शिवपूर्व काळात भारतात तथा महाराष्ट्रात अनेक हिंदू राजे होऊन गेले पुढे या
आक्रमणात अनेकांनी कडवा प्रतिकार देखील केला. महाराष्ट्रात #सातवाहन
राजाने राज्य केले.
________________________________
सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते. ग्रीक
प्रवासी मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिले आहे. त्यात
मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या
आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले किल्ले आहेत. या राजाकडे
११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वतः अशोकाच्या राज्यकाळात
सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले दिसते. पुढे स्वतंत्र
होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ५०० वर्षांहून अधिक वर्षे राज्य
केले. या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या खोर्यात आणि पुढे
महाराष्ट्रात आतपर्यंत पसरत गेली. या घराण्याचा उल्लेख मत्स्य पुराणात व
वायु पुराणात आला आहे कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे
म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात.
आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे
त्या वंशाचे. हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक
वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा
पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत
होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन
या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही "आंदर मावळ" असे
म्हटले जाते. "आंदर मावळ" (जुन्नरचा परिसर) आंध्र अथवा औंड्र मावळवरुन बनला
असावा. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही
आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही. बौद्ध व
जैन संस्कृतीच्या कालखंडांनंतर पैठणमध्ये सातवाहन राजाचे राज्य स्थापन
झाले. या राजसत्तेच्या काळात पैठणचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो. सातवाहन
राजे विद्या आणि कलांचे भोक्ते असल्याने देदीप्यमान कलेची व पंडितांची
परंपरा इथे सुरू झाली, ती जवळजवळ वसाहतवादी कालखंडापर्यंत टिकून राहिली.
सातवाहन राजवटीच्या काळात जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा-वेरूळची लेणी ही लेणी
खोदली गेली. पैठणच्या दक्षिणेला गोदावरीकाठी नागघाटाशेजारी भग्नावस्थेत उभा
असलेला सातवाहन राजाचा वाडा आजही या राजवटीची साक्ष देत आहे. 
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Wednesday, 10 March 2021
सातवाहन
Subscribe to:
Post Comments (Atom)
अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय
अटकेपार झेंडे रोवणारे मराठा सरदार – सिंधूपार मराठा सामर्थ्याचा सुवर्णअध्याय मराठा साम्राज्याच्या इतिहासातील इ.स. १७५८ हे वर्ष अभिमानाने स्...
-
*बहिर्जी नाईक* शिवाजीराजेंचे गुप्तहेर _(आपल्या मुलांना माहिती असणे गरजेचे आहे. आजही CBI, CID अशी सरकारी खाती यावरच काम करतात.)_ बघायल...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
°°°छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यंकोजी राजांना पत्र °°° छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस व्यंकोजीराजांना लिहिलेली चार पत...
No comments:
Post a Comment