विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 31 July 2021

अंमलबजावणी.... कशाला म्हणतात माहिती आहे का ?

 

आवर्जून वाचा व शेअर करा हि विनंती _/'\_

अंमलबजावणी....
कशाला म्हणतात माहिती आहे का ?
""बलात्कार""
या विषयाला अनुसरण एक सत्य आणि जगजाहिर असे उदाहरण देतो....
शिवरायांच्या शिवशाहीत कधी कुनावर अन्याय, अत्याचार, बलात्कार होत नव्हते ना कधी आत्महत्या !
अपवाद फक्त रांझाच्या पाटलाचा ! पण त्यावर त्वरित कारवाई जाहली !
असाच एक प्रसंग रांझाच्या पाटलाचा
रांझा हे एक महाराष्ट्रातील गाव आहे
याच गावातील पाटलाने पाटीलकीचा आव आणुन एका स्त्री वर अत्याचार केला...
तीच्या घरातील सर्व लोक कामासाठी शेतात गेले होते,
ती बिचारी घरात एकटीच होती आणि हाच मौका साधुन
भर दिवसा एका कोवळ्या देहावर अवघ्या १६ वर्षाच्या मुलीवर या हरामखोराने बलात्कार केला, तिची खुप विचित्र अब्रू लूटली !
तो पाटील अन् त्यावेळी पाटीलकी म्हणजे पाटलाच्या गांडीत कीडा ! ( माफ करा थोडं स्पष्टच बोलतोय )
पाटलाचे आख्खं गाव ऐकत होते,
तो म्हणेल तीच पूर्व दिशा !
त्याने काय चुकीचे पाऊल उचलले तरी त्याला जाब विचारणारे कुनी नव्हते !
आणि आपल्या मुलीसोबत झालेल्या अन्यायाची दाद मागायला त्या पिडीत मुलीचे माय बाप छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले...
कारण, त्यांना माहिती होतं
""उभ्या हिंदुस्थानात न्याय मिळेल असे एकमेव न्यायालय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हेच आहे !""
छत्रपती शिवरायांना ही वार्ता समजली....
तसाच कडाडला सह्याद्रिचा सिंह....
भर थंडीच्या दिवसांत आभाळात वीज कडाडली !!!
सिंहाने डरकाळी फोडावी आणि कोल्ह्याचा निम्मा जीव जावा असा तो क्षण !!!
जमीन थरारली....
भयान वादळ...
लाटा उसळल्या.....
संतापला...वैतागला...चवताळला सिंह !
माझ्या मराठी मुल्खात आज पर्यंत कोन्या स्त्री वर अन्याय कधी झालाच नव्हता !
माझ्या महाराष्ट्राला लाजवणारी ही थरारक घटना होती !
""पर स्त्री माते समान""
हेच तत्व आणि हेच धोरण संपूर्ण आयुष्यभर आचरणात आणणारे राजं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !
क्षणांत छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना सख्त आदेश दिला...
बोलवुन आणा त्या पाटलाला !
गेले सैनिक निरोप दिला पाटलाला तु गुन्हा केला आहेस त्यामुळे तुला छत्रपती शिवाजी राजांनी बोलवलय !
पाटील गुर्मीचा !
पाटील म्हणला कोन शिवाजी मी ओळखत न्हाय !
पाटील जायलाच तयार न्हाय !
पाटलाच्या अंगात मस्तीच लय हाय !
सैनिक माघारी आले राजांकडे पाटील येत नाही म्हणुन सांगु लागले !
शिवरायांनी सैनिकांना पुन्हा पाठवले ;
पुन्हा तोच प्रकार....
पाटील म्हणतोय,
शिवाजी राजा आज राजा असेल माझी पाटीलकी पिढ्यान् पिढ्या चालत आलीय मी कुनाला भीत न्हाय !
पाटलाच्या गांडीत मस्तीच लय !!
छत्रपती शिवरायांनी शेवटचा आदेश केला की
त्याला सांगा तु पाटील एका गावचा आहेस परंतु हा सारा मुल्ख आमच्या ताब्यात येतो आणि इथल्या जनतेचा मी राजा आहे !
आणि हे सांगुन सुद्धा जर पाटील ऐकत नसेल तर त्याला डुकर बांधतात तसे दोन्ही हात, पाय, पाठ, मान दोरीने बांधुन आणा !
आपल्या सैनिकांनी लगेच जाऊन त्या बलात्कारी पाटललाला डुक्कर दोरीने बांधतात तसा बांधुन राजांसमोर पेश केला !
राजं म्हटले तु गुन्हा केलायस....
पाटील म्हणतय न्हाय !!
राजं पुन्हा म्हटले कबूल कर तू गुन्हा केलायस...
पाटील त्याचीच लाल करत म्हणतय मी गुन्हा केलाच न्हाय !!
राजांनी सैनिकांना आदेश दिला हा काय गुन्हा मान्य करत नाहीं याचा थेट चिरच्छेद करा, हात पाय कलम करा, याच्या देहाचे बारीक बारीक तुकडे करुन कोल्ह्या कुत्र्यांना खायला घाला !
धनुष्यातुन तीर सुटावा आणि तो परत कधीच माघारी न यावा असा तो आदेश... सख्त आदेश !
पाटलाला आता कळले की राजांचा शब्द वाया जात नाहीं अन् आपली यातुन सुटका नाही !
पाटलाने गुन्हा मान्य केला परंतु वेळ निघुन गेलेली छत्रपतींच्या आदेशानुसार त्या पाटलाचे केव्हाच तुकडे तुकडे झाले होते !
तो आपल्याच धर्मातला म्हनुन त्याला सोडून देयचा असली नालायक वृत्तीच नव्हती त्या काळात !
बलात्कारी, अत्याच्यारी गुन्हेगार मग तो कोणत्याही धर्माचा असो शिक्षा ही होणारच या निश्चयात्मक तत्वाचे राजं होतं म्हणुन स्वराज्यात कधी असले प्रकार घडले नाहीत हा अवघ्या जगाने आणि जगातल्या प्रत्येक न्यायालयाने आदर्श घ्यावा असा राजा आहे !
""मनासारखा राजा अन् राजासारखं मन""
त्या माताा-पित्यांना... त्या पिडीत निष्पाप मुलीला... त्या भगिनीला ""न्याय"" मिळाला !
""न्याय असा की गेलेली अब्रू पुन्हा प्राप्त होईल इतका कडक शब्द !""
जगाच्या इतिहासातील पहिलाच काळ शिवशाही आणि या शिवशाहीतील पहिलीच घटना की जीथे त्वरित अंमलबजावणी होत होती !
ते पोलिस येतील, मग पंचनामा होईल, केस कधी व्हायची की पैसा दिल्यावर केस तिथेच मिटायची आणि शिक्षा कधी होणार तो पर्यंत ती पिडीत व्यक्ति म्हातारी झालेली असते असली घानेरडी भानगडच नव्हती शिवकाळात !
On The Spot Decision !
क्षणांत निर्णय अन् त्वरित कृती !
याला म्हणतात अंमलबजावणी ;
कायदा यालाच म्हणावे !
जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा ""राजाशिवछत्रपती"" ज्यांच्या काळात कधीच अन्याय, अत्याचार, बलात्कार नि आत्महत्या अशा घटना घडल्या नाहीत !
उगाचच म्हणत नाहीत
॥ हिंदूनृसिंह प्रभो शिवाजी राजा ॥
शिवचरित्राचा आदर्श घेयचा तर हाच आदर्श घ्या !
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀

