विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 14 May 2021

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून तुम्ही काय शिकलात?

 


छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून तुम्ही काय शिकलात?

पोस्तसांभार ::आशिष माळी
धीरोदात्त
कोणतेही संकट आले तर आपण घाबरून जातो . माणसाचा स्वभाव आहे तो . पण जेंव्हा जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज विषयी विचार करतो तेंव्हा तर महाराज संपले अशी प्रसंग त्यांच्या पावला पावला वार दिसतात. उदाहरण म्हणजे अफजलखानाची चढाई, शाहिस्तेखान , पन्हाळ गडाचा वेढा ,मिर्झा जयसिंह पुढे झालेला पराभव, आग्रा मध्ये झालेली कैद, संगमनेर मधील लढाई , सुरत वरचा हल्ला नंतर दोनदा झालेला विषप्रयोग . पुरंदर तह मध्ये 2/3 स्वराज्य गमावले असते तर एखाद्याने पुन्हा बंड केले नसते.पण महाराजांनी वेळ साधून पुन्हा बदला घेतलाच.
या प्रत्येक प्रसंगात त्यांनी स्वतः वर विश्वास ठेवून त्या प्रसंगातून सहिसलामत बाहेर पडले. आणखी काही वर्षांनी शिवाजी महाराज हे माणूस नसून देव च आहे अशी जर पुढच्या पिढीला कल्पना झाली तर काही विशेष नाही
स्त्री दाक्षिण्य आणि चारित्र्य
शिवाजी महाराजांचा मराठ्यांचा एकमेव दरबार आहे की जिथे कधीही कोणती स्त्री चे नाच गाणे झाले नाही. "चारित्र्य" या एका कसोटीवर आमचा राजा सर्वश्रेष्ठ ठरतो...
तुर्क, उझबेकी, पठाणी, हबशी, इंग्रज, डच अशा जगातील सर्व लढाऊ सैन्याला प्रत्यक्ष "रणांगणावर आणि राजकारणात धूळ चारणारा" चक्रवर्ती सम्राट..
मोगल इतिहासकार खाफीखान लिहितो, ‘‘जसा भाऊ बहिणीशी वागतो किंवा मुलगा आईशी वागतो, तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे.’’ शिवरायांनी नेहमीच परस्त्रियांचा सन्मान केला. आपल्या शत्रू पक्षाच्याही महिलांचा सन्मान करावा, ही उच्च कोटीची नैतिकता आहे.
.महाराजांबद्दल बोलताना खाफीखान या औरंगजेबाचा इतिहासकार म्हणतो की सध्या शिवाजीसारखा चारित्र्य संपनश्र व परधर्माबद्दल सहिष्णू असलेला राज्यकर्ता या देशात दुसरा दिसत नाही. स्त्रीयांच्या बाबतीत शिवाजी राजाला कमालीचा आदर आहे. हे मुल्यमापन महाराजांवर टिका करणार्या खाफीखान करतो तो पण कट्टर शत्रूचा चारित्र्य लेखक . कल्याण ची सुभेदार ची सून चे उदाहरण पुरेसे आहे. त्याचाच वारसा काही वर्ष मराठ्यांनी चालवला , शत्रू पक्ष तील स्त्रियांना आणि मुलांना अभय देणे . जगाच्या इतिहासाता महाराजांशी तुलना करता येईल असा राज्यकर्ता सापडत नाही. नेपोलीयन व महाराजांची तुलना अभ्यासकांनी केली. नेपोलीयन महाराजांसारखा शूर होता, पराक्रमी होता पण त्याच्या चारित्र्याबद्दल अनेक प्रवाद आढळतात. शिवाजी राजांच्या चारित्र्याबद्दल इतिहासात एकही प्रवाद आढळत नाही.
शिवाजीराजांच्या ठायी अशी नैतिकता होती. त्यामुळेच त्यांनी स्वराज्यातील व परराज्यांतील महिलांचे संरक्षण केले. महिलांवर अन्याय करणाऱ्या गुजरला त्यांनी कठोर शिक्षा केली, याची अनेक उदाहरणे देता येतील,छत्रपती शिवाजी महाराजांच्या शत्रूस्त्रीदाक्षिण्य या सद्गुणाला सलाम.
माणूस गोळा करायची आणि टिकवायची क्षमता
अलेक्झांडर व राजांची तुलना काही लोकांनी केली. अलेक्झांडरला जग जिंकायचे होते. राजांना कोणतीही वैयक्तीक महत्वाकांक्षा नव्हती.त्यांना फक्त जुलमी सत्तेविरुद्ध आपले धर्म रक्षण करायचे होते.अलेक्झांडरला सोडून त्याचे सैन्य अनेकदा निघून गेले. राजांच्या बाबतीत असा प्रकार कधी घडला नाही. मरणाला सामोरे गेले पण महाराजांशी बेईमान झाले नाहीत.बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे, जीव महाले अश्या आणि अनेक अनोळखी सरदार मावळे एकत्र केले.
