चिमणाजी देशपांडे
महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. तेव्हा त्यांना एक वाईट
बातमी समजली. 'औरंगजेबाने त्याचा मामा अमीर-उल-उमराव नवाबाबहादूर मिर्झा
अबू तालिब उर्फ शाइस्तेखान ह्याला स्वराज्यावर चालून जाण्याची आज्ञा केली.'
सुमारे १लाख फौजेसह शाइस्तेखान दि.२८जानेवारी१६६० रोजी स्वराज्याच्या
दिशेने निघाला खानासोबत जसे मोगल सरदार होते तसे मराठेही होते. त्यातच
शिवाजी महाराजांचे मामा म्हणजेच जाधवांची मंडळी होती. म्हणजे एक मामा
चाललाय आपल्या भाच्याच राज्य वाढवण्यासाठी आणि एक मामा चाललाय आपल्या
भाच्याच राज्य मिटवण्यासाठी. किती फरक आहे ना असो. मजल दरमजल मारीत हि
स्वारी पुण्यात आली. खानाने लाल महालाचा ताबा घेतला.
खान पुण्यातील रयतेशी अत्यंत क्रूरपणे वागत होता.
गावेच्यागावे त्याने बेचिराख केली होती. रयतेचे अमानुष हाल चालू होते.
महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुखरूप सुटले.त्यानंतर त्यांनी सुर्वे,
दळवी आणि टोपीकर इंग्रज यांचा पुरता काटा काढला.आणि शाइस्तेखानावर झडप
घालण्याचा विचार करू लागले.मसलती सुरु झाल्या. यात मोरोपंत पेशवे, सर्जेराव
जेधे, चांदजी जेधे, चिमणाजी देशपांडे आणि त्यांचे बंधू बाबाजी देशपांडे हि
मंडळी होती. महाराजांनी खानाचा पुरता बंदोबस्त करण्याचा डाव आखला होता.
चिमणाजी हा खान पुण्यात येण्याच्या आधीपासून पुण्यात वास्तव्य करीत होता.
त्यामुळे त्याला पुण्याची आणि लालमहालाची खडानखडा माहिती होती. चिमनाजीचे
वडील बापूजी मुदगल देशपांडे हे महाराजांच्या बालपणी पुणे प्रांताचे हवालदार
म्हणून लालमहालात चाकरीला होते.त्यामुळे चिमणाजी आणि बापूजीशी महाराजांची
अगदी बालपणापासून मैत्री होती. महाराजांनी अगदी©Rohitsarode गुप्तपणे बेत
ठरवला. लालमहालात छापा टाकून शाइस्तेखानाला ठार मारायचे. केवढे ते धाडस
होते? आणि हे धाडस फक्त शिवाजी महाराजच करू शकत होते.
मुहूर्त ठरला चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजेच दि.५एप्रिल १६६३
रोजी मध्यरात्री बारानंतर खानाच्या जाचातून स्वराज्य सोडवण्यासाठी छापा
घालायचा. गुप्तपणे तय्यारी सुरु झाली. गुप्तहेर खबरा आणू लागले. तो रमजानचा
महिना होता.मोगली फौज दिवसभर उपवास करीत असे आणि रात्रीच्या वेळी उपवास
सोडण्यासाठी जड अन्न खाल्ले जाई. त्यामुळे हि मंडळी गाढ झोपी जात.याच
गोष्टीचा फायदा महाराजांनी घ्यायचे ठरवले.अष्टमीची मध्यरात्र उलटून आता
नवमीला सुरुवात झाली होती. दि.६एप्रिल १६६३ हि नवमी म्हणजे 'रामनवमी'
होती. महाराजांनी आपल्याबरोबर चिमणाजी आणि दोनशे मावळ्यांची तुकडी घेतली.
रावणाला मारण्यासाठी प्रभूरामच आपल्या वानरसेनेसह आले होते.
छावणीवर कडक चौकी पहारे बसवले होते.या मंडळींना चौकीवर
अडवून प्रश्न विचारले जाऊ लागले. ''कौन हो तुम? कहासे आये हो? कहां जा रहे
हो?'' चिमनाजीने अगदी सफाईने उत्तर दिले, ''आम्ही कटकांतील लोक! छावणी
बाहेरच्या छबिन्याची गस्त घालावयास गेलो होतो! कामे संपून माघारी परतलो
आहोत.'' त्यावेळी खानाच्या लष्करात मराठी फौजही होती. हि फौज छावणी बाहेर
चौकी पाहऱ्यास ठेवली जाई यांना 'छबिन्याचे पहारेकरी' असे म्हणत.असेच चौकी
पहारे ओलांडून हि मंडळी मुद्पाकखान्याजवळ आली. येथून थेट जनानखान्यात जायला
एक दिंडी होती. सुरक्षिततेसाठी खानाने ती विटांचे बांधकाम करून बंद केली
होती.मोगली जनान्यात पडद्याची झाकपाक खूप असायची.पडद्याचे बाडे टांगून ती
जागा बंदिस्त केली होती.
