पुरंदरच्या तहात 23 किल्ले मुघलांना दिल्यानंतर स्वराज्यात राहिलेले 12 किल्ले कोणते?
पोस्तसांभार :आशिष माळी
इतिहासात भूगोलाचे आणि नकाशाचे महत्त्व अननयसाधारण आहे. या भूगोलाचे महत्त्व शिवाजी महाराज , संभाजी महाराज आणि पहिला बाजीराव यांनी खुबीने केले. पालखेड ची लढाई आणि प्रतापगड ची लढाई तर भारतातली सर्वोत्कृष्ट लढाई . याच गोष्टीचा मिर्झा राजांनी स्वराज्यात चढाई केली त्याचा उपयोग केला. मिर्झा राजांनी किल्ल्यावर हल्ला न करत मैदानी भागात स्वराज्य वर घाला घातला. अनेक गावे लुटली. सामान्य मराठी माणूस लुटला जात होता. स्वराज्य म्हणाजे इथल्या माणसाचीच. जर सामान्य माणूस लुबाडल जातोय म्हटल्यावर शिवाजी महाराजांना शरण जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता.शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याला पहिला मोठा हादरा हा पुरंदर च्या तहामुळे बसला ज्यात शिवरायांना आपल्याकडील २३ किल्ले मोगलांना द्यावे लागले आणि १२च किल्ले स्वतःजवळ ठेवता आले.
त्यानंतर आला तो पुरंदरचा तह यामध्ये 'दख्हन कि तराह' म्हणजे दक्खनेचा भूभाग
याची आज पण कागदपत्रे बिकानेर मध्ये सांभाळून ठेवली आहे.त्याकाळी मिर्झा राजे यांनी ओबडधोबड असे नकाशे बनवले ते पण दिसतात.मिर्झा राजे व महाराज यांच्या दरम्यान पुरंदर च्या तहात जे काही करारनामा झाला होता त्याचे २२ फुट लांब पत्र राजस्थानातील बिकानेर पुराभिलेखागार येथे आहे.
किल्ले आणि किल्ल्यांवरील किल्लेदार /प्रशासक यांच्या नोंदी -
1.किल्ले लोहगड - औरंगजेबाकडे, किल्ल्याचा प्रशासक आणि पुण्याचा ठाणेदार म्हणून कुवाद खान नियुक्त
2.किल्ले तिकोना - औरंगजेबाकडे, प्रशासक म्हणून कुवाद खान नियुक्त
3.किल्ले कोंढाणा (सिंहगड ) - औरंगजेबाकडे, प्रशासक म्हणून कुंवर किरतसिंह नियुक्त
खडा-कलान (कसबा पुणे ) - औरंगजेबाकडे
4.किल्ले पुरंदर - औरंगजेबाकडे
5.किल्ले रुद्रमाळ (पुरंदर शेजारील वज्रगड) - औरंगजेबाकडे
6.किल्ले कर्नाळा - औरंगजेबाकडे
7.किल्ले माणिकगड - स्वतः औरंगजेबाच्या प्रशासनाखाली
8.किल्ले तळकोट - संभाजीराजे यांच्याबरोबर इथे किल्लेदार पाठवला जाईल
09.किल्ले मृगगड - अद्याप किल्लेदार नाही
10.किल्ले सागरदुर्ग उर्फ खेडदुर्ग (अलिबाग) - औरंगजेबाकडे
11.चौल - अजून किल्लेदार नियुक्त नाही
12.अंकोला (अंकली ?)
13.मानगड (माणगाव जवळ )- अजून किल्लेदार नियुक्त नाही
14.किल्ले कुर्डूगड उर्फ विश्रामगड (माणगाव जवळ) - स्वतः औरंगजेबाच्या प्रशासनाखाली
15.किल्ले परवलगड उर्फ प्रबळगड उर्फ मुरंजन ( पनवेल जवळ) - स्वतः औरंगजेबाच्या प्रशासनाखाली
16.किल्ले विकटगड उर्फ पेब ( पनवेल जवळ) - स्वतः औरंगजेबाच्या प्रशासनाखाली
17.कसबे कल्याण
कसबे वाह्पुरी (?)
18..किल्ले नरटक्का उर्फ सिध्दगड (भीमाशंकर जवळील कोकण भाग) - अजून किल्लेदार नियुक्त नाही
19.किल्ले पळसखोल (कर्जत जवळील) - अजून किल्लेदार नियुक्त नाही
20.किल्ले माहुली (कर्जत जवळील) - अजून किल्लेदार नियुक्त नाही
21.किल्ले भंडारटक्का उर्फ भंडारदुर्ग (कर्जत जवळील) - अजून किल्लेदार नियुक्त नाही
22.किल्ले रुपगड -अजून किल्लेदार नियुक्त नाही
23.किल्ले इसागड (हा पनवेल जवळील इरशाळगड असावा ) - अजून किल्लेदार नियुक्त नाही
किल्ले जुन्नर (जुन्नर शहर कि शिवनेरी ?) - स्वतः औरंगजेबाच्या प्रशासनाखाली
No comments:
Post a Comment