Friday, 30 July 2021

शूरवीर मराठे

 १ ऑगस्ट १६९४...

संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत यांनी अनेक संयुक्त मोहिमा काढल्या एक मोगली बातमीपत्रात यांच्या एकत्रीत असणाऱ्या एका मोहिमेची बातमी कळते २२ जुलै १६९४ चे बातमीपत्रात तळबीडचा ठाणेदार अडाणी याने धनाजी जाधव व

हणमंतराव (निंबाळकर) ससैन्य तळबीड जवळ आले असून धामधूम माजविली आहे हे कळते सोबत संताजी घोरपडे आहेत आणि रामचंद्रपंत येऊन सामील होणार असल्याचे देखील समजते यावर बादशहाने आज्ञा केली की हिंमतखानाने जाऊन गानिमांवर हल्ला चढवावा..,
याच्याच नंतर रामचंद्र अमात्य येऊन मिळाल्याने मराठ्यांची कुमक वाढली असून ते साताऱ्याच्या आग्नेयस असणाऱ्या वारूगड काबीज करण्याचा त्यांना इरादा असावा यासाठी महिमानगडाच्या किल्लेदाराने बादशहास अधिक कुमकीसाठीच अर्ज केला याची तारीख होती १ ऑगस्ट १६९४...
――――――――――――
आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची...

