स्वराज्याचे चौथे छत्रपती -
छत्रपती थोरले शाहु महाराज
१८ मे १६८२ या दिवशी रायगडावर छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसुबाईसाहेब यांना पुत्ररत्न झाले .
हेच छत्रपती संभाजीपुत्र पुढे थोरले शाहु महाराज इतिहासामध्ये अजरामर झाले.
त्याचवेळेस लाखो सेनासागराबरोबर औरंगजेब स्वराज्यावर चालुन आला होता .
संभाजीराजे मोठ्या आत्मविश्वासाने औंरजेबाशी संघर्ष करत होते, नियतीने गलती केली आणि शिवपुत्र मुघलांच्या हाती पडला.
त्यावेळी हा शंभुपुत्र अवघा आठ वर्षाचा होता .
रायगड पडल्यावर महाराणी येसुबाई साहेब व शंभुपुत्र यांना औरंगजेबाच्या कैदेत रहावे लागले .
तरीही छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध अविरत चालुच होता .
ते स्वातंत्र्ययुद्ध तब्बल २७ वर्ष चालुन , औरंगजेबाच्या शेवटच्या श्वासाबरोबर थांबले .
दरम्यानच्या दिर्घ काळात ( १६८९ ते १७०७ ) छत्रपती थोरले शाहु महाराज हे मुघलांच्या कैदेतच होते.
औरंगेजेबाच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई यांच्या कुशल राजकारणाने तब्बल १८ वर्ष मोगलांच्या कैदेत असलेले शंभपुत्र शिवाजी उर्फ थोरले शाहु महाराज ह्यांची सुटका झाली आणि खऱ्या अर्थाने शाहु महाराज इतिहास घडण्यास सुरुवात झाली
*_छत्रपती शाहु महाराज इतिहास_*
अजिंक्यतारा किल्ल्यावर छत्रपती शाहु महाराज १२ जानेवारी १७०८ या दिवशी छत्रपती जाहले .
पण या १८ वर्षात शाहु महाराजांना घडविणार्या मातोश्री येसुबाईसाहेब यांचे आभाळाएवढे कर्तृत्व आम्ही लक्षात घ्यायला हवे . छत्रपती शाहू महाराजांचा काळ म्हणजे मराठा साम्राज्यातील सुवर्ण काळ मानला जातो. छत्रपती शाहू महाराजांच्या मुत्सदी राजकारणाने अनेक मराठी घराणी उदयाला आली.
सामान्यातला असामान्यत्व उफाळून आलं.
शाहू महाराजांनी या घराण्यातील शूर पुरुषांचा कौशल्याने उपयोग करून घेतला, त्यांच्या गुणाची कदर केली, त्यांना उत्तेजन देऊ केले, वेळोवेळी त्यांची पाठ थोपटली.
याचाच परिणाम म्हणून हे पुरुष मोठमोठी धडाडीची राजकारण स्वतःच्या ताकदीवर पेलून, छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेल्या स्वराज्याचा रोपट्याला, स्वतःच्या रक्तमांसाच खतपाणी घालू लागले. बघता बघता या रोपट्याचा वटवृक्ष झाला व तो फोफावला. त्याच्या पारंब्यानी संबंध हिंदुस्थानावर आपली छाया धरली.
संपूर्ण हिंदुस्थान स्वराज्यात आणणारे व दिल्लीवर भगवा फडकवणारे हे स्वराज्याचे चौथे छत्रपती इतिहासात आजरामर झाले.
छत्रपती शिवरायांचे स्थापलेले हिंदवी स्वराज्य अटकेपार न्हेवून थोरल्या शाहु महाराजांनी इतिहास घडवला.
छत्रपती शाहू महाराजांनी अगदी विलासी आयुष्य जगले.
मराठा साम्राज्याचे छत्रपती असूनही त्यांचे अगदी साधे राहणीमान होते......
*_मराठा साम्राज्याच्या या साम्राज्य कर्त्याला_*
*_जयंती निमित्त मानाचा मुजरा
_*

No comments:
Post a Comment