विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 24 April 2021

भीमा लव्हार (लोहार).

 

 भीमा लव्हार (लोहार).

सकाळी १०-११ची वेळ होती.१२-१३ वर्षाचे शिवाजीराजे पुण्यातील वाड्यात सदरेवर जात होते.सदर सुरु झाली आणि इतक्यातच पिळदार शरीराचा जखमी अवस्थेतील एक इसम तेथे आला.त्याचा शरीरावर जागोजागी जखमा आणि त्यातून वाहणारे रक्त होते.शिवाजीराजांनी त्याला पाहून विचारलं,''कोण तू? इथे कशाला आलास?  आणि ह्या जखमा कशा जाहल्या तुला?''

यावर तो म्हणाला,'' राज म्या भीमा..! भीमा लव्हार (लोहार). सातारकडचा हाय.पण पोटापाण्याकरता पुण्याला आलो हाय.म्या डोंगरावर लाकडं आणाया गेलो व्हतो.अन तिकडं महावर (माझ्यावर) ४-५ लांडग्यांनी हल्ला केला.म्या त्या समदयाना (सगळ्यांना) काठिण मारलं.त्यातला एक लांडगा मेला. तेव्हा लोक मला म्हणाली त्याची शेपूट शिवाजीराजांकड घेऊन जाय. ते तुला बक्षीस देतील. म्हणून मी इकड (इकडे) आलो हाय.''
                        ते दिवस ( सन१६४५ पूर्वीचे) महाराष्ट्राच्या इतिहासातले खूप वाईट आणि कठीणाईचे होते.पुण्यावर गाढवाचे नांगर फिरवले गेले. मुघली आणि आदिलशाही फौजा रयतेला जगू देत नव्हत्यात. सर्वत्र जंगल आणि कोल्हे लांडगे यांचा वावर होता.अशा परिस्थितीत पुण्याच्या जहांगिरीची जबाबदारी बाल शिवबा आणि जिजाऊ साहेबानी स्वीकारली.त्यांनी तिथे सोन्याचा नांगर फिरवला.पुणे पुन्हा वसवले.रयतेला खूप मदत केली.कोल्हे लांडगे यांसारख्या जनावरांच्या बंदोबस्तासाठी एक नियम केला. 'जो कोणी कोल्ह्या-लांडग्यांची शिकार करून त्याची शेपूट सरकारला दाखवील,त्याला सरकारकडून इनाम मिळेल..!' भीमा याच इनामासाठी आला होता.
                        सर्वप्रथम महाराजांनी त्याला वैद्याकडून औषधोपचार केला.त्यानंतर त्याला त्याच बक्षिस आणि एक तलवारीच पान दिल. आणि महाराज त्याला म्हणाले,'' भीमा..! आता काठीने नाही तर या तलवारीने शिकार करायची.''
                        भीमाने ती तलवार नीट निरखून पाहून महाराजांना म्हणाला,'' राज या तलवारीत भेसळ हाय.लढाईत इच तुकड व्हाईल.''
महाराजांनी त्याला स्वतः जवळची तलवार देऊन तपासायला सांगितली.ती नीट तपासून तो म्हणाला,'' राज हि उत्तम प्रकारची तलवार हाय.पण हिची मूठ जरा ढिली हाय.पण चिंता नको दुरुस (दुरुस्त) व्हाईल.''


                       भिमाच हे बोलण दरबारातील सर्वांनी ऐकलं. राजांनी दिलेल्या बक्षिसाची आणि स्वतः राजांच्या तलवारीचा भीमाने अपमान केला. महाराज आता त्याला शिक्षा देतील, असं त्या सर्वाना वाटलं. पण महाराज भिमावर खूप खूष होते.ते त्याला म्हणाले,''तलवारींची खूप माहिती आहे तुला.'' यावर भीमा म्हणाला,''व्हय राज.म्या लव्हार (लोहार) हाय.'' मग महाराज त्याला म्हणतात,'' आमच्या शूरवीरांसाठी उत्तोमउत्तम शस्त्रांची निर्मिती करशील. आम्ही तुला एक लोहारशाळा काढून देऊ.बनवशील हत्यार स्वराजासाठी?''
                        भीमाला काय बोलावे ते समजत नव्हते.स्वतः शिवाजीराजांच्या लोहारशाळेत काम करायची संधी त्याला आली होती.त्याने ती आनंदाने स्वीकारली.

                        वयाच्या १२-१३व्या वर्षीच महाराजांना माणसाची किती पारख होती हे आपल्याला यातून समजते.खरतर मावळे म्हटलं कि आपल्याला फक्त लढाईत लढणाऱ्याचीच आठवण येते.पण त्यांना उत्तम शस्त्रास्त्रे पुरवणे हि सुद्धा एक प्रकारची निष्ठाच होती.एक प्रकारची स्वराज्य सेवाच होती.
                        या कथेचे पुरावे इतिहासात मिळत नाही.याचा उल्लेख फक्त आख्यायिका आणि पोवाड्यांमधेच होतो.शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या 'स्वराज्याची शपथ' आणि 'तोरणा गड' या २ पोवाड्यात भीमा लोहाराचा उल्लेख केला आहे. तोरणा गड या पोवाड्यात ते म्हणतात कि भीमाला गवताचा भारा आणि त्यात तलवार देऊन गडाच्या मोहिमेला पाठवले.तेथे त्याने खूप सावधगिरीने काम फत्ते केले आणि स्वराज्याचे तोरण म्हणजेच तोरणा किल्ला स्वराज्यात आला.
(संदर्भ:- शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचे पोवाडे, श्रीमान योगी )  

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...