विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 4 April 2021

महादजी शिंदे उर्फ पाटील बावा

 पेशव्यांचा दिल्लीतील वकील गोविंदराव पुरुषोत्तम हिंगणे , १७८६ सालातील हिंदुस्थान ( उत्तर भारत) आणि


महादजी शिंदे उर्फ पाटील बावा यांचे महत्व याबाबत लिहितो -

" ... येथील प्रकार तर हिंदुस्थान निक्षत्री झाले. शीख आहेत, त्यात फूट आहे. कोणी कोणाचे स्वाधीन नाही. तद वाव पडल्यास जमिदारी करावयास ही लागतील. जर जबरदस्ती न पाहिली तर लुटीत फिरतच आहेत. हे शिखाचे वर्तमान आहे. वजिराचा प्रकार म्हणावा तर इंग्रजांवर त्याची दवलत आहे. त्यास सांप्रत्य इंग्रजांचा प्रकार हलका दिसतो. हिस्टीन विलायतेस गेला. त्याची बदली बडेसाहेब म्हणून आले आहेत. त्याचा बंदोबस्त हिस्टन प्रमाणे नाही व खजानाही पूर्वीप्रमाणे नाही. परंतु पहिली फरपट चालत आली आहे त्याजप्रमाने कारभार चालतो व पातशहा चा प्रकार म्हणावा, तरी एक लाख तीस हजार रुपये दरमहा चाकर आहे. तितका पैसा अक्षत मरिट मिळाला म्हणजे त्यास एका गावाशी व बिघाभर जमिनीची गरज नाही. त्याप्रमाणे हिंदुस्थानची अवस्था आहे. त्यास अवघे हिंदुस्थानचे बंदोबस्ताचे ओझे एकल्या राजश्री पाटील बावांवर आहे..."
भारतीय राजपटावर मराठ्यांची असलेली जबर पकड,याबाबत या पत्राहून आणखी कुठला दाखला देण्याची गरज आहे असं वाटत नाही
- शुभंकर अत्रे
द ग्रेट मराठा, वकील उल् मुल॑क, सुभेदार ए आग्रा अजमेर महादजी शिंदे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...