छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारणाऱ्या औरंगजेबाने, येसूबाई व बाल शाहू महाराज यांचे जबरीने धर्मांतर का केले नाही?
पोस्तसांभार ::आशिष माळी
कोण म्हणतं शाहू महाराजांना धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला नाही. ?
१६८९ मध्ये पकडल्यापासून येसूबाई, शाहू महाराज यांना धर्मांतर करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. दडपण आणले.१६८९ ते १७१९ अश्या 30 वर्षात मुघली कैदेत राहून शिवाजी महाराजांच्या सुनेने म्हणाजे येसूबाई च पराक्रम मराठी इतिहासकार नच्या नेहमी अन्याय केला आहे. ज्या मुत्सद्दी ने येसूबाई मध्ये धूर्त औरंग्या आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलांना नामावले आणि स्वतःचे धर्म आणि स्वराज्य वाचवला याची तोड नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा त्यांच्या दोन्ही मुलांनी (संभाजी महाराज आणि राजाराम महाराज) त्यांच्या दोन्ही सूना (येसूबाई आणि ताराराणी) चालवला ,कोणीही आपले धर्म सोडला नाही पण औरंग्या आणि त्याच्या अर्ध्या सैनिकांना जग सोडायला भाग पाडले.
सन १७०० मध्ये या ची खुप दबाव आणला . त्यावेळी प्रतापराव गुर्जर चे मुले शाहू महाराजांच्या मदतीस धाऊन आले.आपल्या छत्रपती स धर्मांतर होऊ नये म्हणून त्यांनी स्वतः धर्म बदलण्याची ऑफर दिली. त्याला औरंगझेब बधला.
सेनापती प्रतापराव गुजर यांचे दोन मुले खंडेराव गुजर व जगजीवन गुजर , 16 मे 1700 मध्ये मोहरम च्या मुहूर्तावर मुसलमान करून त्याचा नावे अब्दुर्रहीम व अब्दुरेहीमान अशी ठेवली खंडोजीचा हा उपकार शाहु राजानी कधी विसरले नाही . (जे लोक संभाजी महाराज आणि राजाराम महाराज भावा संबंधाविषयी बोलतात त्यांनीबलक्षात घायवे की प्रतापराव गुजर यांचे कुटुंब जास्त राजाराम महाराजांना जवळ होते ,कारण जानकीबाई ही त्यांची सख्खी बहीण राजाराम महाराजांची राणी होती)" आमचा मामा आम्हाबदल मुसलमान जाहला" असे उल्लेख समकालीन शाहू महाराजांच्या कागदपत्रे मधुन दिसते. खंडेराव आणि जगजीवन गुजर याना हिंदू धर्म मध्ये घ्यायचे प्रयत्न झाले पण खंडेराव यांचे त्यांच्या मुस्लिम बायको वर प्रेम होते आणि तिला पण हिंदू धर्मात घ्या असा खंडेराव यांचा हट्ट होता. मात्र तत्कालीन ब्राह्मणांना ते मंजूर नव्हते आणि परिस्थितीचा वरवंटा या ना त्या कारणाने गुजर कुटुंबावर फिरताच राहिला.[1]
१६८९ नंतर राजाराम महाराज जिंजी मध्ये निघून गेले. संताजी धनाजी नी रामशेज पासून जिंजी पर्यंत युद्ध क्षेत्र पसरल्याने मुघल फौज विखुरली. आदिलशाही कुतुबशाही गिळंकृत करणाऱ्या औरंग्या या चालीने चांगलाच गोंधळाला. येसूबाई नी सुध्दा राजाराम महाराज ना येनकेन मार्गाने मदत केली पण औरंग्यकडे मात्र राजाराम ने माझे राज्य घेतला असा घोषा लावला. त्यामुळे मराठ्यांच्या मध्ये दुफळी पडण्याच्ये लालसेने औरंग्याने येसूबाई आणि शाहू महाराजांना सांभाळून हातात पत्ते राहतील असे खेळी खेळली. पण येसूबाई आणि राजाराम महाराज अंततः एकाच चालीने खेळत होते . यामध्ये येसूबाई आणि शाहू महाराजांचे धर्मांतर लांबले.
औरंग्याने जरी अनेक मराठा शीख जाट राजपूत लोकांना संपवले असले तरी हिंदु स्त्रिया बाबतीत तो लोकांचा रोष वाढू नये म्हणून सांभाळून पाऊले उचलायचा. जर येसूबाई आणि शाहु महाराजांना धर्मांतर केले असते तर आधीच संभाजी महाराजांच्यa बलिदानाने चिडलेली मराठी जनतेने मुघलांचे कंबरडे मोडले असते याची कल्पना औरंग्या ल होती.
संभाजी महाराजांना मुस्लिम केले असते तर औरंग्याला मोठा राजकीय फायदा झाला असता. पण येसूबाई आणि शाहू महाराजांना मुस्लिम बनवून तासा कोणताच फायदा झाला नसता. कारण राजाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली मोठे आव्हान तयार झले होते.
औरंग्या ची मुलगी झीनातुंनिसा हे एक महत्वाचे कारण. औरंग्या इतकेच कारभारात त्याची मुलगी झीनातुंनिसा च खुप प्रभाव होतं . त्याशिवाय त्याची आणखी एक बायको उदयपुरी महल हीचा पण प्रभाव होता. झीनातुंनिसा च येसूबाई वार विलक्षण लोभ होता . त्यामुळे त्यांचे धर्मांतरण टाळत गेले.
येसूबाई ची हुषार पणा औरंग्याला diplomats प्रमाणे नमावले.
१७०७मध्ये औरंगत्या मेल्यावर आझम शाह ल दिल्ली l ला जायची घाई होती. त्याने शाहू महाराजांना पुढे सोडले ते शाहू महाराज आणि ताराबाई मध्ये वाद होईल या अपेक्षेने . नंतर त्याला , सय्यद बंधू आणि फरुक्षय्यार ला मराठ्यांची गरज होती , त्यामुळे येसूबाई चे धर्मांतर झले नाही.
संदर्भ
Shivaji and his times by jadunath sarkar.
जयसिंगराव पवार :मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध
No comments:
Post a Comment