विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 21 April 2021

जहागीरदार गढी - राईमोहा

 Saurabh Madhuri Harihar Kulkarni

















जहागीरदार गढी - राईमोहा
बीड जिल्ह्यातील शिरूर (कासार) तालुक्यातील राईमोहा गावात जहागीरदारांची भव्य गढी आहे. तीचे बुरूज, प्रवेशद्वार आजही मजबूत स्थितीत आहे. राईमोहा हे गाव बीड शहरापासून ३२ कि.मी अंतरावर आहे. काही भाग वगळता आतील भागाची पडझडीत सपाटी होत चालली आहे. गढीचे प्रवेशद्वार जीर्णावस्थेत असून ते बंद आहे. गढीवर पक्क्या वीटांचे बांधकाम असून. मुघलशाहीतील बांधकाम सहज लक्षात येते. गढीसमोर पुढ्यात भली मोठी मोटेची विहीर आहे. गावातच जहागिरीदारांचे वंशज सुलेमान पठाण हे वास्तव्यास आहेत.
गढी ही खास राहण्यासाठी बांधलेली वास्तू असून वतनदार, जहागीरदारांचे सामर्थ्य गढ्यांमध्ये असते. गढीमधील ऐतिहासिक अवशेष, गढीची माती, भौगोलिक स्थान तिची बांधकामाची पद्धत पाहता उत्कृष्ट , मध्यम आणि साधारण अशी विभागणी होऊ शकते. गढी बांधण्यासाठी गावाची रचनाही लक्षात घेतली जाते. गढीच्या व वाड्याच्या दृष्टीने गढीच्या जागेची निवड व पाया महत्त्वपूर्ण असे.
टीम - पुढची मोहीम

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...