विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 5 May 2021

मराठेशाहीतील जखमी सैनिकांची व्यवस्था आणि आयसओ ९००० भाग २

 

मराठेशाहीतील जखमी सैनिकांची व्यवस्था आणि आयसओ ९०००
लेखन व संकलन: प्रमोद करजगी

भाग २
जखमी सैनिकांच्या उपचाराची प्रक्रिया: जखमी सैनिकास उपचार करताना एक ठरलेली पद्धत मराठे अंमलात आणीत असत. ही पद्धत एखाद्या आयसओ प्रक्रियेसारखीच होती. लढाईत सैनिकाला जर इजा झाली तर त्याला मुख्य लढाईतून बाजूला काढून त्यांची लगेच नोंद केली (Incident recording ) जायची. त्याला झालेल्या जखमेबद्दल नोंद झाल्यावर त्याचे विश्लेषण (incident analysis) केले जायचे. झालेली जखम ही कशामुळे झाली याची शहानिशा ( causal analysis)करून त्यानुसार उपाय योजना ( solution) केली जात असे. जखम ही तलवारीची आहे, का भाल्यामुळे, का दगड धोंडे लागून का बंदुकीच्या गोळीमुळे झाली आहे याचे विश्लेषण (severity classification)केले जात असे. झालेली जखम ही किरकोळ आहे का घातक स्वरूपाची आहे याचे योग्य असे मूल्यमापन(sort of classification A, B or C class severity, class A :sever, class C: minor) केले जात असे व त्यानुसार औषधोपचारांच्या उपाय योजना आमलात आणल्यात जात असत असे दिसते. त्या दिवसाची लढाई संपल्यावर जखमी व मृत सैनिकांचा लेखाजोगा मांडला (end of the day report ) जात असे. दिवसाच्या अखेरीस इतके सैनिक जखमी व अमुक इतके मृत अशी आकडेवारी तयार केली जात असे व तो लेखाजोगा वरिष्ठांकडे पाठवला (reporting to senior leaders ) जात असे. जखमी व मृत सैनिकांचा आकडा रोजच्या रोज पुण्यास (मुख्यालय, head office) देखील लेखी स्वरूपात कळवला जात असे. मराठ्यांच्या सैन्यातील अशा प्रकारची अचूक पद्धती( full proof system) पाहिल्यावर त्यांना आयसओ समान प्रमाणपत्र मिळणे त्या काळात सुद्धा अजिबात अवघड नव्हते असे वाटते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...