पोस्टसांभार : Pramod Karajagi
महादजी शिंदे यांचा मुक्काम पुण्यात असताना पेशव्यांच्यासोबत साजऱ्या केलेल्या जन्माष्टमीच्या सोहळ्याच्या दिवसाचे वर्णन उपलब्ध आहे. याचे लेखक आहेत जगन्नाथ विश्वनाथ. दिनांक १६/८/१७९२.
श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामी यांची स्वारी जन्माष्टमीला, गुरुवारी श्रीमंतांचे (महादजी शिंद्यांचे) डेऱ्यास दोन प्रहरी आली. या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या मानकऱ्यांनी एकमेकास कोणत्या प्रकारचे नजराणे द्यावेत याचा तपशील एक दिवस आधीच आखलेला होता. हाली खाण्यास बदली पोशाख, मोत्याची माला, जिगा, सरपेच तुरा, एक तरवार मुठीला नाल असलेला ज्याला हिरे जडवलेले असा, तसेच एक ढाल, एक भरजरी जीन सरमाज पांघरलेला घोडा असे ठरले. तो दाटीत बिछानीवर फिरवून पाहिला, तो पेशव्यांच्या मर्जीस पसंद पडला .अशा प्रकारे रावसाहेबांची (पेशव्यांची)मर्जी बहुत प्रसन्न जाहली. शिवाय मुत्सद्दी मंडळी व मानकरी यास साडेतीनशे पोशाख, सवाशे साडेतीनसे नगे, सवादोनशे शेले, पागोटे, मुत्सद्दी व मानकरी यास कोणाकोणास शिरपेच व कंठ्या, अंगठ्या अगत्याने द्यायच्या त्यास दिल्या. चार घटिका रात्रीस रावसाहेबांची स्वारी जन्माष्टमीचा समारंभ होऊन शनिवारवाड्यात गेली. या नंतर द्वादशीस गोपाळकाला झाला. अशा प्रकारे जन्माष्टमीचा उत्सव संपन्न झाला
No comments:
Post a Comment