ती दिंडीची
भिंत तोडून महाराज सैन्यासह वर आले.हे लोक वर येत असतांनाच खानाच्या दासी
जाग्या झाल्या.त्या लोकांना येताना पाहून त्यांनी समया व शमादाने
विझवली.त्यामुळे अंधार झाला आणि अंधारातच मराठयांच्या तलवारी फिरू
लागल्या.महाराज किंवा मराठे स्त्रियांवर कधीच हल्ला करीत नसत.पण अंधारामुळे
मराठयांच्या तलवारी समोर खानाच्या दोन बायका आल्या. त्यात एकीला तीस चाळीस
जखमा झाल्या आणि दुसरीचे असंख्य तुकडे झाले.लालमहालात मराठ्यांनी खानाच्या
फौजेची कत्तल आरंभीली होती.जो त्यांच्या तलवारी पुढे येत त्याच्यावर
तलवारीचे वार होत. खऱ्या अर्थाने लालमहाल मोगलांच्या रक्ताने लाल झाला
होता. चिमणाजी आणि बापूजीने जनान खान्यातील सैनिकांची कत्तल केली. ते
महाराजांच्या बरोबर होते आणि खानाचा शोध घेत होते.
खानाच्या बायकांनी त्याला जनान खान्यातील एका पडद्यामागे लपवले
होते.टर-टर-टर आवाज करीत महाराजांनी तो पडदा तलवारीने फाडला. महाराजांना
पाहून खान घाबरला तो वाड्यात पळत सुटला. खान एका खिडकीतून बाहेर उडी
टाकण्याच्या प्रयत्नात असतांना महाराजांनी त्याच्यावर तलवार चालवली ती
त्याच्या बोटांवर बसून त्याची तीन बोटे तुटली.पण खान ठार झाला असाच समज
झाला.इकडे मराठ्यांनी त्याचा मुलगा अबुल फत्तेखान याला ठार केले.
मराठयांच्या या हल्ल्यात खानाचा एक जावई, एक सेनाधिकारी, चाळीस लोक आणि
बारा स्त्रिया ठार झाल्या होत्या.अंधारामुळे स्त्रिया ठार झाल्या. नाहीतर
मराठे स्त्रियांना हात सुद्धा लावत नसे.महालात लष्कराची गर्दी झाली होती
गनीम शोधायला.महाराज त्या गर्दीचा फायदा घेऊन त्यात सामील होत 'गनीम गनीम'
असे ओरडत छावणी बाहेर पडले.बाहेर मोरोपंत आणि नेताजींनी त्यांना सिंहगडकडे
सुखरूप नेले.खानाची आब्रु आणि तीन बोटे गेली.औरंजेबाने त्याची रवानगी
बंगालच्या सुभ्यावर केली.
काही
इतिहासकारांच्या मते, 'महाराजांना पाहून खान तलवारीला हात लावत असताना
महाराजांनी त्याच्यावर वार केला तेव्हा त्याची तीन बोटे तुटली.' हे वर्णन
काही विश्वासू पुस्तकातही आले आहे.
दि.
८एप्रिल १६६३ तीन वर्ष पुण्यात तळ टाकून, राजांचे दोन गड जिंकून,
त्याबद्दल तीन बोटे गमावून छाप्यानंतर तीनच दिवसात खान पुण्याहून हलला.
या छाप्यात खानाकडील ५५ माणसे मारली गेली.तर
महाराजांचे ६मावळे कामी आले. चिमणाजीच्या पराक्रमावर खुश होऊन महाराजांनी
त्याला पालखीचा मान दिला. दि. १५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदर्शित झालेला
''फत्तेशिकस्त'' हा चित्रपट याच प्रसंगावर आधारित होता.यात अभिनेते विक्रम
गायकवाड यांनी चिमणाजी देशपांडेंची भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे.
महाराजांनी जो छापा टाकला त्याला 'सर्जिकल स्ट्राईक' असे म्हणतात.
भारताच्या इतिहासात हे स्ट्राईक प्रथम क्षत्रीयकुलवतंश छत्रपती शिवाजी
महाराज यांनी केले. त्यानंतर सप्टेंबर २०१६ मध्ये भारताचे पाकिस्तानवर
झालेल्या स्ट्राईकचे प्रेरणा स्थानही छत्रपती शिवाजी महाराज होते.
त्यानंतर हे लिहिताना आणि सांगताना मला अभिमान वाटतो कि, अमेरिका, रशिया, चायना यांसारख्या बलाढ्य देशात शाइस्तेखानाची फजिती हा महाराजांचा पराक्रमाचा धडा शिकवला जातो.
संदर्भ सूची :-
◆राजा शिवछत्रपती
(पृ.क्र.४६७ - ४८२)
◆छावा
◆सभासदाची बखर
◆मराठ्यांची धारातीर्थे
●नक्की वाचा
''अफजलखानचा इतिहास''
http://saroderohit.blogspot.com/2020/11/blog-post.html
No comments:
Post a Comment