विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 5 May 2021

मराठेशाहीतील जखमी सैनिकांची व्यवस्था आणि आयसओ ९००० भाग ३

 

मराठेशाहीतील जखमी सैनिकांची व्यवस्था आणि आयसओ ९०००
लेखन व संकलन: प्रमोद करजगी

भाग ३
जखमी सैनिकांची व्यवस्था : सैनिक लढाईत जखमी झाल्यावर त्याच्यावर वैद्य किंवा हकीम यांजकडून योग्य तो उपचार केला जात असे. जखमेच्या स्वरूपानुसार त्याला आवश्यक ती औषधे दिली जात. तसेच त्याची शारीरिक स्थिती पाहून वैद्याच्या सल्ल्यानुसार बरा होईपर्यंत त्याला आवश्यक तेव्हढी पगारी विश्रांती (paid leave) दिली जात असे. त्या वेळेस त्याचा नेहमी मिळणाऱ्या पगाराची निम्मी किंवा एक त्रितीयांश रक्कम पगार म्हणून दिली जात असे. घातक इजेमुळे सैनिक बरेच दिवसाचा जायबंदी राहणार असेल तर त्याचा रोजमुरा (daily wages)काही दिवस चालू ठेवला जात असे. बऱ्याच वेळेस सैनिकांना ते जर नजीकच्या भविष्यात लढण्यास उपयोगी पडणार नसतील तर त्यांची रवानगी सुरक्षित स्थळी केली जात असे. उदाहरणार्थ महादजी शिंदे यांचे लढाईत घायाळ झालेले सैनिक ग्वाल्हेर येथील लष्करी छावण्यात (sort of military command hospital) उपचारासाठी व विश्रांतीसाठी पाठवले जात असत.
मृत सैनिकांचे वेतन: लढाईत मृत पावलेल्या सैनिकांना त्यांच्या हुद्द्यावर वेतन दिले जात असे. हे रोख रकमेच्या स्वरूपात किंवा एखाद्या इनामाच्या स्वरूपात असे. कधी कधी पिढीजात स्वरूपाची जहागिरी किंवा जमीन बहाल केली जात असे. मृत सैनिकांवर त्यांच्या धर्मानुसार अंत्यविधी केला जात असे. वरच्या हुद्द्यावरच्या अधिकाऱ्यांचा त्यांच्या हुद्द्याला योग्य असा अंत्यविधी केला जात असे. उदाहरणार्थ नरवीर दत्ताजी शिंदे बुराडी येथील लढाईत मारले गेले तेव्हा त्यांचे शव ताब्यात घेतल्यावर त्यांच्या लोकांनी तुळस, चंदन इत्यादी काष्ठे गोळा करून नदीकिनारी हिंदू पद्धतीने अंत्यविधी केल्याचे इतिहासात नोंदलेले आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...