आम्ही बुंदेलखंड सोडतों!"
पहिल्या बाजीरावाने उत्तरेत मोठाले पराक्रम केले त्यांपैकींच हा एक आहे. सतराव्या शतकांत उत्तर हिंदुस्थानांत मराठे व रजपूत यांचे ऐक्य होऊन दिल्लीच्या बादशाहीस हादरे बसूं लागले. बुंदेलखंडाचा छत्रसाल राजा स्वतंत्रपणे वागू लागला. बुंदेलेहि मराठ्यांना साह्य करूं लागले. रजपूत आणि बुंदेले यांच्या मदतीने मराठे दिल्लीहि काबीज करतील या भीतीने बादशहाने अलाहाबादचा सुभेदार महमदशहा बंगश या पराक्रमी पुरुषास मराठे-छत्रसाल व रजपूत यांचे पारिपत्य करण्यासाठी हुकूम दिला. हा बंगश अफगाणिस्तानातील चंगश खोऱ्यांतील. त्याचा बाप आईनखान औरंगजेबाच्या वेळी हिंदुस्थानांत आला होता. आपल्या कर्तबगारीने अहंमदशहाने नशीब काढले. गंगेच्या काठी शम्शाबाद परगण्यांत माऊ येथे राहून त्याने चारपांच हजारांची फौज पदरी बाळगली होती. फर्रुखसियरच्या कारकीदीत यास मोठ्या जहागिरी मिळाल्या. छत्रसालाला जिंकण्याच्या भानगडीत त्याचा मुलगा मारला गेला. तेव्हां महमदशहा चवताळून बुंदेलखंडांत शिरला. मोठ्या निकराची लढाई होऊन छत्रसालचा पराभव झाला. गुप्त रीतीने छत्रसालाने बाजीरावाची मदत मागितली. “जो गति ग्राह गजेन्द्रकी सो गति जानहु आज । बाजी जात बुन्देलकी राखी बाजी लाज ही त्याची विनवणी ऐकुन बाजीरावाने ही कामगिरी अंगावर घेतली. आणि मोठ्या निकरानें बंगशशी युद्ध करून त्यांत त्याचा पराभव केला. जैतपूरवर बंगशची अन्नान्नदशा झालो. त्याने बाजीरावास करार लिहून दिला, “आम्ही बुंदेलखंड सोडून जातो. पुनः छत्रसालावर चढाई करणार नाही." पुढे दोनतीन वर्षातच छत्रसालाचे निधन झाले. मरते समयीं बाजीरावास त्याने आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा दिला. महंमदशहाच्या या पराभवामुळे बाजीरावाचे नांव उत्तरेत गाजून राहिले.
-३० मार्च १७२९
No comments:
Post a Comment