विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 1 July 2021

राजे बहिर्जी हिंदुराव घोरपडे भाग १

 इतिहासातील हरवलेलं एक पानं.

राजे बहिर्जी हिंदुराव घोरपडे
माहिती साभार - इंद्रजितसिंह. वि.घोरपडे ( गजेंद्रगडकर )

भाग १
विस्मृतीच्या पडद्याआड गेलेले वीर पुरुष... महाबली ... राजे बहिर्जी हिंदुराव एक असे व्यक्तीमत्व.. ज्यांनी मुघल सैन्य पाठलागावर असताना, घोडे नाकाम झाल्यावरही, छ. राजाराम महाराजांना स्वत:च्या पाठीवर घेऊन ...जिंजी मध्ये सुखरूप पोहचवले...
तसेच मराठी साम्राज्याची दक्षिणेकडील सीमा कायमची हैदर, टिपू सुलताना सारख्या क्रुर यवनांपासून स्वत:च शीर तळहातावर घेऊन राखली..
तर अशा या राजे बहीर्जी घोरपडे हिंदुराव गजेंद्रगडकर यांचे ३१३ व्या पुण्यतिथी निमित्त आपण त्यांच्याबद्दलची आणि एकूणच संपूर्ण हिंदुराव घोरपडे गजेंद्रगडकर घराच्या पराक्रमाची गाथा आपण आठवून त्यांना वंदन करूया
संक्षिप्त इतिहास
अंदाजे चारशे तीस वर्षांपूर्वी घडलेल्या अद्भुत, दैदिप्यमान, अशा महान यशस्वी घटनेचा आजही महाराष्ट्राला अभिमान वाटतो ती घटना म्हणजे छ. संभाजी महाराजांच्या दुर्दैवी अंतानंतर, मराठा राज्य संपल्यात जमा धरून आनंदोत्सव साजरा करणारे औरंगजेब आणि त्याची लाखोंची सेना ... यांच्याशी सलगपणे सतरा वर्षे दिलेली प्रखर, कल्पक, कडवी झुंज..!!!
घोरपडे बंधू चे सैन्य हे वीजेसारख्या चपळ हालचाली करण्यासाठी प्रसिद्ध होते. या सैन्याने सलग सातत्य राखून आठ वर्षे आठशे मैलांच्या क्षेत्रात, म्हणजे दख्खनेपासून ते कारोमंडलच्या किनारपट्टी पर्यंतच्या क्षेत्रात जलद आणि जागरूक पणे लष्करी हालचाली केल्या.
म्हाळोजी घोरपडे यांच्या संगमेश्वर येथील वीरगती प्राप्तीनंतर, घराण्याच्या पराक्रमाची परंपरा त्यांच्या तीनही पुत्रांनी स्वराज्याची सेवा करताना अखंडपणे राखली.
राजे बहिर्जी हिंदुराव घोरपडे यांच्या बहुआयामी, पराक्रमी कारकीर्दीचा ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे आढावा घेताना त्यांच्या लष्करी कर्तबगारी ची, त्यांच्या असीम शौर्याची, आणि वंदनीय अशा स्वराज्य निष्ठेची कल्पना येते.
राजे बहीर्जी हिंदुराव स्वराज्यावरील अत्याचारी मोगली संकट नेस्तनाबूत करण्यासाठी निरपेक्ष बुद्धीने सतत सतरा वर्षे लढत राहिले.
छ संभाजी महाराजांच्या दुर्दैवी निर्घृण वधानंतर इतिकाद खानाच्या सैन्याने रायगडाला वेढा घातला. या बिकट परिस्थिती मध्ये महाराणी येसुबाईसाहेब यांच्या मसलतीस अनुसरून छ. राजाराम महाराजा आपल्या तीन राण्यांसह दि ५ एप्रिल १६८९ ला रायगड सोडून बाहेर पडले. त्यावेळी आघाडीवर बहिर्जी, संताजी व मालोजी हे तीनही घोरपडे बंधू जातीने हजर होते.
५ एप्रिल १६८९ ते ३० जुन १६८९ ... रायगड- जावळी-ज्ञप्रतापगड- वासोटा- सातारा - सज्जनगड - पन्हाळगड. या अत्यंत जिकिरीच्या, बिकटतम, धोकादायक, जोखमीच्या प्रवासात, तीनही घोरपडे बंधू महाराजांच्या बरोबरच होते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...