विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 20 March 2021

गुंजन मावळातील कर्तबगार घराण्यांबद्दल माहिती

 

आजच्या लेखात

गुंजन मावळातील कर्तबगार घराण्यांबद्दल माहिती घेणार आहोत.
छत्रपती थोरल्या महाराजांनी अफझल खान नावाचे संकट स्वराज्यावर चालून आले असताना गुंजन मावळातील वडगाव गावातील झांजे पाटील ह्यांच्या मोकदमी वतनासंदर्भातील हुकुम स्वतः थोरल्या महाराजांनी बाळाजी शिलिमकर देशमुख ह्यांना दिले होते.
(पत्र - १) आदिलशाह सरदार सिपेसालार अफझल खान वाई परगन्यात आला आहे. तरी तुम्ही लोक कमालीचे कर्तबगार आहात. ही वेळ जोखमीची आहे. मनामध्ये कुठलाही संशय न ठेवता तुमच्या जमावानिशी हजर व्हा.
(पत्र - २) वडगावची मोकदमी ही देशमुखाची आहे तरी मोकदमीचे कागद बकाजी बिन येसाजी झांजे याचे नावे करून स्वामी कार्यास लावणे. ही मोकदमी पीढिजात बकाजीच्या वंशी चालवावी. तुमच्या येणाऱ्या पिढीनेही झांज्याच्या वंशाचे चालवावे. अस न केल्यास त्याला अमृतेश्वराची आन आहे.
ह्या मजहर वरुण लक्षात घेण्याची बाब ही की , छत्रपती शिवाजी महाराज संकटसमयीसुद्धा कर्तव्यात कसर करत नव्हते.
बाळाजी हैबतराऊ देशमुख आणि त्यांच्या जमावातील काही सरदारांची नावे दिले आहेत.
बाळाजी शिलिमकर देसमुख.
गोमाजी श्रीपती व त्रिंबक श्रीपति देशकुलकर्णी
धाकजी बिन येसाजी चोरघे
सुर्याजी व बापुजी बिन दादजी थिटे - हतवे
धाऊजी बिन राजजी लेकवळे मोहरी बु
कोंडाजी व मातजी लिम्हण -पारवडी
चांदजी व मंबाजी डिवळ निगडे बु
(निगडे बु. या गावामध्ये डिवल आडनावाची घरे नाहीत. कदाचित टक्के असावेत. कारण निगडे गावची मोकदमी बोरावळे गावच्या देशमुखाकड़े होती. टक्केला चौगुला वतन होत.)
येसजी बिन विठोजी सोंडकर -तांभाड
सोनजी व रामाजी कारले - मौजे सोंडे
बाजी पिलाणे खोत - सोंडे हिरोजी
तुलाजी तळेकर -आंबवणे
सूर्याजी व कोंडाजी व सोनजी सरपाले -सोंडे
त्रिंबकभट पुरोहित - वडगाव
ह्या सर्व घरान्यांनी प्रतापगड युद्धामध्ये गुंजन मावळाच्या पराक्रमाची शर्थ केली. इतिहासलेखनाला मुकलेली अनेक घराणी आहेत. छोट्या मोठ्या कथल्यामध्ये त्यांचे उल्लेखही आढळतात पन इतिहास लिहिताना अशाच अनेक घराण्यावर अन्याय झालेले आहेत.
इतिहास लिहिताना देशमुख पाटील अश्या बिरुदावल्या लावणाऱ्या घराण्याचा विचार केला गेला पन अशी अनेक छोटी मोठी घराणी आजही त्यांच्या खऱ्या इतिहासापासून वंचित आहेत.
आपण पानीपत युद्धाच वर्णन करताना सहज म्हणतो की पानिपतावर महाराष्ट्रातील प्रत्येक घरातली बांगडी फुटली आहे. हे अगदी खर आहे पन प्रतापगड युद्धामध्ये अफझल खान संपवायला ह्या बारा मावळ खोर्यातील प्रत्येक घरातील मावळी मनगट तेवढ्याच अवेशाने लढलय.
प्रतापगड रणसंग्रामात स्वराज्यातील अनेक नामजात सरदारांनी मर्दुमकी गाजवली पन त्या मर्दुमकीला खरं बळ ह्या छोट्या सरदार घराण्यांनी दिले.
गुंजन मावळाचा सर्वोत्तम पराक्रमी इतिहास वाचताना लिहिताना ह्या घराण्यांच्या शौर्याला आजवर दिलेल्या त्यागाला मुजरा.🙏🏻
पुढील लेखात गुंजन मावळातील अशाच इतिहासलेखनापासून वंचित राहिलेल्या घराण्यांविषयी माहिती घेऊ.
क्रमशः
राजधानीचं मावळ
गुंजन मावळ

1 comment:

  1. मौजे निगडे बु. येथील "डिवळ" यांचा अपभ्रंश होऊन खुटवळ >>> खुटवड असा झाला आहे. खुटवड हे पाटील घराणे आज देखील निगडे बु. या गावात पहायला मिळतात. पाटील घराणे वेगळे असुन बाहेरून आलेले खुटवड (पाटील नसलेले) देखील या गावात पहायला मिळतात व त्यांनी खुटवड पाटील यांच्या आश्रयाने राहिले व त्यावरुन आश्रयदात्यचे खुटवड नाव घेतले असे संदर्भ व परंपरा आहेत यावरुन हे स्पष्ट होते. खुटवड पाटील घराणे चे मूळ गाव उंबरे असुन राजगडवर जिजाऊ आईसाहेबांच्या अतिशय जवळच्या लोकांमधे खुटवड घराण्याचे नाव घेतले जायचे. शिवरायांच्या मोहिममधे टक्के व खुटवड पाटील यांचे आपल्या बांदल साथीदाराने बरोबर नेहमीच लढलेले पहायला मिळालेले आहेत. प्रतापगड च्या मोहिमेची कमाल याच गुंजण मावळ मधल्या मावळ्यांनी यशश्वी केली. गुंजन मावळ मधील देशमुख वादाचा बिमोड करण्यासाठी व एक शांत पुरक वातावरण निर्मिती साठी खुटवड पाटील घराणे ने खुप काम केले असल्याचे दाखले आहेत. न्यायप्रिय,शब्दस किंमत देने आणि समंजस भूमिका यामुळे त्यांची प्रशंसा खुद शिवरायांनी केली आहे. बांदल व मौजे बोरवले चे मारेकरी समाज हे खुटवड पाटील सोबत कायम सुख दुखात एकत्र राहिलेला असुन बांदल व खुटवड पाटील नाते संबंध असण्याची शक्यता आहे. श्री हनुमान मंदिर,मौजे निगडे बु. हे खुटवड पाटील यांच्या पुढाकाराने व बांदल यांच्या बरोबरीने आकारस आले असुन त्यास शिवकाळीन महत्व आहे.

    ReplyDelete

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...