"राजाराम महाराज तीसरे (करवीर संस्थान)"

 

मातोश्री स्व. राजमाता पद्माराजे कदमबांडे ह्यांचे पिताश्री व माझे आजोबा स्व छत्रपती राजाराम महाराज यांना विनम्र अभिवादन...!

"राजाराम महाराज तीसरे (करवीर संस्थान)"
कोल्हापूर शहरात शालिनी पॅलेस, बी. टी. काॅलेज, शिवाजी टेक्निकल, ट्रेझरी, राधाबाई बिल्डींग (कोर्ट), कलेक्टर आॅफीस, साईक्स लाॅ काॅलेज अशा खूप देखण्या वास्तू आहेत. छत्रपती शाहू महाराज, आईसाहेब महाराज, प्रिन्स शिवाजी यांचे पुतळे आहेत. हे वास्तू हे पुतळे कोणी उभा केले तर या साऱ्यांत राजाराम महाराजांचा खूप मोठा वाटा आहे; पण काळाच्या ओघात राजाराम महाराजांचे हे काम दडून गेले आहे. केवळ वास्तूच नव्हे, तर 1922 ते 1940 अशी एकूण आठरा वर्षे त्यांनी कोल्हापूर संस्थानाचा कारभार पाहीला. राजा म्हणजे राजवाडा ऐषोरामी यात गुंतून न रहाता राजाराम महाराजांनी कोल्हापूरला नवा मार्ग दाखवला.
त्यांच्या काळात रंकाळा तलावाच्या काठावर शालिनी पॅलेस उभा राहिला. शाहू महाराजांनी सुरू केलेले राधानगरी धरणाचे काम त्यांनी पूर्णत्वास नेले. दसरा चौकात शाहू महाराजांचा, लक्ष्मीपुरीत आईसाहेब महाराजांचा देखणा पुतळा उभा केला. याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळात बाळंतपण व शिशुउपचार असे स्वतंत्र मोफत उपचार कक्ष सुरू केले. याशिवाय कोल्हापूर बँकेची त्यांनी स्थापना केली. लक्ष्मीपुरी परीसराची उभारणी केली. जयभवानी फुटबॉल टिमची स्थापना करून उभरत्या खेळाडूंना संधी मिळवून दिली.
कोल्हापूरच्या विमानतळावरून पहिल्या विमानाने अवकाशात भरारी राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतच घेतली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा त्यांनी पुण्यात उभारला.
🚩🙏🏻"छत्रपती राजाराम महाराज (करवीर संस्थान) यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मराठी मुजरा"🚩🙏🏻

राजर्षी शाहू महाराजांचे पुत्र श्री छत्रपती राजाराम महाराज

 


राजर्षी शाहू महाराजांचे पुत्र श्री छत्रपती राजाराम महाराजांची आज जयंती !

कोल्हापूरमध्ये शालिनी पॅलेस, बी. टी. काॅलेज, शिवाजी टेक्निकल स्कूल, ट्रेझरी, राधाबाई बिल्डींग (कोर्ट), कलेक्टर अॉफीस, साईक्स लाॅ काॅलेज अशा खूप देखण्या वास्तू आहेत. छत्रपती शाहू महाराज, आईसाहेब महाराज, प्रिन्स शिवाजी यांची पूर्णाकृती स्मारके आहेत. ह्या वास्तू, ह्या मूर्ती कोणी उभे केले तर, या साऱ्यांत छत्रपती राजाराम महाराजांचा खूप मोठा वाटा आहे. केवळ वास्तूच नव्हे, तर १९२२ ते १९४० अशी एकूण अठरा वर्षे त्यांनी कोल्हापूर राज्याचा कारभार पाहिला.

त्यांच्या काळात रंकाळा तलावाच्या काठावर शालिनी पॅलेस उभा राहिला. छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेले राधानगरी धरणाचे काम त्यांनी पूर्णत्त्वास नेले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुर्णाकृती पुतळा पुणे येथे छत्रपती राजाराम महाराजांनीच उभारला. शेतकी कॉलेज सुरू केले. याशिवाय कोल्हापूर बँकेची त्यांनी स्थापना केली. लक्ष्मीपुरी व्यापारपेठेची उभारणी केली. कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रांच्या विकासाला चालना दिली.

