विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 14 May 2021

धनाजी जाधव यांचे पूर्वज आणि वारस भाग १


 धनाजी जाधव यांचे पूर्वज आणि वारस

भाग १
अनिरुद्ध
प्रतिबाहु
सुबाहु
दृढप्रहर (द्वारकेहून चंद्रादित्यपूर/चांदोर ला राजधानी आणली)(८६०-८८०)
स्युनचंद्र १ (श्रीनगर/सिन्नर नगर वसवून तेथे राज्य स्थापले)(८८०-९००)
धडीयप्पा १
भिल्लम १
श्रीराज
वद्दीग १ (९५०-९७०)
धडीयप्पा २ (९७०-९७५)
भिल्लम २ (९७५-१००५)
वेसुगी १
अर्जुन
भिल्लम ३ (१०२०-१०४५)
वद्दीग २
वेसुगी २
भिल्लम ४
स्युनचंद्र २
सिंघण १
मल्लूगी
भिल्लम ५ (स्वतंत्र देवगिरी राजधानी वसविले व सार्वभौमत्व घोषित केले)(११८५-११९३)
जैत्रपाल १ (काकतीयांशी लढताना युद्धात मारले गेले)(११९३-१२००)
सिंघण २ (सम्राट उपाधी घेतली)(१२००-१२४६)
जैत्रपाल २ (वडिलांच्या हयातीत मृत्यू)
कृष्णदेव (आजोबांचा उत्तराधिकारी झाला)(१२४६-१२६१)
रामचंद्रदेव (खिळजीचे मांडलीकत्व पत्करले)(१२७०-१३११)
शंकरदेव ( खिळजीकडून पराभव )(१३११-१३१८)
गोविंददेव (जाधव आडनाव सुरू केले व बहमणींकडून जहागिरी मिळविली)(१३१८-१३८०)
ठाकुरजी (१३८०-१४२९)
भूकनदेव/भूतजी (१४२९-१५००)
अचलकरण (१५००-१५४०)
विठ्ठलदेव (१५४०-१५७०)
लक्ष्मणदेव / लखुजी जाधवराव (स्वबळावर निजमशाहीस दौलताबाद जिंकून देऊन १२००० मनसब मिळविली , काही काळ मोघळाईत गेले व परत निजामशाहीत आल्यावर दौलताबाद येथे दरबारात हत्या)(१५७०-१६२९)
अचलोजी (पित्यासह हत्या)
संताजी (राजमाता जिजाऊंनी आपल्याबरोबर पुण्यास आणले , कनकगिरीच्या युद्धात मृत्यू)
शंभूसिंह (शिवरायांच्या सेवेत विशाळगडाच्या लढाईत मारले गेले)
धनाजी
धनाजींचा जन्म स. १६५० च्या सुमारास झाला. हे प्रथम प्रतापराव गुजराच्या हाताखालीं होते. उंबराणीच्या लढाईत तो प्रथम पुढें आला. पुढें (१६७४) धनाजी हे हंबीरराव मोहिते यांंच्या हाताखालीं गेले. विजापूरचा सेनापति अबदुलकरीम याशीं झालेल्या नेसरीच्या लढाईत यांंनें विशेष शौर्य दाखविल्यामुळें यांंस बढती देण्यांत आली (फेब्रु.) सावनूरच्या लढाईंत यांंनें हुसेनखान मायणा याचा पुरा मोड केला तेव्हां शिवाजी महाराजांनें याची तारीफ केली (१६७९).
संभाजी महाराजांचा वध झाल्यावर आतां पुढें काय करावें हें ठरविण्याकरितां जी मुख्य मुख्य मराठे मंडळी रायगडावर जमली त्यांत धनाजी जाधव होते. त्यांंनें सातार्यास सर्जाखानाचा पराभव केला.
पुढें (१६९०) धनाजी छत्रपती राजाराम महाराजांबरोबर जिंजीस गेले. तेथें त्यांंनें इस्मायलमकाचा पराभव केला, यावेळीं सरनौबत महादजी नाईक पानसंबळ याच्या मृत्यूचें वर्तमान समजल्यामुळें संताजी घोरपडे यांंस सेनापति नेमण्यांत येऊन त्याच्याबरोबर धनाजींंस जयसिंगराव ही पदवी देऊन महाराष्ट्रांत पाठविण्यांत आलें (१६९०).

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...