विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 14 May 2021

तिसऱ्या पानिपत युद्धात कोण कोण लढले नाहीत?


 तिसऱ्या पानिपत युद्धात कोण कोण लढले नाहीत?

पोस्तसांभार :आशिष माळी
पानिपतच्या युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठी हानी झाली. या युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे-"दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य". खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. या युद्धामुळे मराठ्यांचे लश्करी वर्चस्व संपुष्टात आले. ज्याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफवण्यास झाला.[1]
पण तरी देखील मराठ्यांची बाजूने न लढणारे खूप लोक होते . यात चूक कोणाची हे त्या परिस्थितीत अवलंबून होते.
शीख :-१७५८ मध्ये रघुनाथराव यांनी अटक पार मोहिमे मध्ये शिखांची आणि आदिन बेग ची मदत मिळाली होती. पण पुढे अदिना बेग ला समर्थन देण्या नादात मराठ्यांनी शीख ना नाराज केले. त्यामुळे बहुतांश शीख हे जस्सा सिंह अहलुवालिया च्या नेतृत्व खाली होते आणि त्यांनी या युद्धात अलिप्त राहायचे ठरवले . तरीपण मराठ्यांना रसद ही शिखांनी पुरावलीच. जर शीख मराठे बाजूने उभे असते तर अब्दालीने पळ काढला असता हे निश्चित.तरी पण जस्स सिंह चे महाराष्ट्रावर खुप उपकार आहे. पानिपत मधून कैदी बनवलेल्या अनेक मराठा महिला आणि लहान मुलांना जस्सा सिंह ने मुक्त केले.अलीसिंह नावाचा शीख सरदार रसद पुरवत असे पण युद्धात अलिप्त होता.
सुरजमल जाट (सुरुवातीला मराठ्या बरोबर होता पण नंतर भाऊ बरोबर वाद होऊन तो बाहेर पडला ,तरी पण पराभूत मराठा सैन्यास मानाने वागवले. जेंव्हा उत्तर भारतीयान पराभूत मराठे सैन्यास लुटले आणि मारहाण केली तेंव्हा सुरजमाल नेच मदत केली )
नागपूर चे भोसले घराणे.यावेळी नागपूर संस्थानात जानोजी भोसले राज्य करत होते. त्यांचा राघोजी भोसले इतके शुर नव्हते आणि पेशव्यांस पटत नव्हते . शिवाय इतर ठिकाणी त्यांची फौज गुंतली असल्याने त्यांनी पानिपतात भाग घेतला नाही.
अक्कलकोट चे भोसले घराणे. बाळा साहेब भोसले यांनी फत्तेसिंह भोसले च मृत्यूनंतर नुकताच राज्यकारभार हाती घेतला होता. अक्कलकोट चे भोसले साम्राज्य काहीसे पेशवे विरोधात होते.
कोल्हापूर संस्थान.:- ना पेशव्यांनी मदत मागितली ना कोल्हापूर संस्थान ने दुसऱ्याचे संकट अंगावर चढवून घेतले नाही.
हैदराबाद निझाम सलाबत जंग उर्फ मिर सय्यद मोहम्मद खान (दिल्लीचा वजीर गाझी हा याचा काका होता त्यामुळे आणि मराठे पानिपतात जिंकले तर शत्रुत्व पण पराभूत झले कळलिवार याचा फायदा घ्यायचा प्रयत्न केला.)
राजपूत घराणे हे मराठ्यांच्य चौथ ल कंटाळले होते. असे अनेक इतिहासकार म्हणत असले तरी याच राजपुतान नी दिल्ली का चौथ दिला. खरं म्हणजे त्यांना मराठ्यांचा उत्कर्ष पसंद नव्हता.
जयपूर चां माधो सिंह:
जोधपूर च रामसिंह
बिजेसिंह
म्हैसूर चे कृष्णराज वादियार २ , हा अकुशल राजा आपल्याच राज्यातील अंतस्थ राजकारणात गुंतून पडला होता. त्यावेळी हैदर अली च वाढता प्रभाव राजांच्या जनानखानयाला आवडत नव्हता म्हणून हैदर आली आणि खंडे राव ला नजरकैदेत ठेवले होते. १७६१मध्ये मराठ्यांचा पराभव हैदर आली च्या पथ्यास पडला आणि त्याची सुटका झाली.तसे हे घराणे थकलींकही कमजोर होते आणि मराठ्यांच्य विरोधात त्यामुळे पानिपत युद्धात भाग घेणे अशक्यच.
त्या शिवाय अनेक राजपूत घराण्यांनी मराठा मधील वादास कंटाळून पानिपत युद्धापासुन लांब राहायला पसंद केले
बुंदी चे चौहान
कोटाचे चौहान
बिकानेर चे राठोड
मेवाड चे सिसोदिया
कच्छ जडेजा , जलोन चे सोंगेरे
13.उदगीर च लढाई नंतर भाऊ आणि दादा मध्ये वाद झाला. भाऊ लेखी काम सांभाळायचे (सदरचे काम). अटक मोहीम मध्ये मराठ्यांच्या विजय झाला पण खुप कर्ज झाला. त्यामुळे भाऊ दादांना हिशेब विषयी विचारायचे. दादा च स्वभाव उधले पट्टी च. वाद वाढल्यावर दादाने (राघोबा)बसादशिवभाऊ ना युद्ध करण्याचे आवाहन दिले होते. त्यामुळे पानिपत मोहीमे ची जबाबदारी भाऊंनी नानासाहेब पेशवे काढून मागून घेतली. पण पानिपत च युद्ध जिंकले तर भाऊ चे नाव मोठे होईल या भीतीने गोपिकाबाई(नानासाहेब ची बायको)यांनी ही मोहीम मध्ये विश्वासराव यांना पाठवण्याची तगादा नानासाहेब पेशवे कडे लावला. आणि मोहीम ही आधिकृत विश्वासराव यांच्या नावाने झाली. पण सूत्रे भाऊसाहेब (सदाशिव भाऊ कडेच)राहिली. या कारणाने राघोबा दादा मोहीम पासून दूर होते. शिवाय पुण्यास निझाम हैदर किंवा अन्य शत्रूपासून धोका होऊ नये म्हणुन राघोबादादा मागे थांबले.
संदर्भ.referance.
A Tale of Two Cities: Pune and Nagpur
When Sikhs Rescued Maratha Women | SikhNet
छायाचित्र : विश्वास पाटील पानिपत पुस्तक
तळटीपा
[1] 'पानिपता' चा इतिहास

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...