कोल्हापूरच्या विमानतळावरून पहिल्या विमानाने अवकाशात भरारी राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतच घेतली. राजा म्हणजे राजवाडा, ऐषोरामी यात गुंतून न राहता कोल्हापूरला आधुनिकतेचा नवा मार्ग दाखविणाऱ्या क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपती महाराजांस जयंतीदिनी त्रिवार अभिवादन ! 

अहिल्याबाई होळकर !!

 

पेशवेकालीन हिंदवीस्वराज्याचे आधारस्तंभ - इंदोरचे होळकर घराणे
---------------------------------------------
मराठेशाहीच्या इतिहासातील एक मानाचे व्यक्तीमत्व म्हणजे इंदूर संस्थानच्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर . राजमाता जिजाऊसाहेब , येसूबाईसाहेब , ताराराणीसाहेब , ग्वाल्हेरच्या बायजाबाई शिंदेसाहेब आणि इंदूरच्या अहिल्याबाई होळकरसाहेब या मराठेशाहीतील कर्तृत्ववान राज्यकर्त्या स्त्रिया गणल्या जातात .
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -





अहिल्याबाई होळकर !!
जसे श्वशुर मल्हारराव होळकर हे देखील मूळचे महाराष्ट्रातील तद्वत अहिल्याबाई पण मूळच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील " चौंढी " गावच्या . त्यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी झाला . एका आख्यायिकेनुसार मल्हारबाबांनी जे माळवा प्रांताचे सुभेदार होते त्यांनी पुण्यास जात असताना छोट्या अहिल्याबाईंना बघितलं आणि त्यांस आपली सून करावी या हेतूने आपले चिरंजीव खंडेराव याच्यासोबत लग्नबंधनात बांधले . मात्र अत्यंत अल्पकाळात खंडेराव होळकर १७५४ मध्ये कुंभेरच्या लढाईत दुर्दैवाने मृत्यू पावले . मल्हारबाबांनी अहिल्याबाईंस तत्कालीन प्रथेनुसार पतीनिधनानंतर चितेवर सहगमन करण्यापासून महत्प्रयासाने रोखले . खंडेराव आणि अहिल्याबाईंच्या मुलाचे नाव होते
" मालेराव " . मात्र पुढे पानिपतच्या संग्रामानंतर इसवीसन १७६६ ला मल्हारराव देखील इहलोक सोडून गेले . मल्हारबाबांनंतर होळकरशाहीची धुरा त्यांचे नातू मालेराव बघू लागले होते परंतु दुर्दैवाने ते देखील अल्पायुषी ठरले आणि अत्यंत अल्पकाळ राज्यकारभार करून ५ एप्रिल १७६७ ला मृत्यू पावले . मालेरावांच्या या अल्पशा कालावधीत नाणी पाडली गेली नसावीत असाच तज्ञांचा अंदाज आहे . आता होळकरशाहीची धुरा सांभाळण्याची जबाबदारी अहिल्याबाईंच्या खांद्यावर आली . त्याही धीरोदात्त वृत्तीने समर्थपणे माळवा प्रांतात मराठेशाहीची धुरा वाहू लागल्या . श्वशुर मल्हाररावांचे दत्तकपुत्र आणि आपले दीर तुकोजीराव पहिले यांची त्यांनी सेनापती म्हणून नेमणूक केली आणि त्या स्वतः सुयोग्यपणे प्रशासकीय भाग पाहू लागल्या . इकडे या घडामोडींमुळे होळकरांचे दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड हे गादीला पुरुष वारस हवा म्हणून अहिल्याबाईंवर दबाव टाकू लागले , जेणेकरून गंगाधरपंतांचा राज्यकारभारातील दबदबा वाढेल . याहीपुढे जाऊन त्यांनी राघोबादादांशी संधान बांधून त्यांच्या फौजा माळव्याच्या प्रदेशात आणायला लावल्या . अहिल्याबाईंना या कारस्थानाची माहिती कळताच त्यांनी चाणाक्षपणे आजूबाजूच्या राज्यकर्त्यांकडे मदतीचा हात मागितला आणि त्यांनीही तो तातडीने देऊ केला . अहिल्याबाईंनी तातडीने उदयपूरला असलेल्या तुकोजीरावांना पण माघारी बोलावले . त्याचबरोबर अहिल्याबाईंनी एकीकडे थोरल्या माधवराव पेशव्यांशी संधान बांधताना राघोबादादांनाही चतुराईने आणि धीटपणे " एका स्त्री सोबतच्या युद्धात पराभूत झालात तर सर्वत्र छी-थू होईल " असा गर्भित इशारा दिला . आता राघोबादादांनाही आपली चूक कळली आणि त्यांनी मी सांत्वन करायला आलो होतो , युद्धाकरिता नव्हे असे उत्तर देऊन यशस्वी माघार घेतली .
