बाजी सर्जेराव जेधे
सन१६४५ रायरेश्वराच्या देवळात वयाच्या १५व्या वर्षी शिवाजी
महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.बारा मावळातील लोक जोडीला घेतले
आणि तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले.यानंतर राजगड,कोंढाणा आणि पुरंदर
हे किल्ले हि स्वराज्याला जोडले गेले.शिवाजी महाराजांची
स्वराज्यनिर्मितीची खबर बादशहा अली आदिलशहाच्या कानी पडली आणि त्याची झोप
उडाली.''शहाजीराजांनी एकदा असाच बंद केला होता स्वराज्यासाठी आणि आता
त्याचा पोरगाही तेच करतोय.'' असे बादशहाला वाटले.महाराजांचा बंदोबस्त
करण्यासाठी त्याने कपटाचा डाव खेळला. प्रथम त्याने शहाजीराज्यांना कैद केले
आणि आपली शाही फौज फत्तेखान नावाच्या सरदाराला देऊन स्वराज्यावर पाठवले.
भली मोठी फौज घेऊन फत्तेखान स्वराज्यावर चालून
आला.सुरुवातीला सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून गड ताब्यात घेतला आणि
सासवड जवळील खळदबेलसर गावा जवळ आपला तळ ठोकला.
महाराज पुरंदर किल्ल्यावर
होते.तेथून ते खानाच्या छावणीवर हल्ल्याचा बेत आखत होते.खानावरचा हल्ला
सह्याद्रीने शिकवलेल्या डावाने करायचा 'तो म्हणजे गनिमी कावा' असे त्यांनी
ठरवले. महाराजांनी फौजला हुकूम दिला.
फौजची तुकडी बिनीच्या दरवाज्यातून बाहेर पडली.इतर तुकड्या तिच्या मागोमाग
होत्या.सर्वात शेवटी भगव्या झेंड्याची तुकडी निघाली. एक जवान
मर्दगड्याच्या हात झेंडा अन त्याच्या बरोबरीला आणखी ५०मर्दगडी अशी ती तुकडी
होती.
खानाची छावणी अगदी
बेसावध होती.इतक्यात इशारा झाला आणि त्या छावणीवर मराठ्यांच्या तुकड्या
पिसाळलेल्या वाघासारख्या तुटून पडल्या.मराठांनी एकच धुमाकूळ घातली.खानाच्या
फौजची दाणादाण उडाली.सर्वत्र फक्त आरडाओरडा आणि धावपळ.मराठ्यांनी शाही
फौजची कापाकापी सुरु केली.कित्येक कधी मेले हे त्यांनाच समजलं नाही. थोड्या
अंतरावरची झेंड्याची तुकडी सुद्धा पुढे सरकली होती.या गोंगाटाने झोपलेला
खान दचकून उठला.त्याने तंबूच्या बाहेर पाहिलं तर त्याला मराठ्यांचा
रौद्ररूप दिसलं.
खानाने आपली सगळी
ताकद एकवटली आणि फौज घेऊन मराठ्यांवर चढाई सुरु केली.खानाची फौज जास्त
होती त्यापुढे मराठांच्या काही निभाव लागत नव्हता.म्हणून मराठ्यांनी माघार
घेण्यास सुरुवात केली.हळूहळू तुकड्या काढता पाय घेऊ लागल्या.स्वार पांगु
लागले.
झेंड्याची तुकडी आजून
माघारी फिरली नव्हती.त्या पूर्ण मैदानात भगवा झेंडा खूप अभिमानाने फडकत
होता.त्या मर्दानी खानवर चढाई सुरूच ठेवली.इतक्यात खानची मोठी तुकडी
झेंड्याभोवती गोळा झाली.गणिमानी झेंड्याभोवतीच गर्दी केली.प्रत्येकाच्या
मनात भीती उभी राहिली 'मेलो तर पर्वा नाही पण झेंडा गेला तर कोणाला तोंड
दाखवायला जागा राहणार नाही.' प्रत्येक जण झेंड्यासाठी प्राणांची बाजी लावत
होता.पण गनिमांचा जोर वाढतच होता.
एवढ्यात एक समशेर बहाद्दर मर्दगडी गनिमंचा गर्दीत कोल्हेलांडग्याच्या
कळपात एका वाघाने घुसावे तसा घुसला.त्याच्या तलवारीच्या धारीचा तडाखा
गणिमाला बसला आणि गनीम मागे हटू लागला.हे सर्व सुरूच होते इतक्यात झेंडा
धरलेल्या स्वाराला एका गनिमाचा घाव खूप जोऱ्यात बसला अन तो घोड्यावरून
जमिनीवर कोसळला.त्याच्या हातातला झेंडा आता जमिनीवर पडणारच तेवढ्यात त्या
नव्याने आलेल्या मर्दाने तो वरच्यावर पकडला.त्या जखमी स्वराला घोड्यावर
बसून पुढे पाठवलं.तो मर्दगडी नसता तर मराठ्यांची अब्रू गेलीच असती.तो समशेर
बहाद्दर होता ''बाजी जेधे.'' प्रतापगडाच्या रणसंग्रामात मर्दुमकी
दाखवलेल्या (आणि त्यांच्या मेरू पर्वतायेवढ्या निष्ठेमुळे ''स्वराज्याचे
निष्ठावंत मावळे भाग१ '' चे मानकरी ठरलेल्या) कान्होजी जेध्यांचा मुलगा.
बाजी झेंड्याच्या
तुकडी सोबत हर हर महादेव च्या गर्जना देत पुरंदराकडे निघाला. प्रणाहून
प्रिय असलेल्या मराठ्यांच्या ह्या भगव्या झेंड्याची रक्षा या समशेर
बहाद्दराने केली होती.
गडावर
महाराजांना हि गोष्ट कळाली. महाराजांनी बाजीला बोलावले,त्याची पाठ थोपटली
आणि त्याला पदवी दिली 'सर्जेराव'.बाजी आता ''बाजी सर्जेराव जेधे'' झाला
होता.
(संदर्भ:- राजाशिवछत्रपती पृ.क्र.
२०६-२०९ )
No comments:
Post a Comment