विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 21 April 2021

देशमुख गढी - डोंगरकिन्ही

 Saurabh Madhuri Harihar Kulkarni










देशमुख गढी - डोंगरकिन्ही
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही गावात देशमुखांची गढी आहे. पाटोदा हे तालुक्याचे गाव बीडपासून ५० कि.मी अंतरावर आणि डोंगरकिन्ही पाटोद्यापासून १७ कि.मी अंतरावर आहे. गढी आता अखेरची घटका मोजत आहे. गढीची तटबंदी आणि काही बुरूज शिल्लक आहेत. आतील सर्व आणि बाकी बुरूज, तटबंदी पूर्णपणे ढासळले आहे. एकूण ४-५ एकरावर असलेली ही गढी त्याकाळी किती वैभवशाली असेल ह्याची साक्ष देते. पूर्वी वतनदार, जहागिरदार, पाटील लोकांच्या गढ्या असत त्यापैकीच ही असावी. ह्यांचे वंशज पुणे, मुंबईत असतात त्यामुळे देखभाल होत नाही. गावकर्यांनाकडे इतिहास उपलब्ध नाही. तरी जाणकारांनी माहिती द्यावी ही विनंती.
टीम - पुढची मोहीम
https://www.facebook.com/groups/679472879096745/

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...