अहिल्याबाईंनी आपली राजधानी महेश्वर ही केली . या महेश्वरच्या रुपयांवर , नाण्यांवर शिवलिंग आणि बिल्वपत्र छापलेलं असतं . अहिल्याबाई आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे इसवीसन १७९५ पर्यंत महेश्वर येथेच राहिल्या . अहिल्याबाईंनी मल्हारनगर येथे ही स्वतःची नाणी पाडली . या मल्हारनगरच्या नाण्यांवर सूर्य छापलेला असतो . मल्हारनगर येथे हिजरीसन [ A.H. 1182 - 1183 ] यावर्षी आणि [ A.H. 1195 - 1196 ] यावर्षी देखील नाणी पाडल्याचे आढळून येत नाही . त्यावर्षी नाणी का पाडली गेली नसावीत हे सुयोग्य पुराव्यांअभावी , नोंदी अभावी कळू शकत नाहीये . समजा ती त्यावर्षी पाडली गेली असतील तरीही त्या वर्षांचे एकही नाणे आजतागायत उपलब्ध झालेले नाहीये . मल्हारनगर नाण्यांवरील छापलेला सूर्य म्हणजेच " मार्तंड " स्वरूप . मल्हारनगरचे प्रथम पाडले गेलेले / आढळून येणारे नाणे म्हणजे A.H. 1184 या हिजरी वर्षाचे आहे . महेश्वर मिंट / टांकसाळीत प्रथम पाडले गेलेले नाणे हे हिजरीसन 1180 चे सापडते . महेश्वर आणि मल्हारनगर ( इंदोर ) या दोन्हीही टांकसाळीच्या तुलनेत मल्हारनगरची नाणी जास्त छापलेली आढळतात . अहिल्याबाईंनी तांब्याची नाणी पण छापली होती . मात्र ती चांदीची नाणी छापायला सुरुवात केल्यानंतर तब्बल २० - २२ वर्षांनी . यातील काही नाण्यांवर कट्यार तसेच " चवरी " हे राजचिन्हं आढळून येते . महेश्वर हून राज्यकारभार करत असताना अहिल्याबाईंजवळ एक अनमोल अशी चंदनाची चवरी होती असे स्पष्ट उल्लेख आहेत , कदाचित तीच या नाण्यांवर छापली असावी असा अभ्यासकांचा एक तर्क आहे .
अहिल्याबाईंच्या कारकीर्दीत माळव्याच्या जनतेला एक न्यायाचे , समृद्धीचे , भरभराटीचे राज्य अनुभवायला मिळाले . अहिल्याबाईंनी अतिशय चोखपणे , दूरदृष्टी राखून जवळजवळ ३० वर्षे राज्यकारभार केला . त्या सात्विक , धार्मिक वृत्तीच्या असल्याकारणाने त्यांनी अनेक देवालयांचा , मंदिरांचा जीर्णोद्धार केला . पांथस्थ , प्रवाशांसाठी जागोजागी धर्मशाळा उभारल्या . नद्यांवर घाट बांधून मुबलक पाणीपुरवठा होत राहील याकडे लक्ष दिले . मंदिरांमध्ये नित्यनेमाने पूजाअर्चा सुरू रहाव्यात यासाठी अनेक दाने दिली . माळव्यात रस्ते , किल्ले बांधले , अनेक उत्सव सुरू केले . सतीची कुप्रथा बंद करण्यासाठी सातत्याने लोकजागृती केली , यासाठी रामायण , महाभारताचे दाखले ही दिले . पुढे ब्रिटिशांच्या राजवटीत राजा राममोहन रॉय यांनी पुढाकार घेऊन ही अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केली . यावरून अहिल्यादेवींची दूरदृष्टी लक्षात येते . हस्तलिखितं लिहवून घेणाऱ्यांसाठी भरभक्कम पैसे मोजून त्यांच्याकरवी विविध महत्वपूर्ण दुर्मिळ ग्रंथ हस्तलिखित स्वरूपात करवून घेतले . अशा जीवनातील विविध बाबींवर उत्तमोत्तम कार्य करून , करवून घेऊन , समाजातील शेवटचा घटक देखील सुखी व्हावा यासाठी अवघे आयुष्य घालवून या महाराष्ट्रकन्येने , होळकर राजवटीच्या सम्राज्ञीने आणि माळव्याच्या जनतेच्या मनातील अहिल्यादेवींनी अखेर ७० व्या वर्षी हा नश्वर पृथ्वीलोक त्यागला . नंदादीपाप्रमाणे आपल्या लोककल्याणकारी कार्याने त्यांनी आपले आणि सामान्यांचे जीवन उजळून टाकले , म्हणूनच आजही लोक त्यांना
" पुण्यश्लोक अहिल्यादेवी " असे अत्यंत आदरपूर्वक आणि कृतज्ञतापूर्वक म्हणतात .
प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर , ठाणे .
मराठा नाणी संग्राहक , अभ्यासक , लेखक , व्याख्याते .



