अजातशत्रू






18 मे१६८२रोजी मौजे गांगवली , माणगाव तालुका, जि रायगड येथे तर मृत्यू १५डिसेंबर १७४९सातारा


राजधानी :--किल्ला अजिंक्यतारा
आजोबा :--छत्रपती शिवाजी राजे शहाजीराजे भोसले
वडील :-छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
आई:-महाराणी येसुबाई साहेब राणीसरकार
काका :-छत्रपती राजाराम महाराज साहेब
विशेष नोंद :-छत्रपती थोरले शाहू महाराजांनी आपल्या आईसाहेब महाराणी येसूबाईसाहेब सरकार यांच्या निधनानंतर महाराणी ताराबाई साहेब माँसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार चालविले आहे कारण एक छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या अनेक पत्रातून महाराणी ताराबाई साहेब माँसाहेब यांची उल्लेख आईसाहेब असे येत व आपले वारसदार म्हणून दत्तक घेताना आईसाहेब महाराणी ताराबाई साहेब माँसाहेब यांच्या सूचनेनुसार छत्रपती राजाराम महाराजांची पुत्र छत्रपती शिवाजीराजे यांच्या पुत्रास म्हणजे रामराजे यास दत्तक घेतला आहे
बहिण :-भवानीबाई राणीसरकार महाडिक घराण्यातील शंकरोजीराजे महाडिक यांच्या शी विवाह
पत्नी :- १)अंबिकाबाई राणीसरकार, :- जाधवराव घराणे सिदंखेडराजा
२)महाराणी सावित्रीबाई राणीसरकार,:- कण्हेरखंड येथील शिंदे घराणे
३) महाराणी सुगाणाबाई राणीसरकार :-शिर्के घराणे
४) महाराणी सकवारबाई राणीसरकार तळबीड येथील मोहिते घराणे


१)बहिरो रामेश्वर पिंगळे - पेशवा
२)धनाजीराव जाधव - सेनापती
३)नारो शंकर- सचिव
४)रामचंद्र पुडे- मंत्री
५)महादजी गदाधर - सुमंत
६)अंबुराव हणमंते ऊर्फ ७)बाळकृष्ण वासुदेव - अमात्य
८)होनाजी अनंत - न्यायाधीश
९)मुदगलभट - पंडितराव
सरलष्कर-हैबतराव निंबाळकर.
चिटणीस- खंडोबल्लाळ .
पायदळ सरनोबत :-सरदार पिलाजीराव गोळे
पोतनिशी व खासनिशी- आनंद प्रभू ( मुरारबाजीचा पुतण्या )
अशा नेमणुका केल्या
. तसेच
थोरले शाहू महाराज यांनी परसोजी भोसले यांनी सेनासाहेब सुभा ही पदवी ही दिली
.. तर सल्लागार पदी हे रायभानजी काका भोसले हे होते त्याच्या निधनानंतर हे पदवी सुभेदार पिलाजी राव जाधवराऊ यांना दिले .
जित्याजी केसरकर हे मार्गदर्शन करतो.





१)अक्कलकोटकर :- युवराज फत्तेहसिंह राजे भोसले
२)ग्वाल्हेरकर:- सरदार राणोजीबाबा शिंदे
३) गुजरात :-सेनापती :-खंडेराव दाभाडे
४)बडोदाकर :-सरदार दमाजीराव गायकवाड
५) इंदुरकर :-सुभेदार मल्हारराव होळकर
६) नागपूरकर :--सेनासाहेबसुभा परसोजीराजे भोसले
७)धारेकर:-- उदाजीराव पवार
८)गजेंद्रगडकर :-हिंदुराव घोरपडे
तर पंतप्रधान "-बाळाजी विश्वनाथ व पहिला बाजीराव यांनी उत्तर तील मराठ्यांचा राज्यविस्तार साठी छत्रपती शाहू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा भूमिका वठवली
यासह अनेक घराणे तत्कालीन कालखंडात छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या नेतृत्व खाली आपल्या पराक्रमाने उदयास आले पण वेळी अभाव येथे देणे शक्य नाही 













।।तुम्ही अटकेपार नेला।।
।।दरियावरच्या शिवाजीस
तुम्ही आपुला केला।।
।।अहद पेशावर तहद तंजावर।।
।।साम्राज्य स्वप्न पुर्ण केले।।
मराठा रियासतीचे आपण छत्रपती स्वामी झाले।।
दख्खनेच्या घेडीस पाजले यमुनेचे पाणी।.
।।शत्रूला ही भुरळ पाडी ऐसी मधाळ वाणी।।
।।अटकेपार रोविले झेडे ते मानाजी पायगुडे।।
।। आजही उत्तरेत घुमती त्याचा पराक्रमी चौघडे।।
।।शिदेशाही होळकरशाही।।
।।स्वामी आपण घडविली।।
।।हिदुस्थानचे देशमुख ।।
असा तुमचा दरारा।।
।।मराठयाच्या टापाखाली आणाला हिदुस्थान सारा।।
।।दिल्लीचेही तख्त राखिले।।
।।परख्याची मिजास लागली उतरू।।
।।शिवछत्रपतीचे स्वप्न पुर्ण केले।।
ते थोरले शाहू अजातशत्रू.. अजातशत्रू... अजातशत्रू।।







शाहू महाराजांचा राज्याभिषेक १२जानेवारी १७०८रोजी साताऱ्यात अजिंक्यताऱ्यावर झाला.
शाहू महाराजांनी वयाची १९वर्षे औरंगजेबाच्या कैदेत काढली .८मे १७०७रोजी औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम याने त्यांची मुक्तता केली. शाहू महाराजांनी स्वतःस १२जानेवारी १७०८ रोजी साताऱ्यातील अजिंक्यताऱ्यावर राज्याभिषेक करवून घेतला . शाहू महाराजांनी प्रथमच मराठ्यांची राजधानी गडावरून जमिनीवर आणली.त्यांनी मराठा स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले.शाहू महाराजांनी ५ जून १७३०रोजी रायगड मुघलांकडून घेतला. १३एप्रिल १७३१रोजी कोल्हापूरकर छत्रपती संभाजी व शाहू महाराज यांच्यामध्ये वारणेचा तह झाला व कोल्हापूर व सातारा राज्याची वारणा नदी हद्द ठरली .अखेरीस १५ डिसेंबर १७४९ रोजी साताऱ्यातील महालात छत्रपती थोरले शाहू महाराजांचे निधन झाले.



राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य
संतोष झिपरे9049760888
No comments:
Post a Comment