शिवशाहीचा अस्त होऊन पेशवाई का व कशी आली?
पोस्तसांभार ::आशिष माळी
शिवशाही आणि पेशवाई ही वेगळी नाही. पण सातारा च छत्रपती चे महत्व कमी होऊन पुण्याचे पेशव्यांचे महत्त्व वाढले.ते सुद्धा बार भाई काळात कमी झाले. दुसऱ्या बाजीराव काळात सुद्धा माधवराव पेशवे सारखे सत्ताकेंद्र प्रबळ बनले नव्हते हेही सत्य.
पेशवा म्हणजे मुख्य वजीर हे शिवाजी महाराज याकडे पहिल्यापासून चालत होते. ताराराणी आणि शाहू महाराज यांच्या मध्ये सत्तासंघर्ष झाला आणि बाळाजी विश्वनाथ यांनी मोलाची कामगिरी केली. 1719 मध्ये त्यांनी येसूबाई आणि शिवाजी महाराज यांची पत्नी शिवाय इतर स्त्रिया यांना सोडवून आणले. सय्यद बंधू मदतीने मराठ्यांना चौथ मिळवून दिला. पुढे बाळाजी मरण पावल्यावर पहिला बाजीराव कडे पेशवाई आली. बाजीरावांनी मराठा साम्राज्य खूप मोठे केले . तयानंतर नानासाहेब कडे पेशवाई आली.
२५ जुन १७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी सातारा दरबारी नानासाहेबांना पेशवाईची वस्त्रे प्रदान केली. त्यांच्या पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याने उत्तर भारतात जरब बसवली. इ.स. १७६० च्या आसपास मराठा साम्राज्य ही भारतीय उपखंडातील एक बलाढ्य ताकत बनली. परंतु १७६१ च्या तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा नानासाहेब पेशवे यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आणि त्याच्या धक्काने त्यांचा मृत्यू झाला.[1]
शाहू महाराज (संभाजी महाराजांचे पुत्र) हे लहान पासून मुघलांच्या कैदेत होते. नंतर सुद्धा त्यांनी स्वराज्य विस्ताराच्या कामासाठी पेशवे वर जास्त अवलंबून होते. मात्र शाहू महाराज 1749 का मृत्यू पडल्यावर त्यांना मुलगा नसल्याने वारस कोण हा प्रश्न होता. शाहू महाराज त्याच्या सरदारांनी पुढील व्यवस्थेचा उपक्रम ठरवून त्यानुसार हालचाली सुरु केल्या. त्याचवेळी त्याची पत्नी व चुलती अनुक्रमे सकवार आणि ताराबाईने भांडण चालू सुरवात केली.
तिकडे ताराबाईने सर्व रागरंग पाहून सक्तीचा राजकीय संन्यास सोडण्याची हीच एक संधी असल्याचे जाणून शाह महाराज यांना सांगितले कि, ‘ बाहेरचा दत्तक घेऊ नये, माझा नातू हयात आहे. ‘ ताराबाई वयोवृद्ध असली तरी तिचा महत्त्वाकांक्षी आणि त्रासदायक स्वभाव शाहूच्या परिचयाचा असल्याने त्याने ताराबाईवर विश्वास ठेवला नाही. तेव्हा तिने याचे साक्षीदार म्हणून करवीरकर भगवंतराव अमात्याचे नाव सांगितले. ( भगवंतराव हा सुप्रसिद्ध मुत्सद्दी रामचंद्रपंत अमात्याचा मुलगा ) शाहूने त्यांस शपथक्रिया करून सदर गोष्ट सत्य कि खोटे असल्याचे सांगण्यास सांगितले असता त्याने ताराबाईच्या सांगण्यास सत्य सांगितले . तेव्हा सर्व विचार करून शाहूने ताराबाईच्या नातवास आपल्या नंतर वारस निश्चित केले.
ताराबाईचा नातू राजाराम उर्फ रामराजा याचे नाव भावी वारस म्हणून नक्की झाला.१५ डिसेंबर १७४९ रोजी शाहू महाराज यांचा मृत्यू झाल्यावर सकावर बई सती गेल्या की सर्वांनी विचाराने सकवारबाईस सती घालवले ते इतिहासाला माहित.