तुकोजीराव होळकर - पहिले !!

 पेशवेकालीन हिंदवीस्वराज्याचे आधारस्तंभ - इंदोरचे होळकर घराणे

---------------------------------------------
होळकरशाहीचे संस्थापक मल्हारराव होळकर पहिले आणि होळकरशाहीचा मानमरातब अखंड हिंदुस्थानात चंदनाप्रमाणे पसरवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्यानंतर अल्पकाळ राज्यकर्ते असलेले परंतु लढवय्ये सेनानी असलेले तुकोजीराव होळकर - पहिले यांनी देखील होळकरांच्या सैन्याचे प्रमुख - कमांडर इन चीफ - असताना अनेकवार बुलंद पराक्रम गाजवलेले आहेत .
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -



तुकोजीराव होळकर - पहिले !!
मल्हारराव होळकर यांचे पुत्र असलेले तुकोजीराव प्रथम यांचाही जन्म खंडेराव होळकर ज्यावर्षी जन्मले म्हणजे इसवीसन १७२३ मध्ये , त्याचवर्षी झाला . मल्हारबाबा पुत्र खंडेरावांच्या अकाली मृत्यूनंतर राजकीय हालचालींबाबत , होळकरशाहीच्या वृद्धीबाबत स्नुषा अहिल्याबाईंशी चर्चा करीत असत . मल्हाररावांच्या निधनानंतर होळकर राजवटीची धुरा त्यांचे नातू आणि अहिल्याबाईंचे पुत्र मालेराव महाराज यांच्याकडे आली . मात्र असे आढळून येते की ते राज्यशकट हाकण्यास तितकेसे सक्षम नव्हते . अखेरीस लवकरच ते अवघ्या ८ महिन्यांच्या कारभारानंतर दि.५ एप्रिल १७६७ ला मृत्यू पावले . यानंतर अहिल्याबाईंनी होळकरशाहीची सूत्रे हाती घेतली . त्यांना त्यावेळी जोरदार अंतर्गत विरोधही झाला परंतु पंतप्रधानपेशवे थोरले माधवराव यांच्या त्यांच्यावरील असलेल्या विश्वासामुळे अहिल्याबाईंच्या विरोधकांना अखेर नमते घ्यावे लागले . यावेळी सर्वसाधारणपणे असे धोरण ठरले की राज्यकारभार आणि महसूल विनियोग हा अहिल्याबाई करतील आणि होळकरांच्या संपूर्ण सैन्याचे नेतृत्व तुकोजीराव पहिले हे करतील . तुकोजीरावांनी पुण्याला माधवराव पेशव्यांची भेट घेऊन त्यांना सुमारे साडेसोळा लक्ष रुपयांचा महसूल / नजराणा दिला आणि सुभेदारीची वस्त्रे तसेच होळकरशाहीचे अधिकृत नेतृत्व म्हणून ही मान्यता मिळवली . इकडे अहिल्याबाईंनी आपली राजधानी " महेश्वर " येथे केली आणि त्या तिथून त्यांच्या मृत्यूपर्यंत संपूर्ण राज्याचा कारभार बघत होत्या . त्यांनीच होळकरशाहीच्या सर्व सैन्याचे अधिपती अर्थात commander in chief म्हणून निवडलेले तुकोजीराव पहिले हे त्यासमयी इंदोर येथून सारी सूत्रे हलवीत असत . याप्रकारे होळकरशाहीच्या कारभाराचा ही दुहेरी वाटणी केलेला प्रयोग अहिल्याबाई असेपर्यंत तब्बल २९ वर्षे सुव्यवस्थितपणे सुरु होता हे विशेष .
तुकोजीरावांनी या कालावधीत होळकरशाहीच्या सैन्याचे अतिशय सक्षमपणे आणि तडफदारपणे नेतृत्व केले होते . राघोबादादांच्या फौजा इंदोरवर चालून आल्या तेव्हा अहिल्याबाईंनी लगोलग आजूबाजूच्या राज्यकर्त्यांना मदतीसाठी बोलावले होते तसेच त्यावेळी उदयपूर येथे असलेल्या तुकोजीरावांना पण सांगावा धाडला होता . जलदीने हालचाल करून ते आपल्या सैन्यासह क्षिप्रा नदीच्या काठी तळ ठोकून बसले . राघोबादादांना आतापर्यंत सहकार्य करणारे महादजी शिंदे आणि जानोजी भोसले हे अहिल्याबाईंनी माधवराव पेशव्यांशी केलेल्या पत्रव्यवहाराने आणि माधवरावांनी अहिल्याबाईंना दिलेल्या पाठिंब्यामुळे चलबिचल होऊन माघारीची हालचाल करू लागले होते . ते ससैन्य क्षिप्रेच्या काठी आले असता दुसऱ्या बाजूला असलेल्या तुकोजीरावांनी त्यांना खडसावले की आपण नदी पार करून होळकरशाहीत प्रवेश करू पाहाल तर आमच्या सामर्थ्यवान सैन्याशी तुमची गाठ आहे . अर्थात शिंदेभोसल्यांच्या संयुक्त फौजा आणि अखेर राघोबादादांच्या फौजा यांनी काळवेळ ओळखून यशस्वी माघार घेतली हे सांगणे नकोच . तुकोजीरावांनी इ.