विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 4 April 2021

द ग्रेट मराठा ... महादजी शिंदे


 द ग्रेट मराठा ...

आज महादजी शिंदे
महादजी शिंदे हे हिंदुस्थानच्या इतिहासातले सोनेरी पान , द ग्रेट मराठा म्हणून ओळखले जाते . समकालीन पत्रातून माहादजी शिंदेचा उल्लेख "पाटीलबाबा" असा येतो . असेच एक पत्र खाली देतो आहे .
मराठयांचा राष्ट्रवाद शिंदे होळकरांनी पेटत्या पलित्याप्रमाणे हिंदुस्थानभर पसरवला. हे पत्र महादजी शिंदेबद्दल आणि , मराठयांच्या राष्ट्रवादा बद्दल आहे , या पत्रात सध्या पाकिस्तानात असलेल्या "लाहोर" चा सुद्धा उल्लेख आहे -
————————————————————
तारीख - 1-7-1792
गोविंदराव काळे यांचे फडणवीसांस लिहिलेले पत्र
" अटक नदीचे अलीकडे दक्षिण समुद्र पावेतो हिंदूंचे स्थान - तुरुकस्थान नव्हे - हे आपली हद्द पांडवांपासून विक्रमादित्यापर्यंत होती . त्यामागे राज्यकर्ते नादान निघाले . यवनांचे प्राबल्य आले . ...
त्यानंतर कैलासवासी शिवाजी महाराज शककर्ते व धर्म राखते निघाले .. हल्ली श्रीमंताचे पुण्यप्रतापेकरून राजश्री पाटील बावांचे ( महादजी शिंदे यांचे ) बुद्धी व तलवारीच्या पराक्रमेकडून सर्व (राज्य ) घरास आले . अगर मुसलमान कोणी असे केले , तरी मोठे मोठे तवारीखनामे ( जाहिरातबाजी )आले असते . यवनाच्या जातीत तिळाइतकी चांगली गोष्ट जाल्यास गगनाबरोबर (तुलना ) करून शोभवावी ; आमचे हिंदूत गगना इतकी झाली असता उच्चार न करावा हे चाल आहे ...
( महादजी शिंदेमुळे ) अलभ्य गोष्टी घडल्या . उग्याच दौलती पुसत घरास आल्या ...यवनांचे मनांत की काफरशाही जाली हे बोलतात . लेकिन ज्यांनी ज्यांनी उत्तर हिंदुस्थानात शिरे उचलली त्यांची त्यांची मस्तके पाटीलबाबानी फोडली ....
या उपरी हे जमाव व या फौजा 'लाहोरच्या' मैदानात असाव्यात , त्यांचे मनसुबे दौडावे , वेत्यास पडावे , तमाशे पहावे ...."
————————————————————
गेली शेकडो वर्ष मराठ्याच्या मनातल्या हिंदुस्थानच्या सीमारेषा अगदी सुस्पष्ट आहेत . उत्तरेला अटक नदी, दक्षिणेला समुद्र आणि पश्चिमेला लाहोर असा हिंदुस्थान मराठ्याना घडवायचा होता . आजचा भारत हे महादजी शिंदेनी पाहिलेले आणि प्रत्यक्षात आणलेले स्वप्न आहे . जीथपर्यंत मराठ्याच्या घोड्याच्या टापा पोचल्या तो भाग आज हिंदुस्थानात आहे . उरलेला भाग पाकिस्तानात आहे.
- डॉ अभिराम दीक्षित
१२/२/२०२१

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...