आडसकर देशमुख गढी - आडस
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात आडसकर देशमुखांची भव्य गढी आता शेवटच्या घटका मोजत आहे. आडस हे गाव मराठवाड्यातील तीर्थक्षेत्र आंबेजोगाईपासून २० कि.मी अंतरावर आहे. आंबेजोगाई - किल्ले धारूरच्या वाटेत ही गढी येते. गढीचे प्रवेशद्वार भव्य आहे आणि ते आजही मजबूत स्थितीत आहे. त्याचे शिल्लक पांढऱ्या मातीतील बुरूज त्याची भव्यता जाणवून देतात. गढीचे विशेष म्हणजे तीचे बांधकाम पांढऱ्या मातीत झाले जी गढीला इतकी मजबूत ठेवते की तोफगोळ्याच्या मार्याला तोंड देवू शकते. काही वर्षापूर्वीपर्यंत वंशज राहत होते पण कालओघाने पडझड व्हायला लागल्यावर जवळच बाहेर राहू लागले नंतर आत पूर्ण झाडोरा झाला आहे. आडसकर देशमुखांचे वंशज कै बाबुराव आडसकर हे आमदार होते. गढीवर प्रत्येक दसरा सणाला निशाण फडकवले जाते. अजून इतिहास उपलब्ध असेल तर तज्ञ जाणकारांनी ह्यावर प्रकाश टाकावा.
टीम - पुढची मोहीम
No comments:
Post a Comment