विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 14 May 2021

मराठा इतिहासातील गमती-जमतीचे उदाहरण

 


मराठा इतिहासातील गमती-जमतीचे उदाहरण

पोस्तसांभार :आशिष माळी
चिमाजी अप्पांनी पोर्तुगिज वर विजय मिळवला त्यावेळची गोष्ट. पहिल्या बाजीराव ची युद्ध कला आणि शौर्य तर सर्वना माहीतच आहे. पण आणखी एक गुण त्याकडे होता ते म्हणजे त्यांना जनावरे ओळखण्याची अपार क्षमता. घोडे हत्ती अनेक त्यांच्या परख्या नजरेतून ते ओळखत असे .त्यावेळी एका उमद्या अरबी घोड्यावरून रपेट मारताना त्यांना एक हत्तीचा व्यापारी दिसला. त्याकडे अनेक आसाम वरून आणलेला हत्ती दिसले. व्यापाऱ्याने सर्व हत्तींची माहिती सांगितली पण एका हत्तीची माहिती सांगायला टाळत होता. तो मोठा काळा हत्ती चे धुड पाहुंन त्याचे विषयी विचारले.त्यावेळी माहूत बोलला की "काय सांगू या हत्ती विषयी ? " बाजीरावांनी या हत्ती विषयी विचारले की दिसतो तर खुप मोठा ? त्यावेळी माहूत बोलला याची नाव कुंभकर्ण . बाजीरावांनी न राहवून विचारले की नाव कुंभकर्ण का? झोपतो का खुप ?
माहूत बोलला नुसता झोपत नाही तर खातो खुप. इतर हत्तीपेक्षा तिप्पट खातो.
याचे दोनच काम खुप खाणे आणि खुप झोपणे.आता हा हत्ती कोण विकत घेत नाही. हे ऐकल्यावर बाजीरावांनी तो हत्ती विकत घ्यायचे ठरवले आणि घेतला पण.
दोनच दिवसांनी इंग्रजांचा एक दुत मुंबईहून श्रीमंत पेशव्यांना भेटायला आला. त्याने मोठा नजराणा आणला होता. नुकताच वसई जिंकल्यामुळे इंग्रजांची अवस्था बेकार होती. इंग्रजांचे मुख्य ऑफिस त्यावेळी सुरत ला होते . पेशव्यांना खुश ठेवले पाहिजे नाहीतर आपली काय गत होईल हे इंग्रजांनी ओळखले होते. पूर्ण उत्तर फिरांगण पेशव्यांनी काबीज केलेले. त्यामुळे मुंबईचा गव्हर्नर रिचर्ड बुर्शर पुण्यात खास दुत पाठवला.उत्तर फिरंगण म्हणाजे वसई अलिबाग आणि दक्षिण फिरांगान म्हणाजे गोवा.
मोठे मोठे नजराणे स्वीकारल्यावर बाजीरावांनी त्याला पार्टीचे वीडे देताना अनेक भेट दिल्या श्रीवर्धन मधील हापूस आंबे बरोबर आनिखी एक भेट दिली.इंग्रज दुताने कौतुकाने आणि घाबरत विचारले दुसरी भेट वस्तू काय ? तर बाजीरावांनी हत्तीकडे बोट दाखवून बोलले की हा देखणा काळा हत्ती. आमचा खास मर्जितला आहे . पण याला नीट सांभाळा... बर का....नाही सांभाळला तर आम्हाला हल्ला करायला एक कारण भेटेल. हा आमचा कुंभकर्ण. दुत ला नाना शंका येऊ लागले मोठे धुड घेऊन घाटातून जायचे मोठे अवघड काम.
कसेबसे मुंबईत पोचल्यावर रिचर्ड बुर्शर ने हा हत्ती सर्वांना कौतुकाने दाखवत होता. बाजीराव ची तारीफ करत होता.
पण दोन दिवसांनी इंग्रजांचा स्टोअर कीपर धावत आला... सर तो हत्ती आहे ना...त्याने एकट्याने 400 शेर तांदूळ खाल्ला आहे. असच होत राहिले तर धान्याचे कोठार काही दिवसात संपेल.
रिचर्ड बुर्शर चे डोके फिरू लागले. त्याला बाजीरावांची चाल समजली .आता इतर इंग्रज रिचर्ड बुर्शर ची टर उडवू लागलो. दिवस चालले होते . आणि धान्याचे कोठार संपत होते. हत्तीवरचा अनावश्यक खर्च वाढत होता. हत्ती सांभाळलं तर अफाट खर्च आणि हकालाला तर बाजीरावांचा रोष.
त्यावेळी मुंबईच्या इंग्रजांना सुरतचे इंग्रज त्रास देत होते.पश्चिम किनारपट्टीवर सुरत चे वर्चस्व होते.
रिचर्ड बुर्शर आणि सुरतचा बॉस चे जमत नव्हते. आता या बेरक्या रिचर्ड बुर्शर च्या डोक्यात एक कल्पना आली.
दुसऱ्या दिवशी रिचर्ड बुर्शर ने एका वकिलाला बोलावले . आणि त्याकडे एक पत्र आणि कुंभकर्ण देऊन त्याला सुरत ल रवानगी केली. त्या पत्रात त्याने लिहला. आमचा खास दुत पुण्याला जाऊन बाजीराव सहेबाकडे जाऊन आला . त्यांनी काहिंखास भेट इंग्रजांना दिल्या.त्यातील सर्वात मोठी आणि महत्वाची भेट आपल्याला पाठवत आहे. त्याचा स्वीकार व्हावा. या भेटीवर पेशव्यांचा खुप जीव आहे आणि त्याकडे दुर्लक्ष होतं काम नये अशी त्यांची इच्छा आहे अन्यथा......आपण सुज्ञ आहातच.
कुंभकर्ण सुरतेची वाट चालत होता. त्याच्या गळ्यातल्या घंटा वाजत होती. जसे बाजीराव पुण्यात गालात हसत होते तसेच स्मित आता रिचर्ड बुर्शर च्या चेहऱ्यावर फुलले होते.
संदर्भ
1. थोरले राजे सांगून गेले :निनाद बेडेकर.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...