पुरंदरच्या तहात 23 किल्ले मुघलांना दिल्यानंतर स्वराज्यात राहिलेले 12 किल्ले कोणते?
1.किल्ले अनस्वरी (नक्की कोणता किल्ला कळू शकला नाही)
2.किल्ले पालगड (दापोलीजवळ)
3.किल्ले भूरपगड (सुधागड,पालीजवळ)
4.किल्ले कावळा (वरंध घाट )
5.किल्ले राजगड
6.किल्ले तोरणा
7.किल्ले लटकनगड
8.किल्ले रायपुर किल्ला (रायगड )
9.किल्ले तळागड
10.किल्ले धोसळगड (घोसाळगड असावा )
11.किल्ले महागड (?)
12.किल्ले ओखर्डा किल्ला (?)
याच बरोबर जव्हार,पुणे,पाटण,इंदापूर,जुन्नर,जावळी,वेळापूर,बांदा,सांगली,गोवा या भागांचाही नकाशात समावेश आहे.
पुरंदरचा तह म्हणजे मराठ्यांचे प्राणपणाने लढाया करून मिळवलेले किल्ले स्वाधीन करण्याचा हा वाईट प्रसंग होता परंतु त्यातून सावरून लगेचच ३ वर्षात तहात गमावलेले सर्व किल्ले शिवाजीराजांनी परत मिळवले, आणि त्यानंतर काही वर्षा त छत्रपती झाले
मिर्झा राजे जयसिंह चे नकाशे
संदर्भ
1.Rajasthan State Archives Museum, Bikaner, by Dronah - ArchitectureLive!
2.History lovers rejoice. 1665's Purandar treaty translated from Farsi to Hindi
3.A NOTE ON MIRZA RAJAH JAI SINGH'S PURANDAR AND BIJAPUR CAMPAIGNS
4. शक कर्ते विजय देशमुख
5.The Battle of Purandar and the Purandar Treaty
6.Sivaji: Life, Conquests and Conflict with Mughals
No comments:
Post a Comment