योद्धा :
संभाजी महाराज आणि काही प्रमाणात राजाराम महाराज नंतर भोसले घरण्यातून कधीही कोणीही रणांगणात उतरले नाही आणि हे एक कारण असू शकते की राज्याचा कारभार पेशव्यांकडे गेला. पुढे बाजीराव पेशवे सारखे योध्या नंतर पेशव्यांनी पणं रणांगणात उतरणे बंद केले आणि स्वराज्य इंग्रज कडे गेले. ऐबे कॅरे नावाचा पश्चिमात्य प्रवासी छत्रपती शिवजी महाराजांविषयी लिहितो-
"शिवाजीराजे पूर्वेने पाहिलेल्या उत्तमतील उत्तम योध्यापैकी एक म्हणून त्यांची गणना होऊ शकते.
त्यांच्या युद्धातील चपळाईमुळे व धाडसी निर्णयामुळे इतर गुणांमुळे त्यांची तुलना स्वीडनच्या महान राजा एडॉल्फसशी होऊ शकते. अफजलखान विरुद्ध प्रतापगड चे युद्ध असू दे शाहिस्तेखान वर केलेले हल्ला , संगमनेर लढाई, आग्राचे संकट असू दे शिवाजी महाराज थेट पुढच्या फळीत होते .
विज्ञानवादी
आपल्या धर्मा मधील अनेक बुरशी विचारणा महाराजनी थारा दिला नाही. अमावस्येला बाहेर पडू नये अशी विचारणा फाटा दिला आणि अमावस्येला हल्ला केला. सात समुद्र जाऊ नये , किंवा समुद्र विषयी असलेली धारणा महाराजांनी मोडीत काढली.समुद्रावर सत्ता गाजविणारा व स्वतःचे आरमार उभा करणारा भारताच्या इतिहासातील पहिला राजा म्हणून महाराजांचे नाव घ्यावे लागते. हिंदू धर्मात जलपर्यटनाला बंदी घातली असताना. कसल्याही चर्चा न करता समुद्रावर सत्ता गाजविणारा शिवाजी राजांसारखा राजा भारताच्या आजवरच्या इतिहासात झालेला नाही.18 व्या शतकामध्ये एक ब्रिटीश नौदल अधिकारी म्हणतो आमचे भाग्य मोठे म्हणून शिवाजी एका किल्ल्यावर जन्माला आला आणि दुसर्या किल्ल्यावर मरण पावला. शिवाजी हा राजा जर समुद्रावर जन्माला आला असता तर आम्हा ब्रिटिशांना भारतात यावे लागले नसते शिवाजीच लंडनपर्यंत येवून पोहोचला असता.
नेतृत्व
महाराजांनी पराक्रम बद्दल लिहीताना जदुनाथ सरकार म्हणतात शिवाजीने झोपलेल्या समाजाला जागे केले, जे जागे होते त्यांना उभे केले, जे उभे होते त्यांना चालते केले, आणि जे चालत होते त्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण दिलं. हा सगळा पराक्रम अवघ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात केला. जगाच्या इतिहासातील सगळयात दुर्लक्षित आणि मोठी पैकी एक लढाई जी आहे ती मराठयांची आणि औरंगजेबाची आहे. 1680 साली महाराजांचा मृत्यू झाला. 1681 ते 1707 तब्बल 27 वर्षे मराठे मोघलांशी लढत होते.औरंगजेब नावाच्या एका कसलेल्या सेनापती विरुध्द सत्ताविस वर्षे मराठे कोणतेही खंबीर नेतृत्व नसताना, विजयाची आशा नसताना लढत होते. मराठे लढत होते ते छत्रपतींनी त्यांच्या खांद्यावर दिलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भगव्या निषाणासाठी, त्यांच्या मनामध्ये निर्माण केेलेल्या स्वराज्यासाठी . आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण पाहतो की काही मिळत नाही म्हटल्यावर माणसे राजकीय पक्ष बदलतात, गट बदलतात सगळंच बदलायला तयार आहेत. महाराज मृत्यू नंतर आणि महाराजांकडून काहीच मिळणार नाही याची खात्री असताना माणसे महाराजांसाठी लढत राहिली. असे लढणे जगाच्या इतिहासात कधीच कोणी कोणासाठी लढले नाहीत.
संदर्भ
जदुनाथ सरकार पुस्तक

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...