*अखंड भारताच्या स्वप्नासाठी जगणारे श्रीमंत सयाजीराव*
हे फोटोस बडोद्यातील कीर्ती मंदिर या सयाजीराव गायकवाड यांच्या समाधी स्थळाचे असून, महाराजा सर सयाजीराव गायकवाड यांनी कीर्ती मंदिर ची निर्मिती १९३४ ला केली आणि १९३६ साली त्याच उदघाटन करण्यात आलं याच ठिकाणी सयाजीराव गायकवाड महाराज आणि बडोद्याच्या रॉयल फॅमिली च्या समाध्या आहेत. यातील आतल्या बाजूला हिंदू पुरानावर आधारित अत्यंत सुंदर पेंटिंग्स नंदलाल बोस (बंगाल) यांनी साकारल्या आहेत. ज्या काळात भारत स्वतंत्र होण्याच्या बाबतीत इंग्रजांशी तर सोडाच पण आपसात पण कुणाची बोलायची हिम्मत होत नव्हती त्या काळात हिस हायनेस सयाजीराव यांनी इंग्रजांच्या विरोधाला धुडकावून अखंड भारत चा नकाशा (ज्यात सध्याचा भारत , पाकिस्थान , बांगलादेश , भूतान , नेपाळ , श्रीलंका, बरमा आणि अफगाण चा काही भाग) कीर्ती मंदिराच्या कळसावर लावला. "अखंड भारत व्हायला पाहिजे" असं १८८० मध्ये मुंबई दरबार मध्ये पहिल्यांदा सयाजीराव बोलले त्यावेळी ते फक्त १८ वर्षांचे होते आणि राज्यकारभार सांभाळून त्यांना अवघा काही समय लोटला होता. एका छोट्याशा संस्थानाचा राजा होण्यापेक्षा अखंड भारताचा साधारण नागरिक व्हायला मला जास्त आवडेल असंही हिस हायनेस हे प्रिन्स आगाखान पॅलेस मध्ये बोलले हा केवढा क्रांतिकारी विचार आहे याची आपण फक्त कल्पना करू शकतो !!!
स्वतंत्रलढा सुरु असताना स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती हे सयाजीराव होणार हे फिक्सचं होत असं गांधी, सावरकर , पटेल यांसारख्या अनेकांनी बोलून दाखवले पण दुर्दैवाने महाराजांचा मृत्यू 1939 साली झाला. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारख्या शेकडो राष्ट्र भक्तांना महाराजांनी आर्थिक मदत तर केलीच पण त्यापेक्षा अनेक मदती छुप्या मार्गाने केल्या. आजही कित्येक लोकांनी महाराजांच्या जीवनावर पी एच डी केली आहे.
कदाचित सयाजीराव असते तर आजच्या भारताचा नक्षा आणि चित्र हे फार सुंदर असलं असतं !!!
या सर्व क्रांतीकारींना मानाचा मुजरा !!!
यासारख्या अजून ऐतिहासिक फॅक्ट जाणून घेण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा :
Rohit Khindkar vLog : https://youtube.com/channel/UCACb-J6wIZwgSisXMDl3w_g
Sayaji Nagari : https://youtube.com/channel/UCoTvF0brMlY9J-xYxJgJu4A
माहिती : जेष्ठ इतिहासकार चंद्रशेखर पाटील, बडोदा
संकलन : रोहित खिंडकर
टीप : सदरील माहिती लेखकाने रिसर्च करून मिळवली आहे ती त्यांच्या नावासहितच शेअर करावी
No comments:
Post a Comment