जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवराय.
--------------------------------------------
[ भाग २ रा. ]
---------------------------
त्यांना वाटेत एखादा किल्ला आढळला तर ते संवगडी याना विचारीत , ' हा किल्ला कोणाचा ?' उत्तर ' आदिलशहाचा ' असे मिळाल्यावर ते म्हणत असत - ' किल्ला आपल्या मुलुखातला आणि सत्ता आदिलशहाची ! ' हे त्यांच्या मनाला पटत नसे. हे किल्ले आपल्या ताब्यात असायला पाहिजेत. असे विचार वारंवार करीत असतानाच सवंगड्यायांची व बारा मावळातील मावळ्यांची जमवाजमव करून एके दिवशी शिवरायांनी आपल्या सहकार्याबरोबर रोहीडेश्वराच्या साक्षीने स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली व ती पूर्ण केली.
शिवरायांनी वेगवेगळी युध्दतंत्रे वापरून आदिलशहा व मोगलशहा यांचे एका पाठोपाठ एक असे किल्ले ताब्यात घेण्यास सुरुवात केली. किल्ले ताब्यात घेत असताना त्याना बलाढ्य अशा मोगलशहा व आदिलशहा या शत्रूबरोबर झुंज द्यावी लागत होती. शिवरायावर मरणप्राय संकटे ओढवत होती. या महाण संकटातून बाहेर पडण्याची दिव्ये त्यांना करावी लागत होती. असे करता करता शिवरायांनी आपले पिता शहाजीराजांच्या कल्पनेला स्वराज्याची , माता जिजाबाईयांच्या मनातील स्वराज्याची आणि स्वतःच्या विचारातील स्वराज्यातील निर्मिती करून रायगड या राजधानीवर स्वराज्याचा राज्याभिषेक करून महाराष्ट्र धर्माची स्थापना केल्याचे जगाला दाखवून दिले.
शिवरायांनी स्वराज्यनिर्मितीसाठी ज्यावेळी बंड पुकारले त्यावेळी मोगलशहा व आदिलशहा यांच्या बलाढ्य सत्ता वाभव शिखरावर होत्या. त्यांच्याकडे अफाट युध्द साहित्य व अमाप संपत्ती होती. त्यातील एकही शत्रू सामान्य नव्हता. त्यातभर म्हणजे अनेक स्वकीय मंडळीही विरोधात. पण याही परिस्थितीत , शिवरायांनी या महासत्ताना जागीजाग पोखरून अक्षरशः शून्यातून आपले स्वतंत्र , सार्वभौम असे स्वराज्य स्थापन केले.
शिवरायांनी आपल्या प्रचंड धामधुमीच्या आयुष्यात अल्पश्या काळात मुलकी कारभार व सैनिक व्यवस्था या शासकीय कार्याबरोबर वतनदारीची पुनर्रचना , शेती ,सुधारणा , सामाजिक व सांस्कृतिक सुधारणा करून त्यांत शिस्त लावली. आपले स्वतंत्र ' स्वराज्य ' निर्माण केले.
स्वराज्य निर्मितीची शपथ घेऊन रयतेला दिलेल्या वचनांचे पालन करून . शून्यातून स्वराज्य निर्माण करणारे शिवराय असे एकमेव राजे होते. [ पूर्ण.]
No comments:
Post a Comment