शाहूने आपल्या मृत्यूपूर्वी दोन लेखी सनदा पेशव्यास लिहून दिल्या गेल्या होत्या. त्यानुसार चिटणीसाच्या सल्ल्याने शाहू महाराजांच्या नंतर जो सत्तेवर येईल त्याच्या आज्ञेत राहून राजमंडळ, राज्यकारभार चालवायचा होता. अर्थात, चिटणीस – पेशव्याने एकविचाराने वर्तून रामराजास हाताशी धरून राज्याचा गाडा हाकायचा होता.
रामराजा जरी ताराबाईचा नातू असला तरी राजकारणात तिला महत्त्व न देता छत्रपतीस आपल्या बाजूस अनुकूल करून घेतले. यामुळेच ताराबाई पेशव्याच्या विरोधात गेली. ज्या भगवंत अमात्याने रामराजाची खातरजमा शाहूकडे केली होती, त्यांना रामराजाचे पेशव्याच्या कह्यात जाणे आवडले नाही. त्यानेही याबाबतीत छत्रपतीस पुष्कळ सांगितले केला खरा, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
पुढे पुढे नानासाहेब आणि ताराबाई यामध्ये संघर्ष वाढतच गेलं. राजाराम महाराज यांची समाधी सिंहगड वर होती. आणि सिंहगड पुण्याजवळ.पेशव्याने सचिवाकडे सिंहगडाची मागणी करत बदल्यात दुसरा किल्ला देण्याचे तयारी दाखविली. पण त्यावेळी रामराजा तास पेशवे यांचं पटले नाही.रामराजा व ताराबाईवर मात करत लष्करी बळावर सिंहगड ताब्यात घेतला. सचिवाचे प्रतिनिधीचा प्रदेश ताब्यात घेण्याची झपाटा लावला.
पुढे २५ सप्टेंबर १७५० मध्ये सांगोला येथे . रामराजा ताराबाईच्या नियंत्रणाबाहेर असल्याचे पाहून पेशव्याच्या सुचनेनुसार व रामचंद्र मल्हारच्या सल्ल्यानुसार भाऊने छत्रपतींशी तह करून राज्याची कुलमुखत्यारी पेशव्यास मिळवून दिली. या तहानुसार पेशव्यांनी छत्रपती ना दरसाल ६५लाख रुपये द्यायचे ठरले दौलती ची खर्च साठी.
(१) भवानराव प्रतिनिधीपदी राहून यमाजी शिवदेवचा पुतण्या त्याचा मुतालिक झाला.
(२) दाभाड्यास निर्वाहापुरता खर्च देऊन गायकवाडाकडे निम्मी गुजरात देऊन उर्वरित पेशव्याकडे आली.
(३) कर्नाटक सुभा बाबूजी नाईकच्या नावे होता, तो जास्ती रसद कबूल करून पेशव्याकडे घेतला. (४) गोविंदराव चिटणीसाने छ्त्रपतीजवळ कारभार करावा तर त्याचा भाऊ बापुजी खंडेरावने लष्करासह छत्रपतीजवळ राहवे. याकरता प्रतिनिधीचा काही प्रांत व इतर प्रदेश मिळून चार लाखांचा सरंजाम त्यांना देण्यात आला.
(५) यशवंतराव पोतनीसला कारखाने व खासगी कारभार देत पोतनिशी व चाळीस हजारांचा सरंजाम दिला.
(६) छ्त्रपतीच्या खर्चाकरता शाहूच्या वेळी जी व्यवस्था होती तीच कायम राहावी.
याच सांगोला तहाने मराठ्या राज्यावर छत्रपती नाममात्र झाले आणि पेशवे मुख्य कारभारी. पण पुढील अवघ्या 20 वर्षात पेशवे नाममात्र झाले आणि बारभाई मुख्य कारभारी झाले. पुढे 1800 पर्यंत नाना फडणविस, तुकोजी, महादजी अहिल्याबाई सारखे धुरंधर पाच वर्षात मरण पावले आणि दुसरा बाजीराव सारखा नाठाळ पेशवा झाला आणि स्वराज्य बुडाले.
1)Peshawe Gharanyacha Itihas (पेशवे घराण्याचा इतिहास)
2) Grand duff
[2]
1)Peshawe Gharanyacha Itihas (पेशवे घराण्याचा इतिहास)
2) Grand duff
No comments:
Post a Comment