूरदृष्टीकोनातून आणि कुशल संघटकवृत्ती मधून स्वराज्याची मूळ बळकट करणारे दूरदर्शी महापराक्रमी, महाबली, स्वराज्याचे संकल्पक, रणविद्याविशारद सेनापती, स्वातंत्र्यप्रेमी, दूरदर्शी राजनीतिज्ञ, अविस्मरणीय पराक्रमी, नृपसिंह, वीर मालोजीराजे भोसले आणि उमाबाई सुपुत्र महाबली.....
――――――――――――
स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे महाराजसाहेब यांच्या जयंती दिनानिमित्त मानाचा मुजरा....
No comments:
Post a Comment