विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 15 May 2021

रणधुरंधर मुरारबाजी देशपांडें

 रणधुरंधर मुरारबाजी देशपांडें



महाराष्ट्रात पुरंदराच्या पायथ्याला ३५६ वर्षांपूर्वी १५ मे १६६५ रोजी भूतो न भविष्यती असे रण झाले त्यामध्ये रणधुरंधर मुरारबाजी व तीनशे मावळयांनी बलिदान दिले. त्यांचे पराक्रम बघून शत्रूने तोंडात बोटे घातली.
दिलेरखान पुरंदरावर फौज,तोफखाना घेऊन चालून आला होता. कारण त्याला बादशहासमोर मोठेपणा दाखवायचा होता व आल्यामुळें शिवाजीराजे शरण आले हें दाखवून द्यायचे. त्याला ठाऊक होते की रूद्रमाळ पडला की पुरंदर आपल्याच हातात. त्याने मोठ्या मुष्कीलीने १४ एप्रिल १६६५ रोजी रुद्रमाळ कब्जात घेतला. त्यानंतर त्याने रुद्रमाळेवरुन तोफांचा मारा पुरंदरावर चालू केला.
त्यानंतर त्याने पुरंदरावर अहोरात्र तोफखाना पुरंदरावर धडाडत होता. पण किल्ला व मावळे हात टेकायला नव्हते. त्यानंतरच्या बऱ्याच रात्री मराठ्यांनी गाजवल्या. पण अचानक घात झाला. पुरंदराचा सफेद बुरुज दारूगोळ्याच्या स्फोटाने उडाला व पुरंदराची माची म्हणजे खालचा किल्ला मुघलांच्या ताब्यांत गेला.आता बालेकिल्ल्याच्यचा सर दरवाजावर हमला होणार हे नक्की होते.
किल्लेदार मुरारबाजी देशपांडेंंनी धडाडीची योजना आखली. त्यांनी सातशे मावळे घेऊन मुघल फौजेवर जाऊन कोसळले. साक्षात कालभैरव तांडव करीत होता. मुरारबाजी व मावळे मुघलांचे लचके तोडत होते. मुरारबाजीचा पराक्रम बघून दिलेरखानाने बोट तोंडात घातली. हर हर महादेवाच्या गर्जनेने संपुर्ण आसमंत दणाणला. पठाण भाजुन निघत होते. कत्तल चालू होती.
दिलेरखान मुरारबाजीला म्हणाला तु माझ्यासोबत दिल्लीला चल तुला मी तिथे शानशौकतीत ठेवतो. मुरारबाजी म्हणाला तुझा कौल म्हणजे काय मी छत्रपती शिवाजी महाराजाचा शिपाई आहे तुझा कौल घेतो की काय?असे म्हणून तो परत लढू लागला. याचा राग मानून आपल्याकडील बाण धनुष्यबाणाने त्याच्यावर सोडला. तो बाण त्यांच्या कंठात घुसला व ते खाली कोसळले. त्यांच्या सह ३०० मावळयांनी स्वराज्यासाठी जान कुर्बान केली.
असे हे रणझुंजार स्वराज्याशी एकनिष्ठ पणा वर्तून स्वराज्यासाठी बलिदान दिले. अशा या जिगरबाज व निष्ठावान , रणधुरंधर मुरारबाजी देशपांडें व ३०० मावळयांना मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ऐसा योद्धा पुनः होणे नाही.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...