स. १७६९ मध्ये गोवर्धन येथे तसेच पुनःश्च १७७३ मध्ये भरतपूर येथे जाटांच्या सैन्याला जोरदार मात दिली . या विजयामुळे अर्थातच त्यांना भरपूर साधन-संपत्ती मिळाली जी त्यांनी मराठेशाहीच्या चारही प्रतिनिधींत वाटली . तुकोजीरावांनी सुरुवातीला काहीकाळ राघोबादादांचा पक्ष घेतला होता परंतु नंतर बारभाईंच्या घडामोडींमुळे राघोबादादांना पेशवेपदावरून हटवण्याच्या मोहिमेअंतर्गत तुकोजीरावांनी मराठा सैन्यासह माही नदीच्या काठी राघोबादादांचा पराभव ही केला . माधवरावांच्या निधनानंतर सुरु झालेली पेशवेपदाची अंतर्गत लढाई ही पुरंदरच्या तहापर्यंत दहा एक वर्षे सुरूच होती . या दीर्घ कालावधीत आपल्या सैन्याच्या कराव्या लागलेल्या हालचालींमुळे तुकोजीरावांना आर्थिक झळ देखील मोठ्या प्रमाणात सोसावी लागली . इ.स. १७७७ मध्ये तुकोजीरावांनी सहा हजाराच्या सैन्यासह ब्रिटिशांचा बोरघाटात पराभव केला . याकारणाने पेशव्यांनी त्यांना ५ लाखांचा नवा सरंजाम तसेच बुंदेलखंड आणि खानदेश ची सुभेदारी दिली .
असे अनेक जय-पराजय स्वीकारत असताना महादजी शिंद्यांचा सरदार गोपाळरावांनी अनपेक्षितपणे तुकोजीरावांच्या सैन्यावर हल्ला करून त्यांचे मोठे नुकसान केले . यावेळी महादजी शिंदे देवदर्शनासाठी दक्षिणेकडे रवाना झालेले होते . हे वृत्त कळताच अहिल्याबाईंनी तातडीने मदत म्हणून ५ लक्ष रुपये तुकोजीरावांकडे पाठवले होते . यानंतरच्या लेखारी या ठिकाणी ही शिंदे आणि होळकरांच्या सैन्यात झडप झाली . यानंतर तुकोजीराव मोठ्या आर्थिक नुकसानीसह इंदोरला स्वगृही परतले . त्यांचे पुत्र काशिराव यांच्या सांगण्यावरून अहिल्याबाईंनी पुन्हा तुकोजीरावांकरिता ५ लक्ष रुपयांची तरतूद केली . यानंतर अहिल्याबाई दि. १३ अॉगस्ट १७९५ रोजी मृत्यू पावल्या . अहिल्याबाईंच्या मृत्यूसमयी तुकोजीराव आणि पुत्र काशिराव हे पुणे दरबारी रुजू होते . आता पंतप्रधानपेशव्यांच्या पाठिंब्याने तुकोजीराव हे संपूर्ण होळकरशाहीचे अधिपती झाले . तुकोजीरावांनी तातडीने पुत्र काशिरावांना महेश्वर ला पाठवले आणि प्रशासकीय बाबी सांभाळण्याची तसेच खजिन्याची मोजदाद करण्याची आज्ञा केली . या अत्यंत थोडक्या कालावधीत म्हणजे जेमतेम दीडएक वर्षे तुकोजीराव पहिले हे इंदोरचे अधिपती राहिले , आणि लवकरच म्हणजे दि. १५ अॉगस्ट १७९७ ला त्यांचे पुणे येथे निधन झाले . त्यांच्या अतिशय अल्पस्वल्प राजवटीत महेश्वर आणि मल्हारनगर येथे चांदीची नाणी पाडली गेलेली आढळतात . या नाण्यांवर शिवलिंग , बिल्वपत्र तसेच सूर्य / मार्तंड छापलेले आढळतात . तुकोजीरावांनी सोन्याची अथवा तांब्याची नाणी पाडल्याचे अजून तरी आढळून आलेले नाहीये . महेश्वर मिंट चा हिजरीसन १२११ आणि मल्हारनगर मिंट चे हिजरीसन १२१० आणि १२११ या वर्षांचा उल्लेख असलेले रुपये आढळून येतात .
प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर , ठाणे .
मराठा नाणी संग्राहक , अभ्यासक , लेखक , व्याख्याते .

