मराठेशाहीतील जखमी सैनिकांची व्यवस्था आणि आयसओ ९०००
लेखन व संकलन: प्रमोद करजगी
काहीं वाचकांनी शंका विचारली की लढाईत जखमी झालेल्या सैनिकांना पगार मिळायचा का? व मिळाल्यास त्याचे स्वरूप व प्रणाली कशी होती ? तसेच लढाईत शाहिद झालेल्या सैनिकांच्या वेतनाचे काय होत असे? लढाईत ‘मृत’ पावलेल्या सैनिकांच्या पगाराबद्दल प्रश्न करणारे वाचक निश्चितच 'जागृत’पणे लेखाचे वाचन करीत होते यात शंका नाही.
त्या अनुषंगाने इतिहासाचा धांडोळा घेताना लढाईत जखमी झालेल्या किंवा मृत पावलेल्या सैनिकांबद्दलचे काही उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात आढळले आणि ते निश्चितच त्या काळात सुद्धा मराठेशाहीत आपल्या सैनिकांची कशी पुरेपूर काळजी घेतली जायची त्याचे ते द्योतकच होते. सैन्य हे नेहमी पोटावर चालते अशी आपल्याकडे एक फार जुनी म्हण आहे, मग तो लढणारा सैनिक असो वा जखमी झालेला! मराठ्यांच्या लढायांचा अभ्यास करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने वाटते ती म्हणजे त्या काळात जर आयसओ ९००० (ISO9000) प्रकारचे एखादे जागतिक कीर्तीचे प्रमाणपत्र असते तर मराठे सैन्याला सहज मिळाले असते. मी असे का म्हणतो त्याचे विवेचन पुढे देत आहे.
सैनिक भरतीची प्रक्रिया: मागच्या लेखात म्हंटल्याप्रमाणे मराठ्यांच्या फौजेत प्रत्येक सैनिकाची रीतसर पद्धतीने फौजेत भरती (recruitment process based on skills profile, past experience etc.) केली जायची. सैनिकाचे नाव, गांव, वय,जात,तसेच स्वतःचा घोडा आहे किंवा नाही, सैनिक कोणत्या प्रकारचा आहे, पायदळ का घोडदळ का बंदूकधारी का धनुर्धारी का दाणपट्ट्याने लढणारा इत्यादींची नोंद केलेली असे. तसेच त्याचा मोहिमेतील ठरलेला पगार, त्याला दिलेली अग्रीम रक्कम (ऍडव्हान्स) याचा सुद्धा उल्लेख नोंदवहीत असे.
No comments:
Post a Comment