विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 2 July 2021

सावंतवाडी संस्थान.... भाग 2

 




सावंतवाडी संस्थान....

भाग 2
#खेम सावंत पहिला :
फोंड सावंताचा हा मुलगा. हाच सावंतवाडीचा राज्यसंस्थापक म्हणतां येईल. यानें १६२७ सालीं विजापूरकरांकडून देशमुखी मिळवून तिचा १४ वर्षे उपभोग घेतला. याच्या मागून याचा वडील मुलगा सोम सावंता मागून धाकटा मुलगा फोंडसावंत गादीवर आला. स. १६५१ त फोंड सावंत मरण पावल्यावर त्याचा धाकटा भाऊ लखम सावंत या प्रांताचा सत्ताधीश झाला. या लखम सावंतानें शिवाजी राजांना कोंकणांतून हांकून देण्याचा विजापुरकरांच्या वतीनें प्रयत्न चालविला. पण शिवाजी राजांना हातून पराभव पावून हा तहास कबूल झाला (१६५९). या तहान्वयें सावंतानें शिवरायांचे मांडलिकत्व पत्करिल्यासारखें झालें. हा नामोष्कीचा तह न आवडून लखमानें स. १६६४ त शिवरायांशी लढाई करून जय मिळविला. हा शूर सावंत १६७५ सालीं मरण पावला.
याच्यानंतर याचा पुतण्या खेम सावंत (दुसरा) गादीवर आला. यानें मोठ्या पराक्रमानें पोर्तुगीजांनां नामोहरम करून आपल्या राज्याचा विस्तार केला व कुडाळच्या प्रभूंनां जिंकून स्वतंत्र झाला. याचवेळी आदिलशाहीचा अंत झाल्यानें सावंतानें मोंगलांचें सार्वभौमत्व नांवाचेंच कबूल केलें. या खेम सावंतानें चराठें हें राजधानाचें ठिकाण करून तेथें मोठी वस्ती करविली. याच गांवाला पुढें सुंदरवाडी म्हणूं लागले. शाहु छत्रपति झाल्यावर खेम सावंत त्याच्याशीं राजनिष्ठ राहिला. शाहूनेंहि त्याची सरदेशमुखी कबूल केली व कुडाळ आणि पंचमहाल त्यास इनाम दिले. हा सावंत स. १७०९ त निर्वतला. याच्यामागून फोंड सावंत गादीवर बसला. त्याला कोल्हापुरकर, आंग्रे व पोर्तुगीज यांशीं झगडावें लागत असल्यानें त्यानें इंग्रजांशीं दोस्तीचा तह केला (१७३०). फोंडानंतर त्याचा नातू रामचंद्र सावंत राजा झाला. त्याचा सर्व कारभार त्याचा महापराक्रमी व कर्तबगार चुलता जयराम हा पहात असे. पण चुलत्या-पुतण्यांत कलह लागून पोर्तुगीज लोकांचें पुन्हां फावलें. त्यांनीं सावंतावर स्वारी करून खंडणी लादली. या अपजयाचा वचपा रामचंद्राचा पुत्र खेम सावंत गादीवर आल्यानंतर (१७५५) त्यानें काढिला व पोर्तुगीजांपासून गेलेला मुलुख परत मिळविला (१७९१). जिवबादादा बक्षी यानें या सावंताला हाताशीं धरून संस्थानला ऊर्जितावस्था आणिली. पण संस्थानच्या वाईट अंतःकारभारामुळें संस्थान कर्जबाजारी व परावलंबी बनलें. हा खेम सावंत १८०३ मध्यें निपुत्रिक वारल्यानंतर गादीविषयीं भांडणें लागली. शेवटीं रामचंद्र उर्फ भाऊसाहेब सावंत हा खेम सावंताची पत्नी लक्ष्मीबाई हिच्या मांडीवर बसून राज्याधिकारी झाला. लवकरच या दत्तक मायलेकरांत वितुष्ट आलें व सन १८०८ मध्यें भाऊसाहेबाचा खून झाला व लक्ष्मीबाई वारली. तेव्हा खेम सावंता(तिसरा)ची दुसरी पत्नी दुर्गाबाई हिला दुसरा एक मुलगा दत्तक दिला. हा फोंड सावंत १८१२ सालीं वारला, तेव्हां अज्ञान मुलगा (चवथा) खेम सावंत गादीवर आला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...