देवगिरी

 


देवगिरी
बदामिचे चालुक्य, कल्याणचे चालुक्य, मौर्य, सुंगा, सातवाहन, हल(हाला), शक क्षत्रप, सतकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना, राष्ट्रकूट यांच्यानंतर बाराव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षात देवगिरीच्या यादवांचा उदय खानदेश परिसरात झाला पहिल्या सेऊनचंद्राच्या तेव्हाच्या सेऊनदेशात (आताचा खानदेशात) नाशिक ते देवगिरीचाही समावेश होता. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील भिल्लमा(२) या राजपुत्राने देवगिरी गावाची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले.
पुढे सिघंण्णा व त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले. या कृष्णाचा भाऊ महादेव याच्या अचूक तारीख २९ ऑगस्ट १२६१ अशी असल्याचे निश्चित झाले आहे. त्याने उत्तर कोकणचा प्रदेश आपल्या राज्यास जोडण्यात यश प्राप्त केले आणि गादी आपला मुलगा आमण्णाकडे सोपविली. पण कृष्णाचा मुलगा रामचंद्राने बंड करून गादी स्वत:कडे खेचली आणि विदर्भ आणि इतरत्रही विजय प्राप्त केले.मात्र, १२९६मध्ये झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या आकस्मिक हल्ल्यास रामचंद्र तोंड देऊ शकला नाही.
इ.स. १२९६ ते इ.स. १३१० - १२९६ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने प्रथम दख्खन प्रांतात प्रवेश करून यादवांचा पराभव केला आणि त्यांची संपत्ती लुटून त्यांना दरिद्री बनवले. सेनापती मलीक कफूर याने अल्लाउद्दीनचे काम पुढे चालू ठेवले आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली.
इ.स.१३१० ते इ.स.१३४७ - अल्लाउद्दीनचे अनुकरण मुहम्मद बिन तुघलक (इ.स. १३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता दक्षिणेतील मदुराईपर्यंत वाढवत केली. १३२६ मध्ये मुहम्मद बिन तुघलक ऊर्फ वेडा महंमद[ संदर्भ हवा ] या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली.
इ.स. १३४७ ते इ.स.१५०० - तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्लाउद्दीन हसन बहामनी याच्या धुरीणत्वाखाली दक्षिणेत इ.स. १३४७ साली बहामनी घराण्याची स्थापना झाली. ते राज्य सुमारे १५० वर्षे टिकले. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहामनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहामनी राज्याचे गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर साहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाचही शाह्या मोगल साम्राज्यांत विलीन झाल्या.
☀🔥⛳|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी....||⛳🔥☀

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...